Maharashtra Board 10th Result 2024 Declared: दहावीचा निकाल जाहीर, मुलींनी मारली बाजी, हा विभाग ठरला अव्वल..
MSBSHSE Maharashtra Board Class 10th (SSC) Result 2024 LIVE : दहावीच्या निकालाची विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून वाट पाहत होते. शेवटी विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपलीये. दहावीचा निकाल आज लागलाय. बोर्डाकडून विभागीय टक्केवारी दहावीच्या निकालाची जाहीर केलीये.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून राज्यभरात दहावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. मागील काही दिवसांपासून विद्यार्थी हे दहावीच्या निकालाची आतुरतेने वाट पाहताना दिसले. शेवटी आज दहावीचा निकाल लागलाय. विशेष म्हणजे यंदा दहावीच्या निकालाच्या टक्केवारीमध्ये वाढ झालीये. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी नुकताच दहावीचा निकाल जाहीर केलाय. विभागीय टक्केवारी देखील जाहीर करण्यात आलीये. यावेळी दहावीच्या निकालात कोकण विभाग अव्वल ठरलाय. नागपूर विभागाचा निकाल सर्वाधिक कमी लागलाय.
विशेष म्हणजे बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालात देखील मुलींनीच बाजी मारलीये. मुलींच्या टक्क्यात मोठी वाढ झालीये. मुलांपेक्षा दहावीच्या निकालात मुलीच वरचढ ठरल्या आहेत. राज्याची दहावीच्या निकालाची टक्केवारी 95. 81 टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालाचा टक्का वाढला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दहावीच्या निकालाबद्दल सविस्तर माहिती दिलीये. मुलींचा निकाल 97.21 टक्के लागलाय. मुलांचा निकाल 94.56 टक्के लागला आहे. मुलींचा निकाल मुलांपेक्षा 2.65 टक्कांनी अधिक आहे. राज्यात कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल 99 टक्के लागला आहे. सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा निकाल 94.73 टक्के आहे.
विभागनिहाय निकाल
पुणे – 96.44, नागपुर – 94.73, संभाजीनगर – 95.19, मुंबई – 95.83, कोल्हापूर – 97.45, अमरावती – 95.58, नाशिक – 95.28, लातूर – 95.27, कोकण – 99.01 याप्रमाणे विभागीय निकाल लागलाय. यामध्ये कोकण विभाग अव्वल ठरला असून सर्वात कमी निकाल हा नागपूर विभागाचा लागलाय. विशेष म्हणजे कोकण विभागात अशी एकही शाळा नाही, जिचा निकाल झिरो टक्के आहे.
Maharashtra SSC RESULT
विभागीय निकाल देखील मंडळाकडून जाहीर केलाय. राज्यभरातील अनेक शाळांचे निकाल 100 पैकी 100 टक्के लागले आहेत. राज्यात कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी बोर्डाकडून जय्यत तयारी करण्यात आली. विशेष म्हणजे भरारी पथकांच्या संख्येतही मोठी वाढ करण्यात आली. परीक्षा केंद्रावर सुरक्षा वाढवण्यात आली. विद्यार्थ्यांनी दहावीच्या निकालात धमाका केलाय.
गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी हे दहावीच्या निकालाची आतुरतेने वाट पाहताना दिसले. बोर्डाकडून काही दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आले होते की, बारावीचा निकाल मेच्या तिसऱ्या आठवड्यात आणि दहावीचा निकाल मेच्या चाैथ्या आठवड्यात लागेल. दरवर्षीपेक्षा यंदा दहावीचा निकाल लवकरच लागलाय.