Maharashtra Board HSC Result 2023 : बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर, राज्यातील किती कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के, किती शंभर नंबरी

Maharashtra Board HSC Result 2023 : बारावीच्या विद्यार्थ्यांना निकाल लागला आहे. विद्यार्थ्यांना दुपारी दोन वाजता आपला निकाल ऑनलाइन पाहता येणार आहे. निकालापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोर्डाकडून सविस्तर माहिती देण्यात आली.

Maharashtra Board HSC Result 2023 : बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर, राज्यातील किती कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के, किती शंभर नंबरी
hsc colleges
Follow us
| Updated on: May 25, 2023 | 2:08 PM

प्रदीप कापसे, पुणे : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. सकाळी ११ वाजता बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकालाची माहिती देण्यात आली. दुपारी २ वाजता बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला. यंदा बारावी बोर्डाचा निकाल 91.25 टक्के लागला आहे. मात्र राज्यात शून्य टक्के निकाल असणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालांची संख्या दुहेरी आहे. दुसऱ्या बाजूला 100 टक्के निकाल 2369 कनिष्ठ महाविद्यालयांचा लागला आहे.

कोणत्या महाविद्यालयांचा शून्य टक्के निकाल

राज्यातील एकूण 17 कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल 0 टक्के लागला आहे. 20 ते 30 टक्के निकाल असणारी 3 महाविद्यालय आहेत. 30 ते 40 टक्के निकाल 3 महाविद्यालयांचा लागला आहे.

हे सुद्धा वाचा

किती महाविद्यालयांचा शंभर नंबरी

राज्यात 100 टक्के निकाल लागलेली 2369 महाविद्यालय आहेत. या महाविद्यालयांमधील सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात कॉपी विरोधात मोहीम राबवण्यात आली होती. यावेळी 11 गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच पुणे विभागात डमी विद्यार्थी पकडला गेला होता. राज्यात 345 विद्यार्थी कॉपी करताना पकडले गेले आहे. उत्तरपत्रिकेत रिकाम्या जागेत काही लिखाण केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवले आहे. संभाजीनगरमध्ये झालेल्या गैरप्रकारत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रीया सुरू असल्याची माहिती गोसावी यांनी दिली.

कुठे पाहता येईल निकाल ?

Maharesult.nic.in

hscresult.mkcl.org

SMS द्वारे कसा पहाणार निकाल?

SMS द्वारे निकाल मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना मेसेज बॉक्समध्ये जाऊन आपला सीट नंबर टाकून 57766 या क्रमांकावर सेंड करावा लागणार आहे. यानंतर त्याच मोबाईल नंबरवर तुम्हाला तुमचा निकाल पाहता येईल.

ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी या स्टेप फॉलो करा

महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या अधिकृत संकेतस्थळावर (mahresult.nic.in) जावून HSC result 2023 या लिंक वर क्लिक करा. त्यानंतर तुमचा सीट नंबर आणि जन्म तारीख टाकून तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता. यानंतर त्या PDF ची प्रिंटआऊट काढून घ्या. निकाल लागल्यानंतर काही दिवसातच विद्यार्थ्यांना त्यांचे ओरिजिनल मार्कशीट कॉलेजमधून मिळून जातील.

कोकण विभागाची बाजी

बारावीच्या निकालात राज्यात यंदा कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 96.01 टक्के लागला आहे. सर्वात कमी निकाल हा मुंबई विभागाचा लागला आहे. मुंबई विभागाचा निकाल 88.13 टक्के लागला आहे.

राज्यात यंदाही मुलींची बाजी

निकालात नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 93.73 टक्के लागला आहे. तर मुलांचा निकाल 81 टक्के लागला आहे.

निकालाचे सर्व अपडेट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.