Maharashtra Board 12th Result 2024 : अखेर प्रतिक्षा संपली, आज लागणार बारावीचा निकाल, असा पाहा तुमचा निकाल

Maharashtra board 12th (HSC) result 2024 Date and Time : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून अत्यंत मोठी घोषणा करण्यात आलीये. आता बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली आहे. आज बोर्डाकडून निकाल जाहीर केला जाणार आहे.

Maharashtra Board 12th Result 2024 : अखेर प्रतिक्षा संपली, आज लागणार बारावीचा निकाल, असा पाहा तुमचा निकाल
result
Follow us
| Updated on: May 21, 2024 | 12:48 PM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी हे निकालाची वाट सतत पाहत होते. काही दिवसांपूर्वीच बोर्डाकडून हे स्पष्ट करण्यात आले की, बारावीचा निकाल मेच्या तिसऱ्या आठवड्यात लागेल. त्यानंतर आता नुकताच बोर्डाकडून मोठी घोषणा करण्यात आलीये. आता विद्यार्थ्यांची निकालाची प्रतिक्षा ही संपलीये. आज बारावीचा निकाल जाहीर केला जाईल. विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने आज 21 मेला आपला निकाल पाहू शकणार आहेत.

दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होणार आहे. सकाळी अकरा वाजता बोर्डाकडून पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलंय. त्यानंतर दुपारी एक वाजता निकाल जाहीर केला जाईल. राज्यामध्ये  21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 यादरम्यान बारावीच्या परीक्षा या पार पडल्या होत्या.

1) mahresult.nic.in

2) mahahsscboard.in

3) hsc.mahresults.org.in

4) hscresult.mkcl.org

5) results.gov.in.

या साईटवर जाऊन विद्यार्थी हे आपला बारावीचा निकाल आरामात पाहू शकणार आहेत. विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहण्यासाठी परीक्षा क्रमांकाची आवश्यक आहे. यंदाच्या निकालाच कोण बाजी मारणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे. यंदा निकालाची टक्केवारी वाढणार असल्याचीही चर्चा आहे.

यंदा राज्यामध्ये तब्बल 14 लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. दरवेळी प्रमाणे यंदा देखील राज्यात संपूर्ण परीक्षा ही काॅपीमुक्त पार पडलीये. बोर्डाकडून या परीक्षेची जोरदार तयारी काही महिन्यांपासून सातत्याने सुरू होती. आता उद्या निकालाची घोषणा देखील केली जाणार आहे.

Maharashtra HSC RESULT

आता लवकरच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीच्या निकालाबद्दलची देखील मोठी घोषणा केली जाऊ शकते. बोर्डाकडून अगोदरच हे स्पष्ट करण्यात आलंय की, दहावीचा निकाल मेच्या चाैथ्या आठवड्यात जाहीर केला जाईल.

बारावीचा निकाल 9 विभागांमध्ये लागणार आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण अशा एकूण नऊ विभागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. आता कोणत्या विभागातील विद्यार्थी हे अव्वल राहतात, हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे.

Non Stop LIVE Update
झणझणीत तर्री अन् पाव, राज ठाकरेंनी पत्नी शर्मिलांसह मारला मिसळवर ताव
झणझणीत तर्री अन् पाव, राज ठाकरेंनी पत्नी शर्मिलांसह मारला मिसळवर ताव.
लाडकी बहीण योजनेवरून टीका करणाऱ्या राऊतांना शहाजीबापूंनी फटकारलं
लाडकी बहीण योजनेवरून टीका करणाऱ्या राऊतांना शहाजीबापूंनी फटकारलं.
जयंत पाटील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा? भर भाषणातून शरद पवारांचे संकेत काय?
जयंत पाटील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा? भर भाषणातून शरद पवारांचे संकेत काय?.
भाजपकडून 110 जणांची नाव निश्चित, या आमदारांचा पत्ता कट तर कोणाला संधी?
भाजपकडून 110 जणांची नाव निश्चित, या आमदारांचा पत्ता कट तर कोणाला संधी?.
जरांगे पाटील कोणाचा खेळ बिघडवणार? राजकीय एन्काऊंटर करण्याचा थेट इशारा
जरांगे पाटील कोणाचा खेळ बिघडवणार? राजकीय एन्काऊंटर करण्याचा थेट इशारा.
लाडकी बहीण योजनेचे नियम मोडले? डिसेंबरनंतर अर्ज तपासणी, होणार वसुली?
लाडकी बहीण योजनेचे नियम मोडले? डिसेंबरनंतर अर्ज तपासणी, होणार वसुली?.
बिश्नोईकडून सलमानला पुन्हा धमकी, '...अन्यथा सिद्दीकींपेक्षा वाईट होईल'
बिश्नोईकडून सलमानला पुन्हा धमकी, '...अन्यथा सिद्दीकींपेक्षा वाईट होईल'.
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.