बारावीच्या निकालाबद्दल अत्यंत मोठे अपडेट, ‘या’ आठवड्यात लागणार निकाल, असा पाहा तुमचा निकाल

Maharashtra Board Result 2024 : दहावी आणि बारावीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. आता नुकताच बारावीच्या निकालाबद्दल अत्यंत मोठे अपडेट आल्याचे बघायला मिळत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या.

बारावीच्या निकालाबद्दल अत्यंत मोठे अपडेट, ‘या’ आठवड्यात लागणार निकाल, असा पाहा तुमचा निकाल
12th result
Follow us
| Updated on: May 16, 2024 | 3:02 PM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. आता या परीक्षांच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. विद्यार्थी गेल्या कित्येक दिवसांपासून निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वीच बोर्डाच्या अधिकाऱ्याकडून खुलासा करण्यात आला की, मेच्या शेवटच्या आठवड्यात निकाल जाहिर केले जाऊ शकतात. मध्यंतरी चर्चा होती की, दहावी आणि बारावीचा निकाल मेच्या दुसऱ्या आठवड्यात जाहिर केला जाईल. आता नुकताच बारावीच्या निकालाबद्दल अत्यंत मोठे अपडेट आलंय.

रिपोर्टनुसार दहावीच्या निकालाच्या अगोदर बारावीचा निकाल हा जाहिर केला जाईल आणि याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर केला जाईल. बारावीच्या निकालानंतर दहावीचा निकाल जाहीर होईल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून अजून निकालाबद्दल कोणतेच अपडेट देण्यात नाही आले.

यंदा राज्यभरातून 14 लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिलीये. जवळपास सर्वच बोर्डांचे निकाल जाहिर झाले आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावी आणि बारावीचा निकाल अद्याप लागला नाही किंवा अजूनही मंडळाकडून निकालाबद्दल काहीही अपडेट सांगण्यात नाही आले. विद्यार्थी या निकालाची वाट पाहत आहेत.

mahresult.nic.in, mahahsscboard.in, hsc.mahresults.org.in, hscresult.mkcl.org, results.gov.in. या साईटवर जाऊन आपण बारावीचा निकाल पाहू शकता. यासाठी विद्यार्थ्यांकडे त्यांचा परीक्षा क्रमांक असणे आवश्यक आहे. यंदाच्या बारावीच्या निकालात मुले बाजी मारतात की मुली बाजी मारतात हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे.

बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 यादरम्यान पार पडली. विशेष म्हणजे बोर्डाकडून या परीक्षेसाठी जोरदार तयारी करण्यात आली होती. यंदाही काॅपीमुक्त परीक्षा राज्यात पार पडल्या. भरारी पथकांच्या संख्येत देखील मोठी वाढ करण्यात आली. बारावीचा निकाल शेवटच्या आठवड्यात लागणार असल्याचे आता सांगितले जात आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.