दहावी आणि बारावीचा निकाल कधी जाहीर होणार? अत्यंत महत्वाची माहिती पुढे, निकाल पाहण्यासाठी ‘या’ साईटला..

Maharashtra Board Results 2024 Date 10th and 12th News : दहावी आणि बारावीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून या निकालाची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. आता या निकालाबद्दल अत्यंत मोठे अपडेट पुढे येताना दिसत आहेत.

दहावी आणि बारावीचा निकाल कधी जाहीर होणार? अत्यंत महत्वाची माहिती पुढे, निकाल पाहण्यासाठी ‘या’ साईटला..
Maharashtra Board Result
Follow us
| Updated on: May 09, 2024 | 11:42 AM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. राज्यात दहावीची परीक्षा ही 1 मार्च ते 26 मार्च 2024 पर्यंत सुरू होती, तर बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 मध्ये झाली. आता विद्यार्थ्यांपासून ते पालकांपर्यंत सर्वांच्या नजरा या निकालाकडे लागल्या आहेत. इतर राज्यांमध्ये निकालाची तारीखही पुढे आलीये. आता राज्यातील दहावी आणि बारावीच्या निकालाबद्दल अत्यंत मोठे अपडेट पुढे येताना दिसत आहेत. ज्यानंतर विद्यार्थ्यांची उत्सुकता ही वाढताना दिसत आहे. निकाल लागला की, पुढील वर्षासाठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची आणि पालकांची धावपळ सुरू होते.

विशेष म्हणजे दहावी आणि बारावीचा निकाल याच महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लागू शकतो, अशी चर्चा सुरू आहे. रिपोर्टनुसार अगोदर बारावीचा निकाल लागेल आणि त्यानंतर दहावीचा निकाल लागेल. मात्र, या निकालाबद्दल महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून कोणतीही तारीख ही जाहिर करण्यात नाही आली.

विशेष बाब म्हणजे विद्यार्थ्यांना mahresult.nic.in आणि mahahsscboard.in या साईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने निकाल बघता येईल. निकाल बघण्यासाठी विद्यार्थ्यांना वरील दिलेल्या साईटवर जावे लागेल आणि तिथे आपला परीक्षा क्रमांक टाकावा. त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक केले की, विद्यार्थ्यांचा निकाल दिसेल.

यंदा बारावीच्या परीक्षेला तब्बल 14 लाख 28 हजार विद्यार्थी बसले होते. दहावी आणि बारावीच्या मिळून एकून 31 लाख विद्यार्थ्यांनी यंदा परीक्षा दिलीये. दहावीची परीक्षा 5 हजार 86 केंद्रावर घेण्यात आली. बारावीची परीक्षा तब्बल 3 हजार 320 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. यंदा भरारी पथकाच्या संख्येत देखील मोठी वाढ करण्यात आली होती.

काॅपीमुक्त परीक्षा पार पाडण्यासाठी यंदा बोर्डाकडून कंबर कसण्यात आली. तसेच परीक्षा केंद्रावर बंदोबस्तही ठेवण्यात आला. विशेष म्हणजे राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरळीत पार पडल्या. आता सर्वांच्या नजरा या निकालाकडे आहेत. याच महिन्यात दुसऱ्या आठवड्यात निकाल लागणार असल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले.

दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.