Maharashtra 10th,12th Results 2024 : दहावी-बारावीच्या निकालाच्या तारखा जाहीर, ‘या’ दिवशी लागणार निकाल..
Maharashtra Board 10th,12th Results 2024 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. विद्यार्थी गेल्या कित्येक दिवसांपासून या निकालाची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. आता नुकताच या निकालाबद्दल अत्यंत मोठे आणि महत्वाचे अपडेट आल्याचे बघायला मिळत आहे.
इयत्ता दहावी आणि बारावीला बसलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या निकालाची माहिती देण्यात आली आहे. मंडळाने दिलेल्या माहितीनुसार इयत्ता दहावीचा निकाल मेच्या चौथ्या आठवड्यात लागणार आहे. तर बारावीचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात लागणार आहे. मंडळाने अजून तारखा जाहीर केलेल्या नाहीत. कोणत्या आठवड्यात निकाल जाहिर होणार हे सांगण्यात आलंय.
मध्यंतरी चर्चा होती की, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावी आणि बारावीचा निकाल मेच्या दुसऱ्या आठवड्यात लागेल. आता निकालाबद्दल अत्यंत मोठे अपडेट आले आहे. राज्यात दहावीची परीक्षा ही 1 मार्च ते 26 मार्च 2024 पर्यंत सुरू होती. बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 यादरम्यान पार पडली.
आता नुकताच दहावी आणि बारावीच्या निकालाबद्दल अत्यंत मोठे अपडेट पुढे आले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी याबद्दल मोठी माहिती सांगितली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल हा मेच्या तिसऱ्या आठवड्यात लागेल.
मेच्या चाैथ्या आठवड्यात बारावीचा निकाल लागेल. म्हणजेच काय तर दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून निकालाची तारीख आता जाहिर करण्यात आलीये. अगोदर बारावीचा निकाल लागेल आणि त्यानंतर दहावीचा निकाल लागेल.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या तारखा या आपल्याला mahahsscboard.in येथे मिळतील. mahresult.nic.in आणि msbshse.co.in या साईटवर आपण दहावी आणि बारावीचा निकाल आरामात बघू शकता. यंदा राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा या काॅपीमुक्त पार पडल्या आहेत. यंदाच्या निकालामध्ये मुली वरचढ ठरतात की, मुले बाजी मारतात हे पाहण्यासारखे ठरेल.