Maharashtra SSC Result 2021: दहावी निकालाच्या वेबसाईट रात्री उशिरा पूर्ववत, बोर्डाच्या प्रयत्नांना यश, विद्यार्थी आनंदित

बोर्ड, तांत्रिक समिती आणि एनआयसीची टीम यांच्या मदतीनं निकालाच्या वेबसाईट पूर्ववत करण्यात यश आलं. शुक्रवारी रात्री उशिरा निकालाच्या वेबसाईट पूर्ववत झाल्याचं समोर आलं.

Maharashtra SSC Result 2021: दहावी निकालाच्या वेबसाईट रात्री उशिरा पूर्ववत, बोर्डाच्या प्रयत्नांना यश, विद्यार्थी आनंदित
SSC Result 2021
Follow us
| Updated on: Jul 17, 2021 | 11:19 AM

मुंबई : राज्यातील दहावी बोर्डाचा निकाल बोर्डानं शुक्रवारी पत्रकार परीषद घेत जाहीर केला. शुक्रवारी दुपारी एकच्या दरम्यानं दहावीचा निकाल विद्यार्थ्यांना http://result.mh-ssc.ac.in, http://mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर पाहायला मिळणार होता. मात्र, दोन्ही वेबसाईट डाऊन झाल्या आणि विद्यार्थ्यांची उत्सुकता ताणली गेली. वेबसाईट सुरु होत नसल्यानं विद्यार्थी आणि पालक नाराज देखील झालेले पाहायला मिळाले. बोर्डानं युद्धपातळीवर प्रयत्न करत दहावीच्या निकालासाठी आणखी तीन लिंक पाच ते सहा वाजताच्या दरम्यान विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिल्यानंतर विद्यार्थ्यांना हळूहळू निकाल मिळू लागले. बोर्ड, तांत्रिक समिती आणि एनआयसीची टीम यांच्या मदतीनं निकालाच्या वेबसाईट पूर्ववत करण्यात यश आलं. शुक्रवारी रात्री उशिरा निकालाच्या वेबसाईट पूर्ववत झाल्याचं समोर आलं. विद्यार्थ्यांना निकाल मिळू लागल्यानं ते आनंदित झाले होते.

दहावीच्या परीक्षेला नोंदणी केलेल्या एकूण 15 लाख 74 हजार 994 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यातील नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी 6 लाख 48 हजार 683 विद्यार्थी प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. श्रेणी सुधारण्यासाठी पुन्हा एकदा संधी मिळणार असल्याची माहिती दिनकर पाटील यांनी दिली.

दहावीचा निकाल 99.95 टक्के

राज्यातील दहावी बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल 99. 95 टक्के लागला आहे. कोकण विभागाचा निकाल 100 टक्के, मुलांचा निकाल 99.94 टक्के, तर मुलींचा निकाल 99.96 टक्के आहे. दहावीच्या परीक्षेला नोंदणी केलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 15 लाख 74 हजार 994 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यातील नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी 6 लाख 48 हजार 683 विद्यार्थी प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. श्रेणी सुधारण्यासाठी पुन्हा एकदा संधी मिळणार असल्याची माहिती दिनकर पाटील यांनी दिली.

निकाल कुठे पाहणार?

सन 2021 मध्ये इ.10वी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण http://result.mh-ssc.ac.in, http://mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होतील.

निकाल कसा पाहाल ? (How to Check Maharashtra SSC Result 2021) ?निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या कोणत्याही वेबसाईटवर जा.

?त्यानंतर तुम्हाला SSC BOARD RESULT नावाचा ऑप्शन दिसेल.

?त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर स्पेसशिवाय टाईप करावा लागेल.

?त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाकावी लागतील. म्हणजेच समजा तुमचा नंबर M123456 असा असेल आणि तुमच्या आईचे नाव सुवर्णा असेल, तर तुमच्या पहिल्या रकान्यात M123456 हा सीट नंबर येईल आणि दुसऱ्या रकान्यात आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे म्हणजेच SUV असे लिहावे लागेल.

?यानंतर लगेचच तुम्हाला निकाल स्क्रीनवर दिसेल.

?निकाल पाहिल्यानंतर तुम्हाला तो डाऊनलोडही करता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.

इतर बातम्या:

Maharashtra SSC Result 2021: अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेणार; 19 जुलैपासून ऑनलाईन नोंदणी

SSC website crash : 16 लाख विद्यार्थी 6 तासांपासून ताटकळत, बोर्ड म्हणतं अजून थोडी वाट पाहा!

Maharashtra Board SSC Result 2021 official website online at result.mh-ssc.ac.in and mahahsscboard.in websites restore midnight how to Check msbshse Class X 10th results

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.