Maharashtra Board SSC Result 2024 : दहावीचा निकाल वेबसाईट आणि मोबाईलवर कसा पाहायचा?, अत्यंत सोपी पद्धत आणि निकाल तुमच्या स्क्रिनवर..
Maharashtra Board 10th Result 2024 : बोर्डाकडून नुकताच दहावीचा निकाल हा जाहीर करण्यात आलाय. विशेष म्हणजे यंदा निकालाच्या टक्क्यात मोठी वाढ झालीये. गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालाचा टक्का वाढलाय. या निकालात मुलींनी बाजी मारलीये. कोकण विभाग निकालात अव्वल ठरलाय.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून नुकताच दहावीच्या परीक्षेचा निकाल हा जाहीर करण्यात आलायं. यंदा विद्यार्थ्यांनी धमाकेदार कामगिरी केलीये. विशेष म्हणजे यावेळी राज्याचा दहावीचा निकाल 95.81 टक्के लागलाय. बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालात देखील मुलींनीच बाजी मारलीये. मुलांपेक्षा मुलींची टक्केवारी निकालात अधिक आहे. दहावीचे विद्यार्थी हे दुपारी एक वाजता निकाल पाहू शकणार आहेत. आज ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर होईल. यंदाच्या निकालात कोकण विभाग हा अव्वल ठरलाय. कोकण विभागाचा निकाल तब्बल 99 टक्के लागलाय.
विद्यार्थी अगदी सोप्या पद्धतीने दहावीचा निकाल पाहू शकतील. ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांकडे परीक्षा क्रमांक असणे आवश्यक आहे. यासाठी https://www.tv9marathi.com/, mahresult.nic.in/, mahahsscboard.in या साईटवर जाऊन तुम्ही निकाल पाहू शकता. चाैकोनमध्ये तुम्हाला परीक्षा क्रमांक आणि दुसऱ्या चाैकोनमध्ये आईचे नाव टाकायचे आहे.
यानंतर विद्यार्थ्यांनी सबमिटचे बटन दाबा. तुमच्यासमोरील स्क्रिनवर तुमचा निकाल असेल. बरोबर दुपारी एक वाजता तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुमचा निकाल हा पाहू शकता. यंदा राज्याच्या निकालाच्या टक्केवारीत देखील वाढ झालीये. सर्वाधिक कमी निकाल हा नागपूर विभागाचा लागलाय. पुणे विभागाच्या विद्यार्थ्यांनी देखील चांगली कामगिरी केलीये.
‘या’ लिंकवर जाऊन पाहा दहावीचा निकाल, लिंक अॅक्टिव..
Maharashtra SSC RESULT
आज ऑनलाईन पद्धतीने दहावीचा निकाल जाहीर केला जाईल. प्रत्यक्ष मार्कशीट हातात येण्यासाठी विद्यार्थ्यांना अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे. पहिल्यांदाच दहावीचा निकाल हा मे महिन्यात लागल्याचे बोर्डाच्या अध्यक्षांनी म्हटले आहे. आता ही परंपरा कायम ठेऊ असेही त्यांनी म्हटले. जवळपास सर्वच विभागांचा दहावीचा निकाल चांगलाच लागलाय.
विशेष म्हणजे लातूर विभागाच्या विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली असून लातूर विभागाच्या यंदा 123 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत. संपूर्ण राज्यभरात कॉपीमुक्त परीक्षा या पार पडल्या. भरारी पथकांच्या संख्येत देखील मोठी वाढ करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच बोर्डाकडून जाहीर करण्यात आले होते की, यंदा मेच्या चाैथ्या आठवड्यात दहावीचा निकाल हा जाहीर केला जाईल.