MHT CET 2021 Admit Card : एमएचटी सीईटी परीक्षा PCB ग्रुपचं प्रवेशपत्र जाहीर, डाऊनलोड कसं करायचं?

शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता घेण्यात येणाऱ्या राज्य सामायिक प्रवेश परीक्षेसाठीच्या पीसीबी ग्रुपचं प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहेत. प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी cetcell.mahacet.org या वेबसाईटवर लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

MHT CET 2021 Admit Card : एमएचटी सीईटी परीक्षा PCB ग्रुपचं प्रवेशपत्र जाहीर, डाऊनलोड कसं करायचं?
MHT CET Cell
Follow us
| Updated on: Sep 21, 2021 | 4:42 PM

MHT CET 2021 Admit Card मुंबई: शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता घेण्यात येणाऱ्या राज्य सामायिक प्रवेश परीक्षेसाठीच्या पीसीबी ग्रुपचं प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहेत. प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी cetcell.mahacet.org या वेबसाईटवर लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. विविध अभ्यासक्रमांसाठीची सामायिक प्रेवश परीक्षा 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2021 या कालावधीत होत आहेत. आजपासून विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षांना सुरुवात होत आहे.

प्रवेशपत्र कसे डाऊनलोड करावे ?

♦ cetcell.mahacet.org या ऑफिशियल वेबसाईटवर जा

♦ तुम्ही ज्या सामायिक परीक्षेसाठी अर्ज केलेला आहे, त्या परीक्षेसमोरील प्रवेश पत्राच्या ऑप्शनवर क्लिक करा

♦ अर्ज क्रमांक तसेच जन्मतारीख टाकून लॉगिन करा

♦ लॉगिन केल्यानंतर तुम्हाला तुमचे प्रवेशपत्र समोर दिसेल

♦ हे प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घ्या. परीक्षेसाठी त्याचा उपयोग होईल.

आठ लाख विद्यार्थी परीक्षा देणार

सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी राज्यात एकूण 8 लाख 55 हजार 879 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या प्रवेश परीक्षांसाठी 226 केंद्रे निश्चित करण्यात आलेली आहेत. तसेच राज्याबाहेरील केंद्रांच्या संख्येतही या वर्षी वाढ करण्यात आलेली असून आणखी परीक्षा केंद्रांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

86 टक्के विद्यार्थ्यांना प्रथम विकल्पानुसार परीक्षा केंद्र

86 टक्के विद्यार्थ्यांना प्रथम विकल्पानुसार परीक्षा केंद्र देण्यात आले आहे.  तर 14 टक्के विद्यार्थ्यांना उर्वरित विकल्पानुसार परीक्षा केंद्र उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. प्रवेशाची नोंदणी प्रक्रिया अभ्यासक्रमनिहाय सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरु करण्यात येईल. अभ्यासक्रमनिहाय प्रवेश प्रक्रिया 15 ऑक्टोबर नंतर सुरु करण्यात येणार आहे.

सीईटी परीक्षेच्या तारखा पुढीलप्रमाणे

  1. मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लीकेशन, मास्टर हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी, मास्टर ऑफ आर्किटेक्चर, मास्टर ऑफ फिजीकल एज्युकेशन, बॅचलर ऑफ आर्टस, बॅचलर ऑफ सायन्स, बॅचलर ऑफ एज्युकेशन या परीक्षा 15 सप्टेंबर 2021 रोजी झाल्या आहेत.
  2. मास्टर ऑफ फिजीकल एज्युकेशन, मास्टर ऑफ बिजनेस ॲडमिनीस्ट्रेशन अँड मॅनेजमेंट स्टडी या परीक्षा दि. 16 ,17 व 18 सप्टेंबर 2021 रोजी झाल्या आहेत.
  3. बॅचलर ऑफ इंजिनिअरींग/टेक्नॉलाजी (B.E/B.TECH), बॅचलर ऑफ फार्मसी (B.Pharm/Pharm.D), ॲग्रीकल्चर अँड ॲलाईड कोर्स या परीक्षा दि. 20 सप्टेंबर 2021 ते 1 ऑक्टोबर 2021या दरम्यान होत आहेत.
  4. बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट केटरिंग टेक्नॉलॉजी, मास्टर ऑफ एज्युकेशन, बॅचलर ऑफ एज्युकेशन अँड मास्टर ऑफ एज्युकेशन, बॅचलर ऑफ लॉ (5 वर्ष),बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन या परीक्षा दि. 3 ऑक्टोबर 2021 रोजी होणार आहेत.
  5. बॅचलर ऑफ फिजीकल एज्युकेशन दि.4,5,6 आणि 7 ऑक्टोबर 2021 रोजी होणार आहेत. तसेच बॅचलर ऑफ लॉ-(3 वर्ष ) 4 व 5 ऑक्टोबर 2021,
  6. बॅचलर ऑफ एज्युकेशन जनरल अँड स्पेशल, या परीक्षा दि. 6 व 7 ऑक्टोबर 2021रोजी होणार आहेत.
  7. बॅचलर ऑफ फाईन आर्ट दि. 9 व 10 ऑक्टोबर 2021 रोजी होणार आहेत.

20 ऑक्टोबरपर्यंत निकाल जाहीर होणार

या परीक्षांचा निकाल 20 ऑक्टोबर पर्यंत जाहीर करण्यात येणार असून शैक्षणिक वर्ष 2021-22 नोव्हेंबरपासून सुरु होईल. हे शैक्षणिक वर्ष सुरु करताना राज्यातील त्या वेळेची कोरोनाची परिस्थिती पाहून ऑनलाईन सुरु करायचे की ऑफलाईन याबाबत निर्णय घेण्यात येईल.

इतर बातम्या :

NDA मध्ये महिलांच्या प्रवेशांसाठी तयारी सुरु, मे 2022 च्या परीक्षेत विद्यार्थिनींना संधी, सरकारची सुप्रीम कोर्टाला माहिती

फाटलेल्या नोटांबाबत मोठी बातमी, RBI ने सर्व बँकांच्या ग्राहकांना दिल्या ‘या’ सूचना

maharashtra cet 2021 admit card 2021 released for PCB Exam on Cetcell Mahacet org c know all details here

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.