TET Exam : टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांवर नवं संकट, पगार थांबवण्याच्या शिक्षण विभागाच्या सूचना, मुख्याध्यापकांना इशारा

2018 आणि 2020 च्या परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शालेय शिक्षण विभाग आता सतर्क झाला आहे.

TET Exam : टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांवर नवं संकट, पगार थांबवण्याच्या शिक्षण विभागाच्या सूचना, मुख्याध्यापकांना इशारा
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Jan 13, 2022 | 9:08 AM

मुंबई: पुणे सायबर पोलिसांना (Pune Cyber Police) आरोग्य भरती परीक्षेच्या तपासामध्ये टीईटी परीक्षा (TET exam Scam) 2020 आणि 2018 मध्ये घोटाळा झाल्याचे धागेदोरे मिळाले. आरोग्य भरती परीक्षेचा तपास करत असताना पुणे पोलिसांना टीईटी परीक्षेतील  गैरप्रकाराची लिंक लागली होती. त्यानंतर टीईटी परीक्षेबद्दल धक्कादायक खुलासे समोर आले. टीईटीमध्ये उत्तीर्ण करण्यासाठी आर्थिक देवाण-घेवाण झाल्याचं समोर आल्यानंतर राज्याचा शिक्षण विभाग (Education) आता सक्रिय झाला आहे. टीईटी प्रमाणपत्रांच्या पडताळणी नंतर शिक्षण विभागानं आता आणखी एक नवा आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांचे पगार बंद करण्यात यावेत, अशा सूचना शालेय शिक्षण विभागाने जारी केल्या आहेत. यापुढे जर टीईटी उत्तीर्ण नसणाऱ्या शिक्षकांचे पगार देण्यात आले तर संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांकडून ती रक्कम वसूल करण्यात येईल, असे देखील शिक्षण विभागाकडून कळविण्यात आले आहे.

2013 पासून टीईटी बंधनकारक

शिक्षणाचा हक्क अधिकार कायदा आल्यानंतर राज्यातील सर्व सर्व माध्यमांच्या आणि व्यवस्थापनाच्या अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षकांची नियुक्ती करायची असल्यास त्यांना टीईटी उत्तीर्ण असणे बंधनकारक करण्यात आलं होतं. त्यानंतर यासाठी 13 फेब्रुवारी 2013 ही तारीख निश्चित करण्यात आली होती ऑगस्ट 2018 मध्ये 24 ऑगस्ट 2018 चा जीआर नुसार नोकरीवर असणाऱ्या आणि नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना 30 मार्च 2019 पर्यंत टीईटी उत्तीर्ण होण्याचं बंधनकारक करण्यात आलं होतं. मात्र, काही शिक्षकांकडून टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्याबाबत दुर्लक्ष करण्यात आल्याचे देखील समोर आला होता.

टीईटी परीक्षेतील गैरप्रकारामुळे मुद्दा पुन्हा ऐरणीवर

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी टीईटी परीक्षेत घोटाळा केला असल्याचं समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. 2018 आणि 2020 च्या परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शालेय शिक्षण विभाग आता सतर्क झाला आहे. अपात्र असूनही नोकरीवर असलेल्या शिक्षकांनी विरोधात होता शालेय शिक्षण विभाग कारवाईचा बडगा उगारण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या:

Weather Alert : अवकाळी पावसाचं संकट कायम,आयएमडीकडून ॲलर्ट जारी; नंदुरबारमध्ये पारा 7 अंशावर

Mumbai Corona | 4 दिवसानंतर अचानकपणे वाढ! मुंबईत 16420 नवे कोरोनाग्रस्त, पॉझिटिव्हीटी दर 24.3 टक्क्यांवर, चिंता वाढली

Maharashtra Education department issue notice to not gave payments to teachers who not clear tet exam

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.