FYJC CET Exam Cancelled : मुंबई हायकोर्टाकडून अकरावीची सीईटी परीक्षा रद्द, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची पहिली प्रतिक्रिया…
राज्यात 11 प्रवेशसाठी होणारी सीईटी अर्थात प्रवेश परीक्षा रद्द करण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टाने हा महत्वाचा निकाल दिला. दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना 11 वी मध्ये प्रवेशासाठी 21 ऑगस्ट रोजी CET परीक्षा नियोजित होती.
मुंबई: राज्यात 11 प्रवेशसाठी होणारी सीईटी अर्थात प्रवेश परीक्षा रद्द करण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टाने हा महत्वाचा निकाल दिला. दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना 11 वी मध्ये प्रवेशासाठी 21 ऑगस्ट रोजी CET परीक्षा नियोजित होती. मात्र, हायकोर्टाने सर्व बाजू ऐकल्यानंतर प्रवेश परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.राज्य सरकारनं अकरावी सीईटी परीक्षेसाठी काढलेला अध्यादेश मुंबई हायकोर्टानं रद्द केला आहे. मुंबई हायकोर्टाचा निकाल वाचून पुढील निर्णय घेऊ, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.
वर्षा गायकवाड नेमकं काय म्हणाल्या?
अकरावीच्या प्रवेशासाठीची साईटी परीक्षेसंदर्भात आज हायकोर्टाने निर्णय दिला आहे. अकरावी अॅडमिशन प्रोसेससाठी पुढे काय करता येईल यासाठी आम्ही अभ्यास करतो आहे. उच्च न्यायालयानं काय म्हटलं आहे ते पाहून पुढील निर्णय घेऊ, असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी टीव्ही 9 मराठी सोबत बोलताना सांगितलं आहे.
अकरावीचे प्रवेश कसे होणार?
सीईटी परीक्षा रद्द करण्यासंदर्भात मुंबई हायकोर्टात निर्णय झाल्याचं ऐकलं आहे. हायकोर्टाचा निकाल मिळाल्यावर त्यामध्ये काय लिहिलय ते पाहावं लागेल. अंतर्गत मूल्यमापनाद्वारे लावण्यात आलेला निकाल मान्य करण्यात आला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांना अर्ज करण्यात आला नव्हता.गेल्या वर्षी विद्यार्थ्यांचे प्रवेश उशिरा झाला होता. यंदा आम्ही प्रवेश लवकर व्हावेत यासाठी निर्णय घेणार आहोत, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.
दहावीच्या गुणांवर अकरावीचे प्रवेश?
सध्याची कोविडची स्थिती पाहता हा निकाल देण्यात आला आहे. राज्य सरकारचा 28 मेचा निकाल रद्द ठरवतं सीईटी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. दहावीच्या गुणांवर अकरावीचे प्रवेश करण्याचे आदेश देण्याच आल्याचं समोर आलं आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता हायकोर्टानं हा निर्णय दिला आहे.
याचिका कुणी केली?
मुंबई हायकोर्टात राज्यात अकरावी प्रवेश बाबत सीईटी प्रवेश परीक्षा घेण्या संदर्भातील याचिकेवरील पुढील सुनावणी आज झाली. मुंबई हायकोर्टात राज्य सरकार तर्फे आशुतोष कुंभकोणी यांनी बाजू मांडली. राज्य सरकारनं अकरावी प्रवेशाबाबत 28 मे रोजी जारी केलेल्या परिपत्रकाला स्थगिती देण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. अनन्या पत्की या आयसीएससीच्या विद्यार्थिनीनं ही याचिका आपले वडील अॅड. योगेश पत्की यांच्यावतीनं मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. याचिकेवर शुक्रवारी न्यायमूर्ती आर.डी. धानुका आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली होती.
इतर बातम्या:
Class XI Exam : अकरावीच्या प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा हायकोर्टाकडून रद्द
अकरावीच्या सीईटीचा नवा पेच, नोंदणी संपल्यानंतर सीबीएसईचा निकाल, विद्यार्थ्यांची मुदतवाढ देण्याची मागणी
Maharashtra FYJC CET exam cancelled by Bombay High Court first comment of Education Minister Varsha Gaikwad