Maharashtra HSC Result 2021 Date: बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार, बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर

Maharashtra Board HSC 12th Exam Result 2021 Date and Time: बारावीचा निकाल https://hscresult.11 thadmission.org.in आणि  https://msbshse.co.in या वेबसाईटवर दुपारी 4 वाजता जाहीर होईल.

Maharashtra HSC Result 2021 Date: बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार, बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर
फाईल फोटो
Follow us
| Updated on: Aug 03, 2021 | 12:16 PM

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या निकालाचीही उत्सुकता (Maharashtra HSC Result 2021) वाढली आहे. महाराष्ट्र राज्य बोर्डाचा इयत्ता 12 वीचा निकाल मंगळवारी 3 ऑगस्टला दुपारी 4 वाजता जाहीर होणार आहे. बारावीच्या निकालापूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडून विद्यार्थ्यांचे परीक्षा क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. विद्यार्थी http://mh-hsc.ac.in या वेबसाईटवर भेट देऊन त्यांचा बैठक क्रमांक मिळवू शकतात.

कोविड 19च्या पार्श्वभूमीवर यावर्षी राज्य मंडळाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. दहावी, अकरावी व बारावीच्या अंतर्गत गुणमापन पध्दतीनुसार यावर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मुल्यमापन व मुल्याकंन एका वेगळ्या धर्तीवर केले होते व त्यानुसार गुणांकन करण्यात आले आहे. अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय प्राप्त गुण तसेच इ.12 वी चे अंतिम तोंडी/प्रात्यक्षिक/अंतर्गत व तत्सम मूल्यमापनातील प्राप्त गुण या नुसार निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

दुपारी 4 वाजता निकाल जाहीर होणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत सन 2021 मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा उपरोक्त निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार, दिनांक 3 ऑगस्टला दुपारी 4 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षा सन 2021 साठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट ) घेता येईल.

निकाल कुठे पाहायचा?

1. https://hscresult.11 thadmission.org.in

2. https://msbshse.co.in

3. hscresult.mkcl.org

4. mahresult.nic.in.  

www.mahresult.nic.in व https://msbshse.co.in या संकेतस्थळावर विदयार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.

तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

 बारावीचा निकाल कसा पाहाल ?

?निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या कोणत्याही वेबसाईटवर जा.

?त्यानंतर तुम्हाला HSC BOARD RESULT नावाचा ऑप्शन दिसेल.

?त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर स्पेसशिवाय टाईप करावा लागेल.

?त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाकावी लागतील. म्हणजेच समजा तुमचा नंबर M123456 असा असेल आणि तुमच्या आईचे नाव रेश्मा असेल, तर तुमच्या पहिल्या रकान्यात M123456 हा सीट नंबर येईल आणि दुसऱ्या रकान्यात आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे म्हणजेच RES असे लिहावे लागेल.

?यानंतर लगेचच तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर पाहाता येईल

?निकाल पाहिल्यानंतर तुम्हाला तो डाऊनलोडही करता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.

बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनातील गुणांना सर्वाधिक वेटेज

बारावी निकालासंदर्भात जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाला सर्वाधिक वेटेज दिलं गेलं आहे. बारावी निकाल जाहीर करण्यासाठी महाविद्यायांना या शासन निर्णयाचा आधार घ्यावा लागणार आहे. बारावीच्या परीक्षेला बसलेले खासगी विद्यार्थी, पुन्हा परीक्षा देणारे विद्यार्थी यांच्यासाठी वेगळा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला आहे. त्यासंबंधी अधिक माहिती शासन निर्णयात पाहायला मिळेल.

संबंधित बातम्या:

Maharashtra HSC Result 2021: बोर्डाकडून बारावीचे बैठक क्रमांक जाहीर, सीट नंबर कसा मिळवायचा? वाचा सोप्या टिप्स

Maharashtra HSC Result 2021: बारावीच्या निकालाचा फॉर्म्युला ठरला, शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.