HSC SSC Exam : दहावी बारावीच्या परीक्षांची तयारी अंतिम टप्प्यात, प्रात्याक्षिक परीक्षेवरील संकटही टळलं

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यावतीनं दहावी (SSC Exam) आणि बारावीच्या (HSC) परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येणार आहे. या परीक्षांची तयारी अंतिम टप्प्यात आहे.

HSC SSC Exam : दहावी बारावीच्या परीक्षांची तयारी अंतिम टप्प्यात, प्रात्याक्षिक परीक्षेवरील संकटही टळलं
संग्रहित छायाचित्र Image Credit source: File Photo
Follow us
| Updated on: Feb 14, 2022 | 5:35 PM

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यावतीनं दहावी (SSC Exam) आणि बारावीच्या (HSC) परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येणार आहे. या परीक्षांची तयारी अंतिम टप्प्यात आहे. दहावी आणि बारावी परीक्षांसाठी (HSC Exam) बोर्डाकडून तयारी करण्यात आली आहे. कोरोना संसर्गामुळे यावेळी परीक्षा केंद्र वाढवण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडून सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक घेण्यात आली आहे. यावेळी शाळा तिथं केंद्र अशी व्यवस्था करण्यात आल्यानं बोर्डानं मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. तर, दुसरीकडे बारावीच्या प्रात्याक्षिक परीक्षा आजपासून सुरु आहेत. शाळा व्यवस्थापनांच्यावतीनं प्रात्याक्षिक परीक्षांबाबत करण्यात आलेलं असहकार आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. मात्र, लेखी परीक्षेवरील संकट अद्याप कायम आहे.

दहावी आणि बारावीची परीक्षेची तयारी अंतिम टप्प्यात

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डानं मुख्याध्यापक महामंडळाची बैठक घेतली. यावर्षी शाळा तिथं केंद्र असल्यानं बोर्डानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोरोना नियमांच तंतोतंत पालन करा, असं आदेश बोर्डाकडून देण्यात आले आहेत. परीक्षेदरम्यान बोर्डाकडून लागेल ती मदत पुरवली जाईल. परीक्षा व्यवस्थित पार पाडा, असे आदेश बोर्डाकडून महामंडळाला देण्यात आले आहेत. केंद्रावरील पर्यवेक्षकांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे. यंदा जवळपास 31 लाख विद्यार्थी दहावी आणि बारावीची परीक्षा देणार आहेत. परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार असल्यानं बोर्डाकडून जोरात तयारी करण्यात येत आहे.

प्रात्याक्षिक परीक्षांवरील संकट टळलं

राज्य मंडळाच्या प्रात्यक्षिक परीक्षांवरील संकट टळलं आहे. संस्थाचालक महामंडळानं असहकार आंदोलन मागं घेतलं आहे. राज्य सरकारशी चर्चा केल्यावर संघटनेने परीक्षेवरील बहिष्कार मागे घेतला आहे. त्यामुळे आजपासून होणाऱ्या प्रात्यक्षिक परीक्षांवरील संकट टळलं आहे. पण, लेखी परीक्षांवरचे संकट अद्याप कायम आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शाळांना वेतनेतर अनुदान मिळालं नसल्यानं संस्थाचालक महामंडळानं आंदोलनाची भूमिका घेतली.

बारावीच्या लेखी आणि प्रात्याक्षिक परीक्षा आजपासून

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडून बारावीच्या परीक्षा 4 मार्च ते 30 मार्च या कालावधीत घेण्यात येणार आहेत. तर प्रात्याक्षिक परीक्षा, श्रेणी परीक्षांना आजपासून सुरुवात होत आहे. या परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्च मध्ये होतील. कोरोना आणि इतर कारणामुळं अडचण आल्यास 31 मार्च ते 18 एप्रिल या कालावधीत प्रात्यक्षिक परीक्षा होतील. दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेसाठी कोरोनोमुळं मंडळ परीक्षा शुल्क आकारणार नाही. दहावीची परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत घेण्यात येणार आहेत. प्रात्याक्षिक, तोडी परीक्षा 25 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत परीक्षा होईल. काही कारणामुळं प्तात्याक्षिक परीक्षा देता आली नाही तर 5 एप्रिल ते 22 एप्रिल पर्यंत होतील. मंडळाच्या परीक्षा ठरलेल्या काळातचं होतील.

इतर बातम्या :

ISRO : इस्त्रोकडून वर्षातील पहिली मोहीम फत्ते, PSLV-C52 चं यशस्वी प्रक्षेपण, पाहा Video

Valentine’s Day | राजीवजी.. तुम्ही जिथे असाल, तुम्हाला एकच सांगते, पतीच्या आठवणींनी डॉ. प्रज्ञा सातव हळव्या

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.