School Close : कोरोनाचं वाढतं संकट, सिंधुदुर्ग रत्नागिरीतही शाळा बंद; ऑनलाईन शिक्षण सुरु
महाराष्ट्राच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागानं महाविद्याय 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. याशिवाय राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये शाळा बंद (School Close) करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.
सिंधुदुर्ग : महाराष्ट्रात (Maharashtra ) कोरोना (Corona) आणि ओमिक्रॉन (Omicron) वेरियंटचे रुग्ण वाढत असून तिसऱ्या लाटेचं संकट निर्माण झालंय. महाराष्ट्राच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागानं महाविद्याय 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. याशिवाय राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये शाळा बंद (School Close) करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. आता सिंधुदुर्ग (Sindhudurg) आणि रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात देखील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता दोन्ही जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन शिक्षण सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सिंधुदुर्गमधील शाळा बंद
सिंधुदुर्गमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या सर्व शाळा गुरुवार 6 जानेवारीपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू असल्याने लसीकरण पूर्ण झाल्यावर माध्यमिक शाळा बंद करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. तसेच कोविड सेंटर सुरू करण्याच्या सूचनाही तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे.
रत्नागिरीत देखील शाळा बंद
रत्नागिरी जिल्ह्यातही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यातील शाळा आजपासून बंद होत आहेत. रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा बंदचे आदेश दिले आहेत. पहिलीपासून ते बारावीपर्यतचे वर्ग बंद राहणार आहेत. रत्नागिरीमध्ये आता ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. बी. एन पाटील यांनी दिली. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, पुणे, औरंगाबाद, नागपूर जिल्ह्यातील शाळांबाबत यापूर्वीच निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या 26 हजारांवर
राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 26 हजारांच्या पार गेला आहे. मंगळवारी आलेल्या माहितीनुसार 24 तासात तब्बल 26 हजार 538 रुग्ण कोरोना आढळून आले आहेत. महाराष्ट्रातील ओमिक्रॉन बाधितांच्या संख्येत आणखी 144 जणांची भर पडली. राज्यात आतापर्यंत 797 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 330 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
इतर बातम्या:
Biodiversity | जैवविविधता मंडळाची दशकपूर्ती; माहितीच्या संकलनाची बँक काय असते समजून घ्या
Corona, Omicron Cases Maharashtra LIVE : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती, सिंधुदुर्गमध्ये शाळा बंद
Maharashtra record hike in corona cases Sindhudurg and Ratnagiri Collector to close school start online Education