Maharashtra SSC exam hearing: दहावीच्या परीक्षा होणार की नाही? मुंबई हायकोर्टातील सुनावणी नेमकं काय घडलं?

| Updated on: Jun 01, 2021 | 3:41 PM

दहावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाविरोधातील धनंजय कुलकर्णींच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी होत आहे. (Maharashtra SSC exam Bombay High Court)

Maharashtra SSC exam hearing: दहावीच्या परीक्षा होणार की नाही? मुंबई हायकोर्टातील सुनावणी नेमकं काय घडलं?
Bombay High Court

मुंबई: केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर राज्य सरकारनं देखील दहावीच्या परीक्षा रद्द (Maharashtra SSC Exam) करण्याचा निर्णय जाहीर केला. महाराष्ट्र सरकारच्या (Maharashtra Government) या निर्णयास पुणे येथील निवृत्त प्राध्यापक धनंजय कुलकर्णी (Dhananjay Kulkarni) यांनी जनहित याचिकेद्वारे आव्हान दिलं. राज्य सरकारचा दहावी परीक्षेबाबतचा निर्णय रद्द ठरवावा, अशी मागणी त्यांनी केली. मुंबई हायकोर्टाचे (Bombay High Court) मुख्य न्यायधीश दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती एजी कुलकर्णी यांच्या समोरील आजची सुनावणी संपली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी गुरुवार म्हणजेच 3 जून रोजी होणार आहे.  (Maharashtra SSC exam Bombay High Court start hearing Live Updates on petition of Dhananjay Kulkarni to cancel state government decision on SSC exam)

याचिकाकर्त्यांना नवा अहवाल सादर करण्याचे आदेश

दहावीच्या परीक्षेसंदर्भातील राज्य सरकारचा निर्णय कायम ठेवावा या मागणीसाठी उच्च न्यायालयात इंटर्व्हेन्शन याचिका दाखल झाल्या आहेत. दोन वेगवेगळ्या हस्तक्षेप याचिका दाखल झाल्यानं निर्णय देण्यास हायकोर्टानं नकार दिला. एकच याचिका फक्त परीक्षा घ्या या बाजूची, जी धनंजय कुलकर्णी यांनी दाखल केली होती. दहावीतील एक विद्यार्थी आणि दोन पालकांचा परीक्षेस नकार देणारी याचिका दाखल झाली आहे.  सरकारने काढलेल्या निर्णयाला जोडून न्यायालयात अहवाल सादर करा, असं याचिकाकर्ते धनंजय कुलकर्णींना कोर्टानं सांगितलं आहे.

अंतिम निकाल गुरुवारी येणार

मुंबई हायकोर्टानं सुप्रीम कोर्टातील सीबीएसई परीक्षेसंदर्भातील याचिकेच्या निर्णयाच्या अनुषंगानं पुढील सुनावणी 3 जून रोजी घेण्याचं ठरवलं आहे.   ज्य सरकारने काही दिवसांपूर्वी अध्यादेश काढून परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला होता.

 रीशान सरोदे यांची याचिका

मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी या दोन न्यायमुर्तींसमोर सुनावणीला सुरुवात झाली आहे. पुण्यातील रीशान सरोदे यानं देखील याचिका  दाखल केली आहे.  ज्येष्ठ विधीज्ञ असीम सरोदे  यांनी रीशान सरोदेच्यावतीनं बाजू मांडली. ऑनलाईन पद्धतीने सुनावणी झाली.

कुलकर्णींच्या याचिकेवर इंटर्व्हेन्शन याचिका

बालहक्क कार्यकर्त्या अनुभा श्रीवास्तव सहाय यांनी हाय कोर्टात कुलकर्णी यांची याचिका फेटाळून लावावी. राज्य सरकारचा निर्णय रद्द करु नये. जगभर कोरोनामुळे परीक्षा रद्द होत आहेत. विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या गुणांवर प्रमोट केल जातं आहे, असं अनुभा श्रीवास्तव यांनी त्यांच्या याचिकेत म्हटलं आहे.

दहावीपेक्षा बारावीच्या परीक्षा महत्वाच्या

शिक्षण विभागानं हायकोर्टात प्रतित्रापत्र सादर करुन दहावीचा निकाल जाहीर करण्यासंबधी निकष आणि सरकारची बाजू कोर्टात मांडली आहे. यावेळी दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये फरक असतो. दहावी पेक्षा बारावीच्या परीक्षा महत्वाच्या असतात, अशी बाजू सरकारनं मांडली आहे.

दहावीच्या परीक्षा घेणं शक्य नाही

मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलंच फटकारलं आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला, असा सवाल उच्च न्यायालयाने विचारला होता. तसंच आपली बाजू मांडण्याचे आदेशही शिक्षण विभागाला दिले होते. त्याबाबत राज्य सरकारकडून मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलंय. 10 वी परीक्षा घेणं शक्य नसल्याचं राज्य सरकारकडून सांगण्यात आलंय.

संबंधित बातम्या:

SSC exam: दहावीपेक्षा बारावीच्या परीक्षा महत्वाच्या, हायकोर्टात राज्य सरकारचं प्रतित्रापत्र, आज सुनावणीची शक्यता

मोठी बातमी, केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांची प्रकृती बिघडली, बारावी परीक्षांचा निर्णय लांबणीवर पडणार?

(Maharashtra SSC exam Bombay High Court start hearing Live Updates on petition of Dhananjay Kulkarni to cancel state government decision on SSC exam)

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 01 Jun 2021 03:29 PM (IST)

    मुंबई हायकोर्ट गुरुवारी अंतिम निर्णय घेणार, धनंजय कुलकर्णींना अहवाल सादर करण्याचे आदेश

    दोन वेगवेगळ्या हस्तक्षेप याचिका दाखल झाल्यानं निर्णय देण्यास नकार,

    एकच याचिका फक्त परीक्षा घ्या या बाजूची, जी धनंजय कुलकर्णी यांनी दाखल केली होती,

    दहावीतील एक विद्यार्थी आणि दोन पालकांचा परीक्षेस नकार,

    सरकारने काढलेल्या निर्णयाला जोडून न्यायालयात अहवाल सादर करा, याचिकाकर्ते धनंजय कुलकर्णींना कोर्टानं सांगितलं,

    अंतिम निकाल गुरुवारी येणार,

  • 01 Jun 2021 03:22 PM (IST)

    मुंबई हायकोर्टातील दहावी परीक्षेसंदर्भातील सुनावणी गुरुवारपर्यंत स्थगित

    मुंबई हायकोर्टातील दहावी परीक्षेसंदर्भातील सुनावणी गुरुवारपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.

  • 01 Jun 2021 03:17 PM (IST)

    धनंजय कुलकर्णींच्या याचिकेविरोधात इंटर्व्हेन्शन याचिका दाखल

    धनंजय कुलकर्णींच्या याचिकेविरोधात इंटर्व्हेन्शन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

  • 01 Jun 2021 03:14 PM (IST)

    मुंबई हायकोर्टात दहावी परीक्षेसंदर्भात सुनावणीला सुरुवात

    मुंबई हायकोर्टात दहावी परीक्षेसंदर्भात धनंजय कुलकर्णी यांच्या जनहित याचिकेवर सुनावणीला सुरुवात झाली आहे.

Published On - Jun 01,2021 3:29 PM

Follow us
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.