SSC HSC supplementary Exam: दहावी बारावीच्या पुरवणी परीक्षा सुरु, परीक्षा केंद्र परीसरात मनाई आदेश लागू

विभागीय सचिव, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून  माहे सप्टेंबर-ऑक्टोबर 2021 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी बारावीच्या पुरवणी परीक्षांची प्रक्रिया सुरु झाली आहे.

SSC HSC supplementary Exam: दहावी बारावीच्या पुरवणी परीक्षा सुरु, परीक्षा केंद्र परीसरात मनाई आदेश लागू
दहावी बारावी बोर्ड
Follow us
| Updated on: Sep 18, 2021 | 11:23 AM

पालघर: विभागीय सचिव, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून  माहे सप्टेंबर-ऑक्टोबर 2021 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी बारावीच्या पुरवणी परीक्षांची प्रक्रिया सुरु झाली आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ. 12 वी) व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ. 10 वी) दि. 16/09/2021 ते दि. 11/10/2021 या कालावधीमध्ये एच.एस.सी. (12 वी) व दि.22/09/2021 ते दि.08/10/2021 या कालावधीत एस. एस. सी. (10 वी) च्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. परीक्षांच्या कालावधीमध्ये परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरात मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यात इयत्ता 12 वी च्या (04 परीक्षा केंद्रावर) व इयत्ता 10 वी च्या (07 परीक्षा केंद्रावर) परीक्षा घेण्यात येणार असून 06 परीरक्षण केंद्रे आहेत, असे कळविले आहे. पालघर जिल्ह्यातील परीक्षा केंद्र परीसरात मनाई आदेश लागू केल्याची माहिती आहे.

पालघरमध्ये कुठं होणार परीक्षा?

वसई तालुका वगळता पालघर जिल्ह्यात इयत्ता 12 वी च्या (02 परीक्षा केंद्रावर) व इयत्ता 10 वी च्या (04 परीक्षा केंद्रावर) परीक्षा घेण्यात येणार असून 04 परीरक्षण केंद्रे असून उपरोक्त परीक्षा कालावधीमध्ये परीरक्षण केंद्र, परीक्षा केंद्र/उपकेंद्र व परीसरात काही असामाजिक तत्वे परीक्षा प्रक्रियेत गैर व्यवहार व बाधा निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच परीक्षा केंद्राच्या परीसरातील झेरॉक्स सेंटर, फॅक्स सेंटर, टेलीफोन बुथ, कम्युनिकेशन सेंटर या ठिकाणाहून गैरप्रकार होण्याची शक्यता असून बेकायदेशीर जमाव जमून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान अगर शांतता भंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. करीता या अपप्रक्रियांना प्रतिबंध घालणे जरूरीचे आहे.

मनाई आदेश लागू

अपर जिल्हादंडाधिकारी पालघर, डॉ. किरण महाजन यांना फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 (1) (2) (3) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन पालघर जिल्ह्यातील (वसई तालुका वगळून) उर्वरीत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ. 12वी) व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ. 10 वी) परीक्षेच्या परीक्षा केंद्र, उपकेंद्र व परीरक्षण केंद्र यांच्या सभोवताली 100 मीटर परिसरात परीक्षा प्रक्रियेशी संबंधीत विभागांचे अधिकारी व कर्मचारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी, तसेच अंध व अपंग परीक्षार्थी यांचे बरोबर आलेले नातेवाईकांखेरीज इतर बेकायदेशीर जमावास फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1)(2)(3) अन्वये दि. 11/10/2021 रोजीचे 24.00 वाजेपर्यंतच्या कालावधीत परीक्षा केंद्रावर व उपकेंद्राच्या ठिकाणी परीक्षेच्या वेळापत्रकाप्रमाणे तसेच परिरक्षण केंद्राच्या ठिकाणी पूर्ण कालावधीकरीता प्रवेश करण्यास मनाई आदेश लागू करीत आहे.

अकरावी प्रवेशाची विशेष फेरी सुरु

अकरावी प्रवेशाच्या तिसऱ्या नियमित फेरीच्या प्रवेशाची मुदत संपली असून आता विशेष फेरीअंतर्गत महाविद्यालयीन कोट्यातून प्रवेश सुरु होतील. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. नियमित फेरीअंतर्गत पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये केंद्रीय प्रवेश प्रक्रियेअंतर्गत 2 लाख 14 हजार 806 विद्यार्थ्यांनी अकरावीला प्रवेश घेतला आहे. विशेष फेरीचे प्रवेश 25 सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहेत. विद्यार्थ्यांनी विशेष फेरीअंतर्गत प्रवेश घ्यावेत, असं आवाहन वर्षा गायकवाड यांनी केलं आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरण, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, अमरावती , नाशिक येथील प्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रवेश पद्धतीनं सुरु आहे. अकरावी प्रवेशाच्या पहिल्या तीन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत.

इतर बातम्या:

FYJC Admission : अकरावी प्रवेशाच्या तीन फेऱ्या पूर्ण, विशेष फेरीअंतर्गत प्रवेश ‘या’ तारखेपर्यंत सुरु राहणार, वर्षा गायकवाड यांचं ट्विट

उज्ज्वला गॅस योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ, अमित शाहांच्या हस्ते उद्घाटन, मोफत गॅस कसा मिळवाल?

Maharashtra SSC HSC Supplementary Exam started administration issue Restriction order on Palghar exam Center

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.