Maharashtra TET 2021: टीईटी परीक्षेसाठी अर्ज करण्यास उरले 2 दिवस, अर्ज कुठे करायचा? वाचा सविस्तर

टीईटी परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी अखेरचे काही तास शिल्लक राहिले आहेत. 25 ऑगस्टपर्यंत टीईटी परीक्षेसाठी अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल करणं आवश्यक आहे.

Maharashtra TET 2021: टीईटी परीक्षेसाठी अर्ज करण्यास उरले 2 दिवस, अर्ज कुठे करायचा? वाचा सविस्तर
महा टीईटी
Follow us
| Updated on: Aug 23, 2021 | 5:59 PM

मुंबई: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) 10 ऑक्टोबरला  होणार आहे. शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी परीक्षा बऱ्याच कालावधी नंतर घेण्यात येत आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या कारणामुळे ही परीक्षा लांबणीवर पडली होती. टीईटी परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया 3 ऑगस्टपासून झाली होती. टीईटी परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी अखेरचे काही तास शिल्लक राहिले आहेत. 25 ऑगस्टपर्यंत टीईटी परीक्षेसाठी अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल करणं आवश्यक आहे.

टीईटी परीक्षचे दोन पेपर

साधारपणे टीईटी परीक्षेचे दोन पेपर असतात. यामध्ये एक 1 ली ते 5 वी आणि 6 वी ते 8 वी इयत्तेतील शिक्षक भरतीसाठी ही परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली आहे. अशा दोन गटांसाठी ही परीक्षा घेण्यात येते. काही विद्यार्थी एका गटाची परीक्षा देतात तर काही विद्यार्थी दोन्ही गटांसाठीची परीक्षा देतात

शिक्षक पात्रता परीक्षा ही दोन स्तरावर

प्राथमिक स्तर ( पेपर एक I) इ. १ ली ते इ. ५ वी वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी उच्च प्राथमिक स्तर (पेपर-दोन II) इ. ६ वी ते इ. ८ वी या वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी प्राथमिक व उच्च प्राथमिक या दोन्ही स्तरावर अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी दोन्ही पेपर अनिवार्य असतील.

अर्ज कुठे करायचा?

टीईटी परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतली जाते. महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेच्या वेबसाईटवर https://mahatet.in/ अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 3 ऑगस्टपासून सुरु होईल.

टीईटी परीक्षेचं वेळापत्रक

1 )ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी 03/08/2021 ते 25/08/2021 वेळ 23.59 वाजेपर्यंत 2)प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे. 25/09/2021 ते 10/10/2021 3)शिक्षक पात्रता परीक्षा पेपर – I दिनांक व वेळ 10/10/2021 वेळ स. 10:30 ते दु 13:00 4)शिक्षक पात्रता परीक्षा पेपर – II दिनांक व वेळ 10/10/2021 वेळ दु. 14:00 ते सायं. 16:30

परीक्षा शुल्क

सर्वसाधारण, इ.मा.व., वि.मा.प्र., वि.जा. / भ.ज. व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांसाठी परीक्षेच्या एका पेपरचं शुल्क 500 रुपये तर दोन्ही पेपरचं एकत्रित शुल्क 800 रुपये आहे. तर अनु.जाती, अनु.जमाती व दिव्यांग उमेदवारांसाठी एका पेपरचं शुल्क 250 रुपये तर दोन्ही पेपरचं शुल्क 400 रुपये असेल.

पात्रता

टीईटीचा पेपर क्रमांक 1 देण्यासाठी दोन वर्षांचा शिक्षणशास्त्र विषयातील डिप्लोमा म्हणजेच डीएड उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्याशिवाय दुसऱ्या पेपरसाठी डी.एड उत्तीर्ण असणारे उमेदवार, पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक, शिक्षणशास्त्र विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

इतर बातम्या:

Breaking: 40 हजार शिक्षकांची भरती, MAHA TET परीक्षेचा कालावधी ठरला, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

ठाकरे सरकारकडून MAHA TET परीक्षेची घोषणा, संपूर्ण प्रक्रिया कशी असेल? वाचा सविस्तर

Maharashtra State Education Council Maha tet exam registration last date near students can register mahatet.in check details here

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.