HSC SSC Exam : दहावी बारावीच्या परीक्षा एप्रिलमध्ये घ्या, बच्चू कडूंच्या अधिकाऱ्यांना सूचना

दहावी आणि बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्यात याव्यात, अशा सूचना बच्चू कडू यांनी दिल्या आहेत. राज्यातील शिक्षण उपसंचालकांच्या बैठकीत त्यांनी या सूचना केल्या.

HSC SSC Exam : दहावी बारावीच्या परीक्षा एप्रिलमध्ये घ्या, बच्चू कडूंच्या अधिकाऱ्यांना सूचना
राज्यमंत्री बच्चू कडूImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Jan 29, 2022 | 8:29 AM

मुंबई : राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी दहावी (SSC) आणि बारावी (HSC) परीक्षांसदर्भात महत्तवाचं वक्तव्य केलं आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्यात याव्यात, अशा सूचना बच्चू कडू यांनी दिल्या आहेत. राज्यातील शिक्षण उपसंचालकांच्या बैठकीत बच्चू कडू यांनी या सूचना केल्या. राज्यातील कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण राज्यमंत्री यांनी या सूचना दिल्याचं कळतंय. बच्चू कडू यांच्या सूचनांवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ काय भूमिका घेणार हे पाहावं लागणार आहे. याशिवाय राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड काय भूमिका घेणार हे पाहावं लागणार आहे. इयत्ता बारावीची लेखी परीक्षा ही 4 मार्च ते 30 मार्च दरम्यान होणार आहे. तसेच इयत्ता दहावीची लेखी परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिलदरम्यान होणार आहे.

बच्चू कडूंच्या सूचना, वर्षा गायकवाड काय भूमिका घेणार

दहावी आणि बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्याच्या सूचना शालेय शिक्षण राज्य मंत्री बच्चू कडू यांनी दिल्या आहेत. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड कोणती भूमिका घेणार हे पाहावं लागणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून प्रात्याक्षिक परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. बच्चू कडूंच्या सूचनांवर कोणता निर्णय होणार हे पाहावं लागणार आहे.

दहावी बारावीचं नियोजित वेळापत्रक

इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा 14 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहेत. इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधित घेतली जाणार आहे. तर इयत्ता दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा 25 फेब्रुवारी ते 14 मार्च या कालावधित घेतली जाणार आहे. इयत्ता बारावीची लेखी परीक्षा ही 4 मार्च ते 30 मार्च दरम्यान होणार आहे. तसेच इयत्ता दहावीची लेखी परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिलदरम्यान होणार आहे.

दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईन

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी यांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांना माहिती दिली होती.दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्याचं निश्चित असून वेगळा निर्णय घेण्यात आलेला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचं लसीकरण जानेवारी महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचं टार्गेट असल्याचं त्यावेळी सांगितलं होतं.

इतर बातम्या:

HSC SSC Exam Date | इयत्ता दहावी, बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या कधीपासून परीक्षा सुरु होणार ?

HSC SSC : कोरोना रुग्णवाढीचं दहावी बारावीच्या पूर्व परीक्षांवर संकट, ऑफलाईन की ऑनलाईन शाळांसमोर पेच

Maharashtra State Education Minister Bacchu Kadu gave instructions to officer conduct exam of SSC HSC in April

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.