यंदा 8 ते 10 दिवस आधी बोर्डाच्या परीक्षा होणार, दहावी आणि बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर

SSC and HSC Exam Timetable : महाराष्ट्रातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा या यंदा 8 ते 10 दिवस आधीच आयोजित होण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. या वेळापत्रकानुसार नेहमीपेक्षा यंदाच्या शैक्षणिक वर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षा या आठ ते दहा दिवस आधी आयोजित होण्याची शक्यता आहे.

यंदा 8 ते 10 दिवस आधी बोर्डाच्या परीक्षा होणार, दहावी आणि बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर
Follow us
| Updated on: Aug 12, 2024 | 6:39 PM

महाराष्ट्रातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. या वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या काळात होणार आहे. तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या काळात होणार आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे याबाबत प्रसिद्धी पत्रक जारी करत माहिती देण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवडयात आणि माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवडयात आयोजित केल्या जातात. सदर परीक्षांचा ऑनलाईन निकाल अनुक्रमे मे अखेरीस आणि जूनच्या पहिल्या आठवडयात जाहीर करण्यात येतो. त्यानंतर अनुत्तीर्ण तसेच श्रेणीसुधार अंतर्गत प्रविष्ट विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्टची पुरवणी परीक्षा साधारणतः जुलैच्या तिसऱ्या आठवडयापासून घेतली जाते.

विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया वेळेवर होणे, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा या मंडळाच्या परीक्षेनंतर आयोजित केल्या जात असल्याने अशा परीक्षांचा अभ्यास करण्यास विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा तसेच पुरवणी परीक्षा लवकर घेवून त्याचा निकाल लवकर जाहीर करणे, या बाबींचा सारासार विचार करता येत्या २०२५ ची फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणारी इ.१२वी आणि इ.१०वीची परीक्षा नेहमीपेक्षा ८ ते १० दिवस आधी आयोजित करण्याचा मंडळाचा मानस आहे. त्याअनुषंगाने लेखी, प्रात्यक्षिक आणि इतर परीक्षा ठरलेल्या तारखांना घेण्याचे नियोजित आहे, असं मंडळाने म्हटलं आहे.

लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा कालावधी

  • उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षा (सर्वसाधारण व व्दिलक्षी विषय) व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम – मंगळवार, दि. ११ फेब्रुवारी, २०२५ ते मंगळवार, दि १८ मार्च २०२५
  • प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन – शुक्रवार, दि. २४ जानेवारी २०२५ ते सोमवार, १० फेब्रुवारी २०२५
  • माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षा – शुक्रवार, दि. २१ फेब्रुवारी, २०२५ ते सोमवार दि. १७ मार्च, २०२५
  • प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन – सोमवार, ०३ फेब्रुवारी २०२५ ते गुरूवार, २० फेब्रुवारी २०२५

शाळा / कनिष्ठ महाविद्यालय आणि विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याचे हेतूने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याचे दृष्टीने फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षेच्या वरीलप्रमाणे नियोजित तारखा जाहीर करण्यात येत आहे. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व लेखी परीक्षांचे सविस्तर विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे मंडळाच्या संकेतस्थळावर यथावकाश जाहीर करण्यात येईल. सदर तारखांबाबत काही सूचना, हरकती असल्यास त्या शुक्रवार, दि.२३.०८.२०२४ पर्यंत secretary.stateboard@gmail.com या संकेत स्थळावर पाठवाव्यात. या तारखेनंतर प्राप्त होणाऱ्या सूचनांवर विचार केला जाणार नाही, असं मंडळाकडून आवाहन करण्यात आलं आहे.

Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.