Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंजिनिअर होणं आणखी सोपं, इंग्रजीचं टेन्शन मिटणार, आता मराठी भाषेतून शिक्षण मिळणार

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या निर्णयानुसार भारतातील प्रादेशिक भाषेतून अभियांत्रिकी अभ्यासक्रमांचं शिक्षण देण्यात येणार आहे.

इंजिनिअर होणं आणखी सोपं, इंग्रजीचं टेन्शन मिटणार, आता मराठी भाषेतून शिक्षण मिळणार
प्रतिकात्मक फोटो
Follow us
| Updated on: Jun 30, 2021 | 4:20 PM

मुंबई: अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या निर्णयानुसार भारतातील प्रादेशिक भाषेतून अभियांत्रिकी अभ्यासक्रमांचं शिक्षण देण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टाची परवानगी मिळाल्यानंतर मातृभाषेतून अभियांत्रिकी शिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठ आणि पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये पहिल्या टप्प्यात या अभ्यासक्रमांची सुरुवात होणार आहे. मुंबई विद्यापीठानं मंगळवारी झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला. (Maharashtra Students now study engineering in Marathi Language at Mumbai University and Pune)

मुंबई आणि पुण्यातील महाविद्यालयात मराठी भाषेतून अभ्यासक्रम सुरु

पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, मुंबई विद्यापीठानं देखील मराठी भाषेतून अभ्यासक्रम सुरु करण्यास मंजुरी दिली आहे. मंगळवारी मुंबई विद्यापीठाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्येही मराठीतून अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहे.

मुंबई आणि पुण्यातील महाविद्यालयातून अभियांत्रिकीचं मराठी भाषेतून शिक्षण सुरु करण्यात आलं आहे. मराठीतून अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम सुरु झाल्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. इंग्रजीतून अभ्यासक्रम शिकवला जात असल्यानं अनेक विद्यार्थी अभियांत्रिकीला प्रवेश घेण्यास टाळाटाळ करायचे मात्र, भाषेची अडचण दूर झाल्यानं प्रवेशाची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

पहिल्या टप्प्यात या भाषांतून शिक्षण

अखिल बारतीय तंत्रशिक्षण परिषदेनं पहिल्या टप्प्यात आठ प्रादेशिक भाषांमधून अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम सुरु करण्यास परवानगी दिली आहे. यामध्ये मराठी, हिंदी, तामीळ, तेलुगु, गुजराती, कन्नड, मल्याळम या भाषांचा समावेश आहे.

ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी निर्णय

अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढावेत म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक हुशार विद्यार्थी इंग्रजी भाषेच्या भीतीमुळे अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना प्रवेश घेत नाहीत. त्यांना या निमित्तानं मातृभाषेतून अभियंता होण्याची संधी निर्माण झाली आहे.

पहिल्या टप्प्यात 500 अर्ज

मातृभाषेतून अभियांत्रिकीचे अभ्यासक्रम सुरु करावेत म्हणून एआयसीटईकडे 500 अर्ज दाखल झाले आहेत. विद्यार्थी त्यांच्या मातृभाषेतून एखादा विषय शिकल्यास तो चांगल्या प्रकारे समजून घेतो, असं एआयसीटीईचे चेअरमन अनिल सहस्त्रबुद्धे यांनी म्हटलं. पुढील काळात आणखी भारतीय भाषांमध्ये अभियांत्रिकी शिक्षण सुरु होणार आहे.

संबंधित बातम्या:

ICAI CA Exams 2021: सीएच्या परिक्षांना सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील, आयसीएआयला दिलासा, कोर्टात नेमकं काय घडलं?

शालेय फीचा प्रश्न पेटला, ऐरोलीत पालक शाळेविरोधात रस्त्यावर; सानपाड्यात पालकांना वकिलांकडून नोटिसा

(Maharashtra Students now study engineering in Marathi Language at Mumbai University and Pune)

राज्यपाल, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून चैत्यभूमीवर अभिव
राज्यपाल, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून चैत्यभूमीवर अभिव.
वाडा तालुक्यात पाणीबाणी; पाण्यासाठी रात्रभर महिलांचा बोरिंगवर मुक्काम
वाडा तालुक्यात पाणीबाणी; पाण्यासाठी रात्रभर महिलांचा बोरिंगवर मुक्काम.
भीम जयंतीचा उत्साह शिगेला; नांदेडमध्ये भीम अनुयायांचा जल्लोष
भीम जयंतीचा उत्साह शिगेला; नांदेडमध्ये भीम अनुयायांचा जल्लोष.
खासदार सुप्रिया सुळेंकडून चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन
खासदार सुप्रिया सुळेंकडून चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन.
पीएनबी बँक घोटाळा; मेहूल चोक्सीला अटक?
पीएनबी बँक घोटाळा; मेहूल चोक्सीला अटक?.
सागरी सेतुवर लेजर लाइटींगने साकारली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिकृत
सागरी सेतुवर लेजर लाइटींगने साकारली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिकृत.
दानवे आणि खैरेंनी मिळून संभाजीनगरची वाट लावली, संदीपान भूमरेंची टीका
दानवे आणि खैरेंनी मिळून संभाजीनगरची वाट लावली, संदीपान भूमरेंची टीका.
जो उद्धटपणे बोलतो, त्यांच्यावर आमचा हात पडतोच - अविनाश जाधव
जो उद्धटपणे बोलतो, त्यांच्यावर आमचा हात पडतोच - अविनाश जाधव.
आमच्यात सगळं काही खुश खुश आहे; एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण
आमच्यात सगळं काही खुश खुश आहे; एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण.
संजय निरुपम यांच्याकडून संजय राऊतांवर खालच्या भाषेत टीका
संजय निरुपम यांच्याकडून संजय राऊतांवर खालच्या भाषेत टीका.