दहावी बारावीच्या पुरवणी परीक्षेसंदर्भात बोर्डाची मोठी घोषणा, ‘या’ तारखेपासून अर्ज सादर करण्याचं आवाहन

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचं आयोजन करण्यात येणार आहे. पुरवणी परीक्षेसाठी अर्ज सादर करण्याचं आवाहन बोर्डाकडून करण्यात आलं आहे.

दहावी बारावीच्या पुरवणी परीक्षेसंदर्भात बोर्डाची मोठी घोषणा, 'या' तारखेपासून अर्ज सादर करण्याचं आवाहन
दहावी बारावी बोर्ड
Follow us
| Updated on: Aug 10, 2021 | 4:47 PM

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचं आयोजन करण्यात येणार आहे. पुरवणी परीक्षेसाठी अर्ज सादर करण्याचं आवाहन बोर्डाकडून करण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं यासंदर्भात परिपत्रक जारी केलं आहे. दहावी आणि बारावीचे विद्यार्थी त्यांच्या शाळा आणि महाविद्यालयांमार्फत ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सादर करु शकतात. अर्ज करण्यास सुरुवात 11 ऑगस्ट पासून सुरुवात होणार आहे.

उद्यापासून अर्ज करण्यास सुरुवात

राज्यातील उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील पुनर्परीक्षार्थी यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार व तुरळक विषयक घेऊन अर्ज सादर करणारे विद्यार्थी आणि आयटीआयमधून क्रेडिट ट्रान्सफर होणारे विद्यार्थी 11 ऑगस्ट ते 18 ऑगस्टपर्यंत नियमित शुल्कासह अर्ज सादर करु शकतात. तर, विलंब शुल्कासह 19 ऑगस्ट ते 21ऑगस्ट दरम्यान अर्ज करता येणार आहे.

श्रेणीसुधार योजनेअंतर्गत अर्ज करण्याऱ्यांना विद्यार्थ्यांना शासन निर्णयानुसार एक अतिरिक्त संधी देण्यात आल्यामुळे त्यांच्याकडून परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही. या विद्यार्थ्यांनी गतवर्षी परीक्षा शुल्क जमा केलं असल्यानं फक्त त्या विद्यार्थ्यांकडून वेगळं शुल्क आकारण्यात येणार नाही. मात्र, नियमित विद्यार्थ्यांना श्रेणीसुधारण्यासाठी नव्यानं अर्ज सादर करणं आवश्यक राहणार आहे.

अकरावी प्रवेशाची सीईटी रद्द

महाराष्ट्र सरकारला दणका देत मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court) अकरावी प्रवेशसाठी 21 ऑगस्ट 2021 रोजी होणारी सीईटी ( FYJC CET Cancelled ) परीक्षा रद्द केली आहे. राज्य सरकारनं सीईटी संदर्भात 28 मे रोजी एक अध्यादेश काढला होता. तो अध्यादेश हायकोर्टाने रद्द केला आहे. राज्य सरकारला संदर्भात हायकोर्टाने अकरावी मध्ये प्रवेश दहावी मध्ये मिळालेल्या गुणांनुसारच करण्यात यावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. राज्य सरकार तर्फे निकालाला स्थगिती देण्याची केलेली मागणी ही हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. 28 मे 2021 रोजी जारी अध्यादेश रद्द करण्यात आला आहे. 11 प्रवेश साठी सीईटी परीक्षा होणार नसून येणाऱ्या 6 आठवड्यात 11 प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्देश राज्य सरकारला हायकोर्टाने दिला आहे.

एवढंच नव्हे तर हायकोर्टाने राज्य सरकारनं 48 तासात या निकालाची माहिती विद्यार्थ्यांना द्यावी, असा निर्देश दिला आहे. पुढील सहा आठवड्यांत अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी. यापूर्वी झालेल्या सुनावणी दरम्यान राज्य सरकार तर्फे आशुतोष कुंभकोणी यांनी सीईटी बाबत सरकारची बाजू मांडली होती आणि सीईटी प्रवेश परीक्षा घेण्याबाबतची माहिती न्यायालयात दिली होती.

इतर बातम्या:

FYJC CET Exam Cancelled : मुंबई हायकोर्टाकडून अकरावीची सीईटी परीक्षा रद्द, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची पहिली प्रतिक्रिया…

Class XI Exam : अकरावीच्या प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा हायकोर्टाकडून रद्द

Maharashtra Supplementary Exam  msbshse inviting applications for SSC and HSC exam from students form 11 August

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.