UPSC Result: बारावी फेल IPS मनोज कुमार सारखा संघर्ष, वयाच्या 42 वर्षी महेश कुमारने क्रॅक केली यूपीएससी

UPSC 2023 Topper: कोर्टातून आल्यानंतर दोन-दोन तास अभ्यास करत होतो. स्वत:च जेवण स्वत: बनवून खात होतो. यापूर्वी दोन वेळा मुलाखतीचा स्थर गाठला होता. परंतु यश आले नव्हते. आता २०२३ मध्ये झालेल्या परीक्षेत यश मिळवून यूपीएससी क्रॅक केली.

UPSC Result: बारावी फेल IPS मनोज कुमार सारखा संघर्ष, वयाच्या 42 वर्षी महेश कुमारने क्रॅक केली यूपीएससी
यूपीएससी क्रॅक करणारे महेश कुमार
Follow us
| Updated on: Apr 18, 2024 | 12:38 PM

नुकताच प्रदर्शित झालेला बारावी फेल चित्रपट चांगलाच यशस्वी झाला होता. बारावी नापास झाल्यानंतर आयपीएस झालेल्या मनोज कुमार यांच्या जीवनावर हा चित्रपट होता. त्यांना परीक्षा देण्यापूर्वी यूपीएससी काय असते, हे माहीत नव्हते. आता दोन दिवसांपूर्वी यूपीएससी २०२३ मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल आला आहे. या निकालात दिव्यांग महेश कुमार यांनी शेवटची रँक १०१६ मिळवली आहे. महेश कुमार याने हे यश वयाच्या ४२ व्या वर्षी मिळवले आहे. बारावी उत्तीर्ण होण्यासाठी महेश कुमार यांना अकरा वर्षे लागली होती. कारण आर्थिक परिस्थितीमुळे दहावीनंतर त्यांनी शिक्षण सोडून दिले होते. बिहारमधील नक्षलग्रस्त जिल्ह्यातील मुजफ्फरपूरमधील तुर्की येथील ते रहिवाशी आहेत.

न्यायालयात क्लार्क ते यूपीएससी

UPSC CSE 2023 परीक्षेत बिहारमधील दिव्यांग उमेदवार महेश कुमार यांनी १०१६ रँक मिळाली आहे. ते शेखपूरा जिल्हा न्यायालयात क्लार्क आहेत. त्यांना बिहार लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळाले नव्हते. २०१३ मध्ये टीईटी परीक्षा देऊन शिक्षक झाले. त्यानंतर २०१८ मध्ये न्यायालयात क्लार्क झाले. २०२३ मध्ये यूपीएससीची परीक्षा क्लालिफाय केली.

महेश कुमार १९९५ मध्ये दहावी परीक्षा उत्तीर्ण झाले होते. त्यावेळी ते शाळेत टॉपर होते. परंतु आर्थिक परिस्थितीमुळे त्यांनी शिक्षण सोडले. त्यानंतर २००८ मध्ये बारावी उत्तीर्ण झाले. २०११ मध्ये पदवीची परीक्षा उत्तीर्ण झाले. २०१३ मध्ये शिक्षक झाले. २०१८ मध्ये कोर्टात क्लार्क झाले.

हे सुद्धा वाचा

कोर्टातून आल्यानंतर अभ्यास

यूपीएससी क्रॅक करणारा महेश कुमार यांनी सांगितले की, कोर्टातून आल्यानंतर दोन-दोन तास अभ्यास करत होतो. स्वत:च जेवण स्वत: बनवून खात होतो. यापूर्वी दोन वेळा मुलाखतीचा स्थर गाठला होता. परंतु यश आले नव्हते. आता २०२३ मध्ये झालेल्या परीक्षेत यश मिळवून यूपीएससी क्रॅक केली.

मुलाखतीत काय विचारले

महेश कुमार यांना यूपीएससी मुलाखतीत मुजफ्फरपूरमधील प्रसिद्ध लीचसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यानंतर महात्मा गांधी यांचे बिहारमधील आगमन आणि आंदोलन यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले. कधीकाळी बिहार समुद्ध होता, आता मागे का आहे? हा प्रश्न महेश कुमार यांना मुलाखतीत विचारला. या प्रश्नाच्या उत्ताराने महेश कुमार यांना यश मिळवून दिले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.