विदेशात MBBS शिक्षण घ्यायचं असेल तर हे शेजारील देश उत्तम! वाचा स्कॉलरशिप, फी सविस्तर

काय पात्रता लागते? अभ्यासक्रमाचं स्ट्रक्चर कसं आहे? शिक्षण शुल्क किती आहे? शिक्षण कोणत्या माध्यमातून केले जाते? अभ्यासक्रमाचे शुल्क काय आहे, प्रवेश कसा घ्यावा हे जाणून घेऊया.

विदेशात MBBS शिक्षण घ्यायचं असेल तर हे शेजारील देश उत्तम! वाचा स्कॉलरशिप, फी सविस्तर
MBBS collegesImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Apr 03, 2023 | 11:29 AM

मुंबई: अनेक विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण घ्यायची प्रचंड इच्छा असते. बारावी झाली की मुलं पुढचा विचार करू लागतात. जर तुम्हीही असे विद्यार्थी असाल तर तुम्हाला बांगलादेशात जाऊन एमबीबीएस करण्याची संधी आहे. भारतीय विद्यार्थ्यांमध्ये परदेशात शिक्षणासाठी बांगलादेश हे लोकप्रिय ठिकाण नसले तरी सुद्धा हे नक्कीच असं ठिकाण आहे जिथे वैद्यकीय विद्यार्थी शिकायला नक्की जातात. या विद्यार्थ्यांना दक्षिण आशियात राहावं लागतं. भारत सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार 2022 मध्ये बांगलादेशात शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या 9,308 होती.

या 9000 भारतीय विद्यार्थ्यांपैकी 922 विद्यार्थ्यांनी फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन (FMGE) मध्ये भाग घेतला. 370 जण वैद्यकीय तपासणी चाचणीतही उत्तीर्ण झाले. बांगलादेशातून एमबीबीएस करण्यासाठी पात्रता निकष काय आहेत, अभ्यासक्रमाचे शुल्क काय आहे, प्रवेश कसा घ्यावा हे जाणून घेऊया.

काय पात्रता लागते?

  • प्रवेशासाठी बारावीत फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीमध्ये किमान 50 टक्के गुण असणे आवश्यक आहे.
  • विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा 50 पर्सेंटाइलसह उत्तीर्ण केलेली असावी.
  • कोणत्याही संसर्गजन्य आजाराविरोधात वैद्यकीय मान्यता (मेडिकल क्लिअरन्स) असावी.
  • प्रवेशासाठी किमान 17 वर्षे वय असणे आवश्यक आहे.

अभ्यासक्रमाचं स्ट्रक्चर कसं आहे?

बांगलादेशातील बॅचलर ऑफ मेडिसिन अँड बॅचलर ऑफ सर्जरी (एमबीबीएस) अभ्यासक्रम पाच वर्षांचा आहे. एक वर्षाची इंटर्नशिपही करावी लागणार आहे. पदवी मिळवण्यासाठी सर्व वैद्यकीय विद्यार्थ्यांना इंटर्नशिपचे वर्ष पूर्ण करणे आवश्यक आहे.

प्रवेश प्रक्रिया काय आहे?

  • बांगलादेशातील कोणत्याही विद्यापीठात एमबीबीएस अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रथम संस्थेची निवड करावी लागणार आहे. त्यानंतर त्या त्या विद्यापीठाचा अर्ज भरावा लागणार आहे. बांगलादेशातही वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नीट गुण आवश्यक आहेत. हे पूर्णपणे बंधनकारक आहे.
  • विद्यापीठाकडून सशर्त पत्र मिळताच. विद्यार्थी व्हिसासाठी अर्ज करू शकतात. यावेळी त्यांना पासपोर्ट कॉपी, एज्युकेशनल डिग्री प्रूफ, आयडी प्रूफ अशा गोष्टींची गरज भासणार आहे.

शिक्षण शुल्क किती आहे?

  • MBBS च्या शिक्षणाचा खर्च सुमारे 30 ते 40 लाख रुपये आहे. यामध्ये तुमचा संपूर्ण अभ्यास होईल.
  • सहसा वसतिगृहाची फीही त्याला जोडली जाते.

शिक्षण कोणत्या माध्यमातून केले जाते?

बांगलादेशात सर्व विद्यापीठे इंग्रजीतून शिकवली जातात. इंग्रजी व्यतिरिक्त देशाची स्थानिक भाषा बंगाली आहे. अशा तऱ्हेने थोडीफार बंगाली येत असेल तर तिथे राहणं सोपं होईल.

Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी
Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी.
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य.
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी.
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.