MH CET Law 2022: महाराष्ट्र एलएलबी प्रवेश परीक्षेच्या तारखा जाहीर, 19 मार्चपासून नोंदणी
महाराष्ट्र (Maharashtra) राज्याच्या उच्च शिक्षण विभागाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा विभागाकडून लॉ (Law) म्हणजेच कायदा अभ्या क्रमाच्या 3 वर्षाचा एलएलबी आणि 5 वर्षाचा एलएलबी अभ्यासक्रम यासाठी परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत.
MH CET Law 2022 मुंबई: महाराष्ट्र (Maharashtra) राज्याच्या उच्च शिक्षण विभागाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा विभागाकडून लॉ (Law) म्हणजेच कायदा अभ्या क्रमाच्या 3 वर्षाचा एलएलबी आणि 5 वर्षाचा एलएलबी अभ्यासक्रम यासाठी परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. 5 वर्षांचा आणि 3 वर्षांचा एलएलबी (LLB) अभ्यासक्रम एमएचसीईटी लॉ परीक्षेसाठीचा अर्ज 19 मार्च आणि 24 मार्चला जारी केला जाणार आहे. तर या प्रवेश परींक्षांसाठी अर्ज 19 मार्चपासून दाखल करता येतील. राज्यस्तरीय कायदा प्रवेश परीक्षा 17 आणि 18 मे रोजी आयोजित केली जाईल. या दिवशी 5 वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी परीक्षा असेल. तर, 7 आणि 8 जूनला 3 वर्षीय अभ्यासक्रमासाठी परीक्षा आयोजित केली जाईल. एमएच सीईटी ल परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं आयोजित केली जाईल. यासंदर्भात अधिक माहिती राज्य सीईटी सेलच्या वेबसाईटवर उपलब्ध होईल.
वयोमर्यादा नाही
एमएच सीईटी लॉ एंट्रान्स परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी कोणतीही वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. जे विद्यार्थी शैक्षणिक पात्रता पूर्ण करत असतील ते यासाठी अर्ज दाखल करु शकतात. प्रवेशप्रक्रियेदरम्यान समुपदेशनावेळी त्यांना शैक्षणिक कागदपत्र जमा करावी लागतील.
तपशील | 5 वर्षांचा अभ्यासक्रम | 3 वर्षांचा अभ्यासक्रम |
---|---|---|
अर्ज दाखल करण्यास सुरुवात | 19 मार्च 2022 | 24 मार्च 2022 |
नोंदणीचा अंतिम दिनांक | 7 एप्रिल 2022 | 12 एप्रिल 2022 |
प्रवेशपत्र कधी मिळणार | 30 एप्रिल 2022 | 10 मे 2022 |
परीक्षेची तारीख | 17 मे 18 मे 2022 | 7 ते 8 जून 2022 |
महाराष्ट्र एलएलबी एंट्रा्स एक्झाम पात्रता
तीन वर्षांचा एलएलबी अभ्यासक्रम करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 45 टक्केगुणांसह पदवी उत्तीर्ण केलेली असावी. तर, राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 40 ते 42 टक्के गुण मिळवणं आवश्यक आहे.
पाच वर्षांच्या एलएलबी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांनी 45 टक्के गुण मिळवून राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं मान्यता दिलेल्या बोर्डातून बारावी उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी 40 ते 42 टक्के गुण मिळवणं आवश्यक आहे.
इतर बातम्या:
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीनंतर, आता इलेक्ट्रिक स्कूटर महागल्या, Ola कडून दरवाढीची घोषणा