MHT CET 2021 Registration | एमएचटी-सीईटी 2021 साठी अर्जनोंदणीला सुरुवात, mhtcet2021.mahacet org वेबसाईटवर भरा अर्ज

| Updated on: Jun 08, 2021 | 11:43 PM

शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटी 2021 प्रवेश परीक्षेसाठी अर्ज नोंदणी सुरु करण्यात आली आहे.

MHT CET 2021 Registration |  एमएचटी-सीईटी 2021 साठी अर्जनोंदणीला सुरुवात, mhtcet2021.mahacet org वेबसाईटवर भरा अर्ज
MHT CET 2021
Follow us on

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून राज्यात सध्या अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विविध विद्याशाखांमधील प्रवेश प्रक्रिया सुरु केली आहे. शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटी 2021 साठी अर्ज नोंदणी करण्यास सुरुवात झाली आहे. अर्जाची नोंदणी ही ऑनलाईन पद्धतीने होईल. https://mhtcet2021.mahacet.org या वेबसाईटला भेट देऊन विद्यार्थी आपली नोंदणी करु शकतील.

अर्जनोंदणीला 8 जूनपासून सुरुवात

अभियांत्रिकी/तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र व कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी ही प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी 8 जूनपासून अर्जाची नोंदणी सुरु झाली आहे. अर्ज करण्यासाठीचा शेवटाचा दिवस हा 7 जुलै 2021 असेल. तशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी आपल्या ट्विटर खात्यावरुन दिली आहे. अर्ज नोंदणीसाठी उमेदवारांना https://mhtcet2021.mahacet.org या लिंकला भेट द्यावी लागेल.

अर्ज कसा कसा करावा ?

MHT CET 2021 साठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम mhtcet2021.mahacet.org. या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

त्यासाठी MHT CET 2021 registration येथे क्लिक करा

त्यानंतर सर्व आवश्यक असलेली माहिती व्यवस्थित भरा आणि सेव्ह वर क्लिक करा.

MHT CET 2021 application form भरण्यासाठी अ‌ॅप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाका.

त्यानंतर अर्जासाठीची फी ऑनलाईन पद्धतीने भरून सबमीट या बटणावर क्लिक करा.

तुम्ही भरलेल्या अर्जाची एक प्रिटं काढून घ्या..

 

इतर बातम्या :

NCC : देशातील 91 विद्यापीठांकडून राष्ट्रीय छात्र सेनेचा अभ्यासक्रमात समावेश, यूजीसीच्या पत्राला मोठा प्रतिसाद

पॉलिटेक्निकसाठी सीईटी परीक्षा न घेता दहावीच्या गुणांनुसार प्रवेश, उदय सामंत यांची माहिती

NEET सह व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा रद्द करा, नरेंद्र मोदींकडे मुख्यमंत्र्यांनंतर विरोधी पक्षाच्या नेत्याची मागणी