MHT CET Exam: महाराष्ट्रात CET परीक्षा कधी? मंत्री उदय सामंतांनी दिली महत्त्वाची माहिती
बारावीवीनंतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी संयुक्त प्रवेश परीक्षा म्हणजेच सीईटी परीक्षा जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केली जाऊ शकते, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिलीय. (MHT CET Exam Uday Samant)
मुंबई : बारावीवीनंतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी संयुक्त प्रवेश परीक्षा म्हणजेच सीईटी परीक्षा (CET Exam) जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केली जाऊ शकते, अशी महत्त्वाची माहिती महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली आहे. संपूर्ण राज्यातील विद्यार्थी आणि पालकांना सीईटी परीक्षेसंदर्भात प्रश्न पडला होता. त्या प्रश्नाचं उत्तर मंत्री सामंत यांनी दिलंय. (MHT CET Exam 1st Week of August maharashtra Minister Uday Samant)
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या महाविद्यालयांमध्ये वर्ग घेण्यात येणार नाहीत, ऑनलाईन क्लास सुरु राहतील. तसंच सीईटी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सीईटी परीक्षा होऊ शकेल, असं उदय सामंत म्हणाले.
‘ती’ भरती लवकरच…
4084 महाविद्यालयीन शिक्षकांच्या पदांपैकी सुमारे 1200 भरती यापूर्वीच झालेल्या आहेत, ज्यांची उच्चाधिकार समितीने शिफारस केली होती, परंतु कोविडमुळे ही प्रक्रिया ठप्प झाली. पण लवकरच ही भरती प्रक्रिया पुन्हा सुरू केली जाईल, असंही सामंत यांनी स्पष्ट केलं.
खासगी विद्यापीठांच्या शिक्षकांच्या बरोबरीने अनुदानित शासकीय महाविद्यालयांमध्ये कंत्राटी शिक्षकांना अनुदान देण्याची जुनी मागणी लवकरच पूर्ण केली जाईल, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.
MHT CET 2021 परीक्षा पॅटर्न
काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र कॉमन एन्ट्रान्स टेस्ट परीक्षेच्या पॅटर्नसह अधिकृत परीक्षा पुस्तिका प्रसिद्ध करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य कॉमन एन्ट्रान्स टेस्ट सेलने पीसीएम व पीसीबी या दोन्ही गटांसाठी एमएचटी सीईटी 2021 चा परीक्षेचा पॅटर्न जाहीर केला आहे.
याशिवाय परीक्षेत निगेटीव्ह मार्किंग सिस्टम लागू होणार नाही. परीक्षार्थींनी नोंद घ्यावी की सीईटीची गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचा पॅटर्न जेईई मेनच्यासारखा असेल. तसंच, जीवशास्त्र विषय असताना परीक्षेचा पॅटर्न नीटसारखा असेल. यासह एमएचटी सीईटी 2021 च्या पेपरमध्ये विचारले जाणारे प्रश्न प्रामुख्याने अॅप्लिकेशन बेस्ड असतील.
ऑनलाईन रजिस्ट्रेशन
राज्य कॉमन एन्ट्रान्स टेस्ट सेल, महाराष्ट्र सीईटी 2021 परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. शैक्षणिक वर्षाच्या 2021-22 वर्षाच्या पहिल्या वर्षामध्ये प्रवेश घेण्याची तयारी करणारे विद्यार्थी 07 जुलै पर्यंत अर्ज करू शकतात, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी…
(MHT CET Exam 1st Week of August maharashtra Minister Uday Samant)
हे ही वाचा :
UPSSSC Admit Card : ज्युनिअर असिस्टंट पदासाठीचं अॅडमिट कार्ड जारी, असं करा डाऊनलोड
NLC Exam 2021: हेल्थ इन्स्पेक्टर परीक्षेसाठीचं अॅडमिट कार्ड जारी, असं करा डाऊनलोड