शिक्षण क्षेत्राच्या पावित्र्याला गालबोट, अधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचार, शिक्षक आमदार किशोर दराडेंचा आरोप

पवित्र समजल्या जाणाऱ्या शिक्षण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात अधिकारी भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी केला. 

शिक्षण क्षेत्राच्या पावित्र्याला गालबोट, अधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचार, शिक्षक आमदार किशोर दराडेंचा आरोप
किशोर दराडे
Follow us
| Updated on: Aug 21, 2021 | 3:37 PM

नाशिक: पवित्र समजल्या जाणाऱ्या शिक्षण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात अधिकारी भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी केला.  येवला येथे शिक्षकांच्या सर्व संघटनांच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना किशोर दराडे यांनी हा आरोप केला. शिक्षक संघटनांच्या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. प्रामुख्यानं सक्षम व भ्रष्टाचारी नसलेल्या शिक्षणाधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी, अशी चर्चा या बैठकीत झाली.

बैठकीत या विषयांवर चर्चा

शिक्षण विभागाकडून सक्षम व भ्रष्टाचारी नसलेल्या शिक्षणाधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी. प्रत्येक महिन्याला शिक्षक दरबार भरवणे, शिक्षणाधिकारी कार्यालयाचे प्रत्येक महिन्याला फाईल ऑडिट करणे. दप्तर दिरंगाई टाळणे , विधायक कार्य समिती सटाणा येथील 39 शिक्षकांना सेवा सातत्य द्यावे. डीएडचे बीएड प्रमोशनला मान्यता देण्यात यावी. 20 टक्के, 40 टक्के अनुदानित शिक्षकांचे पगार सुरु ठेवणे. सर्वांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करणे. प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेलाचा पगार करणे. मेडिकल बिल, फरक बिल, भविष्य निर्वाह निधी प्रकरणे मंजूर करणे आदी विषयांवार शिक्षक संघटनांच्या बैठकीत चर्चा झाली.

पैशांसाठी शिक्षकांना वेठीस धरण्याचे प्रकार

येवला येथे शिक्षकांच्या सर्व संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली होती. शिक्षण विभागात सुरु असलेल्या भ्रष्टाचारामुळे शिक्षकांची आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कामे रखडली आहेत. केवळ अधिकारीच नव्हे तर लिपिकांपासून त्यासाठी पैसे मागण्यास सुरुवात होते, त्यामुळे शिक्षकांना वेठीस धरण्याचे प्रकार होत आहेत. नाशिक विभागाचे आणि नाशिक जिल्ह्याचे संपूर्ण राज्यात नाव बदनाम झाले आहे.

भविष्यात शिक्षण खात्यातील भ्रष्टाचार संपवायचा असेल तर संघटनांची व लोकप्रतिनिधीची भूमिका आक्रमक असायला हवी पाहिजे. नव्याने पदभार घेणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्यांसोबत संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घ्यावी. शिक्षकांची व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पैशांसाठी अडवणूक केली तर तो अन्याय सहन करणार नसल्याची भूमिका शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी घेतली. नाशिकमध्ये नुकतेच वैशाली झणकर वीर यांच्या लाच प्रकरण चर्चेत आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिक्षक आक्रमक झाले आहेत.

इतर बातम्या:

बाळासाहेबांबद्दल आदर आणि उद्धव ठाकरेंविषयी गरळ, नारायण राणे म्हणजे दुतोंडी साप, नीलम गोऱ्हेंचा वार

शरद पवार म्हणाले, आजोबांची पुस्तकं वाचा, राज ठाकरेंनी ऐकलं, प्रबोधनकारांचा दाखला देत सडेतोड प्रत्युत्तर!

वहिनी मला न्याय देतील, संजीवनी काळे कृष्णकुंजवर, शर्मिला ठाकरेंना कैफियत सांगितली!

MLC Kishor Darade said officers made education department corrpt demanded strict action corrupt officer

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.