मोहन धारिया यांचं स्वातंत्र्य सैनिक ते केंद्रीय मंत्री म्हणून कार्य, वनराईची चळवळीचे संस्थापक म्हणून कार्य
मोहन धारिया यांनी राजकीय जीवनातून निवृत्ती घेत वनराई (Vanrai) या संस्थेद्वारे काम सुरु ठेवलं होतं. मोहन धारिया यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1925 रोजी महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील नाते गावात झाला.

मुंबई : महाराष्ट्रातील पर्यावरण आणि वृक्षसंवर्धन चळवळीचं नाव घेतलं मोहन धारिया (Mohan Dharia) यांचं नाव समोर येतं. मोहन धारिया यांनी राजकीय जीवनातून निवृत्ती घेत वनराई (Vanrai) या संस्थेद्वारे काम सुरु ठेवलं होतं. मोहन धारिया यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1925 रोजी महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील नाते गावात झाला. ते वकील होते. त्यांनी प्रजा समाजवादी पार्टीमध्ये काम केलं होत. स्वातंत्र्यलढ्यात प्रजा समाजवादी पार्टीकडून लढा उभारला. इंदिरा गांधी यांच्या सरकारमध्ये राज्यमंत्री होते. त्यांनी आणीबाणीला विरोध केला होता. त्यांनी नंतरच्या काळात जनता पक्षात काम केलं. त्यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री म्हणून देखील काम केलं. मोहन धारिया यांनी सक्रिय राजकारणातून दूर झाल्यानंतर जलसंवर्धनासाठी चळवळ (Water Conservation) उभारली. वनराई संस्थेतर्फे त्यांनी काम केलं.वनराई ही केवळ संस्था नसून भारताला सुजलाम सुफलाम बनवणाऱ्या लोकांची चळवळ आहे, असं मोहन धारिया म्हणायचे.
1942 मध्ये स्वातंत्र्यलढ्यात सहभाग
मोहन धारिया यांनी प्राथमिक शिक्षण महाड नगरपालिकेच्या मराठी शाळेतून पूर्ण केल. त्यानंतर पुढील शिक्षण कोकण एज्यूकेशन सोसायटीच्या शाळेतून इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलं. महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते पुण्यात आले. दहावीनंतर त्यांनी पुण्याच्या फर्ग्यूसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यांनी वैद्यकीय शाखेतून शिक्षण घेत डॉक्टर व्हायचं होतं. मात्र, त्यांनी 1942 च्या आंदोलनात सहभाग घेतल्यानं ते तुरुंगात गेले. तिथं त्यांचं मतपरिवर्तन झालं आणि त्यांनी तत्कालीन पुणे विद्यापीठातून आयएलएस लॉ कॉलेजमधून शिक्षण घेतलं.पुढे काही दिवस त्यांनी मुंबई हायकोर्टात वकिली देखील केली.
स्वातंत्र्यसैनिक, युवकांचे आणि कामगारांचे नेते
मोहन धारिया यांनी वयाच्या 16 व्या वर्षी स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. त्यांनी त्या ते वेळी सेवादलाचं नेतृत्त्व करत होते. यावेळी त्यांनी महाड महाड तहसील कचेरी ताब्यात घेण्यासाठी सशस्त्र हल्ला केला. यामध्ये इंग्रज अधिकाऱ्यासंह पाच जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर मोहन धारिया भूमिगत झाले. मात्र त्यांना पोलिसांनी पकडलं. त्यांना तुरुंगवासाची शिक्षणा झाली. तुरुंगातून शिक्षा भोगून आल्यानंतर धारिया यांनी जंजिरा संस्थानावर ताबा मिळवसा. तिथं त्यांनी स्वत: सरकार स्थापन केलं. त्या सरकारचे ते परराष्ट्र मंत्री काम करत होते. सिद्धीच्या ताब्यातून त्यावेळी जंजिरा संस्थान त्यांनी ताब्यात घेतलं. भारतीय पोस्ट, एसटी कर्मचारी संघटना, बँक कर्मचारी, संरक्षण कर्मचारी, हिंदूस्थान अँटिबायोटिक्स इत्यादी कामागारांच्या संघटनांशी ते संबंधित होते. ते नॅशनल मजूर केंद्राचे अध्यक्ष होते. पुण्याचे नगरसेवक म्हणून देखील त्यांनी काम केलं. महाराष्ट्र काँग्रेस कमिटीत देखील त्यांनी काम केलं. मोहन धारिया यांनी दोन वेळा राज्यसभेवर खासदार म्हणून काम केलं. माजी केंद्रीय मंत्री मोहन धारिया यांचं 14 ऑक्टोबर 2013 रोजी निधन झालं. मोहन धारिया यांनी शेतकरी हक्कांच्या बाजूनं लढा उभारला. त्यांना 2005 मध्ये पदमविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.
इतर बातम्या:
VIDEO: प्रचार करू नका म्हणून मेसेज आले, पण कुठून आले हे सांगणार नाही; आदित्य ठाकरेंचा मोठा दावा
Mohan Dharia Birth Anniversary who work as freedom Fighter union Minister