MPSC: परीक्षाकेंद्र परिसरात 144 कलम लागू, विद्यार्थ्यांची कसून तपासणी! एमपीएससी पूर्व परीक्षेस प्रारंभ

परीक्षा केंद्रांवर परिक्षार्थ्यांची तपासणी केली जातीये. केंद्राच्या परिसरात 144 कलम लागू करण्यात आलंय. कोरोना काळानंतर होत असलेल्या या पूर्व परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी चांगलीच मेहनत घेतलीये.

MPSC: परीक्षाकेंद्र परिसरात 144 कलम लागू, विद्यार्थ्यांची कसून तपासणी! एमपीएससी पूर्व परीक्षेस प्रारंभ
MPSC Pre ExamImage Credit source: TV9 marathi
Follow us
| Updated on: Aug 21, 2022 | 1:33 PM

चंद्रपूर: राज्यभरातील विविध केंद्रांवर आज राज्य सेवा पूर्व परीक्षा (MPSC) घेण्यात येतीये. चंद्रपूर (Chandrapur) मुख्यालयात 8 महाविद्यालयात या परीक्षेसाठी केंद्रे आहेत. सुमारे 3 हजारावर विद्यार्थ्यांनी शहराच्या 8 केंद्रांवर सकाळपासून केली गर्दी केल्याचं पाहायला मिळालंय. दरम्यान जिल्हा प्रशासनाने 2 सत्रांत आयोजित असणाऱ्या या परीक्षेसाठी चोख व्यवस्था केलेली पाहायला मिळतीये. परीक्षा केंद्रांवर (MPSC Exam Center) परिक्षार्थ्यांची तपासणी केली जातीये. केंद्राच्या परिसरात 144 कलम लागू करण्यात आलंय. कोरोना काळानंतर होत असलेल्या या पूर्व परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी चांगलीच मेहनत घेतलीये.

दोन टप्प्यात परीक्षा

एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा आज राज्यभर पार पडत आहे. तब्बल एक वर्षानंतर ही परीक्षा होत असून जवळपास 501 पदांसाठी राज्यसेवेची ही पूर्व परीक्षा होत आहे. मे 2022 मध्ये या परीक्षांची जाहिरात राज्य सरकार मार्फत काढण्यात आली होती. पण अनेक अडचणीमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. आज दोन टप्प्यात ही परीक्षा होत असून पहिला पेपर 10 ते 12 तर दुसरा पेपर 3 ते 5 या वेळेत पार पडणार आहे.

हे सुद्धा वाचा

एमपीएससीच्या या वर्षीच्या परीक्षेत 340 पदांची भर

सध्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांच्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पद भरतीच्या संख्येत वाढ केली आहे. एमपीएससीच्या या वर्षीच्या परीक्षेत 340 पदांची भर पडली आहे. उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक या पदांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता एकूण 501 पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे. एमपीएससीकडून 11 मे ला राज्यसेवा पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यात 161 पदांचा समावेश होता. मात्र शासनाकडून आता अन्य पदांची मागणीपत्रे एमपीएससीला देण्यात आल्याने ही पदे राज्यसेवा 2022 च्या पदभरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. राज्यसेवा 2022 च्या जाहिरातीमध्ये केवळ 161 पदेच असल्याने स्पर्धा परीक्षार्थीकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती, मात्र आता गट ‘अ’ आणि गट ‘ब’ संवर्गाची मिळून 340 पदे वाढल्याने एकूण 501 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाईल. वाढलेल्या पदांमध्ये उपजिल्हाधिकारी गट ‘अ’ संवर्गाची 33, पोलीस उपअधीक्षक गट ‘अ’ संवर्गाची 41, सहाय्यक राज्यकर आयुक्त गट ‘अ’ संवर्गाची 47, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गट ‘अ’ संवर्गाची 14, उपनिबंधक सहकारी संस्था गट ‘अ’ संवर्गाची दोन पदांची भरती वाढवण्यात आली आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.