Maharashtra Board 10th Result 2023 Live at mahresult.nic.in : राज्यातील इतक्या विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण

| Updated on: Jun 03, 2023 | 7:16 AM

Maharashtra Board 10th Result 2023 Live at mahresult.nic.in check official website for division wise : इयत्ता दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे.

Maharashtra Board 10th Result 2023 Live at mahresult.nic.in : राज्यातील इतक्या विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण
Maharashtra 10th SSC Result 2023Image Credit source: tv9 marathi

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या विभागीय मंडळांने मार्च 2023 मध्ये इयत्ता दहावीची परीक्षा घेतली होती. या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) परीक्षेचा निकाल आज दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे. त्यापूर्वी सकाळी 11 वाजता परीक्षा मंडळाची पत्रकार परिषद झाली.  यावेळी राज्याचा एकूण निकाल जाहीर करण्यात आला होता. पत्रकार परिषदेत राज्याचा एकूण निकाल, मंडळ निहाय निकाल जाहीर केला. तसेच किती विद्यार्थी आणि विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या. त्याची माहितीही देण्यात आली आहे.  ऑनलाईन निकाल जाहीर झाला असून विद्यार्थ्यांना निकालाच्या प्रतची प्रिंट काढून घेता येणार आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 02 Jun 2023 08:37 PM (IST)

    Maharashtra SSC Result 2023 Toppers | राज्यातील तब्बल 151 गुणवंत विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण

    राज्यातील महाराष्ट्र बोर्डाकडून दहावीचा निकाल जाहीर

    राज्यातील तब्बल 151 गुणवंत विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण

    151 विद्यार्थ्यांना 100 टक्के मार्क

    लातूरमधून सर्वाधिक तर कोकणातून सर्वात कमी विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण

    विभागनिहाय 100 टक्के गुण मिळवणारे विद्यार्थी

    लातूर | 108 विद्यार्थी

    औरंगाबाद | 22 विद्यार्थी

    अमरावती | 7 विद्यार्थी

    मुंबई | 6 विद्यार्थी

    पुणे | 5 विद्यार्थी

    कोकण | 3 विद्यार्थी

  • 02 Jun 2023 08:22 PM (IST)

    Ssc Examination Result 2023 | हेमलकसा येथील लोक बिरादरी आश्रमशाळेचा 10 वीचा निकाल 97.95 टक्के

    बारावीनंतर आज दहावीचा निकाल जाहीर

    हेमलकसा येथील लोक बिरादरी आश्रमशाळेचा 10 वीचा निकाल 97.95 टक्के

    उत्तीर्ण विद्यार्थी आणि शिक्षक वर्गाचं अभिनंदन,

    डॉक्टर प्रकाश आमटे यांची फेसबूक पोस्ट

  • 02 Jun 2023 07:15 PM (IST)

    पुण्यातील शीतल अमराळे या महिलेने वयाच्या 60 व्या वर्षी जिद्दीने केली 10 वी पास

    परिस्थितीमुळे अर्धवट सोडावं लागलं होत शिक्षण,

    वयाच्या 60 व्या वर्षी 10 वीची परीक्षा देत 50 % गुण मिळवत शीतल अमराळे झाल्या परीक्षा उत्तीर्ण

    शिक्षण अपूर्ण राहिल्याची मनात होती खंत,

    त्यामुळे 27 वर्ष मेहनत करत यशस्वी उद्योजिका म्हणून नावारूपाला आल्यानंतर, 60 व्या वर्षी दिली 10 वी परीक्षा

  • 02 Jun 2023 07:00 PM (IST)

    मणिपूर जळत आहे, अमित शहा म्हणत आहेत ‘ऑल इज वेल’ : मल्लिकार्जुन खर्गेंचा टोला

    काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गें यांनी ट्विट करत मोदी सरकार आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. एक महिन्यापासून मणिपूर जळत आहे, पण पंतप्रधान मोदी गप्प आहेत आणि अमित शहा सांगत आहेत की सर्वकाही ठीक आहे. याशिवाय कुस्तीपटू आणि गौतम अदानी यांच्या संपावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

  • 02 Jun 2023 04:56 PM (IST)

    Maharashtra SSC Result 2023 : बारावी प्रमाणे दहावीतही राज्यात कोकण विभाग अव्वल

    दहावीचा निकाल जाहीर, ९३. ८३ टक्के निकाल लागला…

    बारावी प्रमाणे दहावीतही राज्यात कोकण विभागाने मारली बाजी

    कोकण विभागाचा ९८.११ टक्के निकाल

  • 02 Jun 2023 04:46 PM (IST)

    Maharashtra SSC Result 2023 : दहावीच्या निकालानंतर कधी मिळणार मार्कशिट

    दहावीचे ऑनलाईन निकाल लागले…

    १४ जून रोजी विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतून मिळणार ओरिजनल मार्कशिट

  • 02 Jun 2023 04:42 PM (IST)

    Maharashtra SSC Result 2023 : दहावीच्या निकालातील सर्वात महत्त्वाची गोष्ट

    राज्यात 100 टक्के मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 151

  • 02 Jun 2023 02:47 PM (IST)

    परभणी जिल्ह्याचा दहावीचा निकाल 90.45 टक्के

    परभणी जिल्ह्यात एकण 27 हजार 558 विद्यार्थ्यांपैकी 27 हजार 208 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली

    त्यापैकी 24 हजार 611 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून याची टक्केवारी 90.45 इतकी

    जिल्ह्यातील 7 हजार 496 विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, 8 हजार 601 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 6 हजार 586 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण

    14 हजार 820 मुलांनी परीक्षा दिली होती, यातील 12 हजार 996 मुले उत्तीर्ण

    तसेच 12 हजार 388 मुलींनी परिक्षा दिली होती, यातील 11 हजार 615 मुली दहावीची परीक्षा उत्तीर्ण

  • 02 Jun 2023 02:30 PM (IST)

    गडचिरोली जिल्हा विदर्भात एसएससी परीक्षेत तिसऱ्या क्रमांकावर

    गडचिरोली जिल्ह्याचा निकाल 92.52 %टक्के

    पहिल्या क्रमांकावर गोंदिया तर दुसऱ्या क्रमांकावर भंडारा

  • 02 Jun 2023 02:15 PM (IST)

    दहावीच्या निकालानंतर पुण्यात विद्यार्थ्यांचा जल्लोष

    दहावीच्या निकालानंतर पुण्यात जल्लोष

    डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत विद्यार्थ्यांचा जल्लोष

    ढोल वाजवत, ठेका धरत,पेढे वाटत विद्यार्थ्यांचा जल्लोष

    निकालानंतर विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह

  • 02 Jun 2023 02:07 PM (IST)

    मराठवाडा विभागाचा दहावीचा 93 .23% निकाल

    मराठवाड्यात बीड जिल्हा प्रथम, औरंगाबाद जिल्हा द्वितीय तर जालना तृतीय क्रमांकावर

    मराठवाडा विभागात पुन्हा मुलींनी मारली बाजी

    10 वी परीक्षेत 104 गैरप्रकार आले होते समोर

    गैरप्रकारांमुळे 89 विद्यार्थ्यांची संपादणूक केली रद्द

    विभागातील 9 शाळांचा निकाल 0 %

  • 02 Jun 2023 02:05 PM (IST)

    अमरावती विभागाचा निकाल ९३.२२ टक्के

    नऊ विभागीय मंडळांमध्ये अमरावतीच्या निकाला यंदा काहीसा चांगला लागलाय

    गेल्या वर्षी ९६.८१ टक्के निकालासह अमरावती विभाग राज्यात सातव्‍या स्थानी होता तो यंदा सहाव्‍या स्थानावर

    दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनीच मारली अमरावतीत बाजी

  • 02 Jun 2023 01:49 PM (IST)

    Maharashtra SSC Result 2023 : शिक्षणाचं माहेरघर पुणे राहिलं मागे

    महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा वर्ष 2023 चा 93.83 टक्के निकाल

    100% गुण मिळवण्याचा यादीत शिक्षणाचं माहेरघर पडलं मागे

  • 02 Jun 2023 01:46 PM (IST)

    Maharashtra SSC Result 2023 : दहावीच्या निकालात तृतीय पंथी विद्यार्थ्यांनी मारली बाजी

    दहावीच्या परीक्षेमध्ये 23 विद्यार्थी तृतीय पंथी प्रवर्गातून बसले होते.

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माहिती

  • 02 Jun 2023 01:46 PM (IST)

    महाराष्ट्र बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा जल्लोष

    पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत विद्यार्थ्यांचा जल्लोष

    ढोल वाजवत, ढोलाच्या तालावर ठेका धरत पेढे वाटत विद्यार्थ्यांचा जल्लोष

    निकालानंतर विद्यार्थ्यांच्यात प्रचंड उत्साह

  • 02 Jun 2023 01:41 PM (IST)

    दहावीच्या निकालाचा टक्का घसरला

    दहावीच्या निकालाचा टक्का घसरल्याचे दिसतंय

    गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बारावीप्रमाणे दहावीचं निकालाचा टक्काही घसरला

    मागील वर्षी महाराष्ट्राचा निकाल ९६. ९४ टक्के लागला होता तर यंदाचा निकाल ९३.८० टक्के लागलाय

  • 02 Jun 2023 01:39 PM (IST)

    दहावीच्या निकालात दिव्यांग विद्यार्थ्यांना घवघवीत यश

    • दहावीच्या निकालात दिव्यांगाच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९२. ४९ टक्के
    • महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माहिती
  • 02 Jun 2023 01:33 PM (IST)

    SSC 10th Result 2023 : फर्स्ट क्लास आणणारे अधिक

    इयत्ता दहावीत एकूण 4,89,455 विद्यार्थ्यांनी 75 टक्के आणि त्यापेक्षा अधिक गुण मिळविले आहेत.

    तर 5,26,210 विद्यार्थाी फर्स्ट क्लासममध्ये उत्तीर्ण झाले आहेत.

    3,34,015 विद्यार्थ्यांना सेकंड क्लास आणि 85,298 विद्यार्थ्यांना थर्ड क्लास मिळाला आहे.

  • 02 Jun 2023 01:29 PM (IST)

    निकालाने समाधानी नसल्यास पुन्हा तपासणीसाठी करू शकता अर्ज

    फेब्रुवारी/मार्च 2013 पासून उत्तरपत्रिकेची संपूर्ण पुनर्तपासणी उपलब्ध

    असे करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम उत्तरपत्रिकेच्या प्रतींसाठी करावा लागेल अर्ज

    उत्तरपत्रिका मिळाल्यापासून पाच दिवसांच्या आत विहित शुल्कासह करू शकतात ऑनलाइन अर्ज

    शाळा किंवा विभागीय मंडळ कार्यालयातून मिळू शकतो अतिरिक्त तपशील

  • 02 Jun 2023 01:26 PM (IST)

    10 वीच्या निकालातील ठळक मुद्दे

    10 वीच्या निकालातील ठळक मुद्दे

    एकूण विद्यार्थी: 15,29,096

    उत्तीर्ण: 14,34,893

    कोकण विभाग (98.11 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण)

    नागपूर विभाग (92.5 टक्के उत्तीर्ण)

    मुंबई विभागाचा निकाल : 93.66 टक्के

    100 टक्के निकाल शाळा: 10,000

  • 02 Jun 2023 01:24 PM (IST)

    एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 3.18 टक्क्यांनी घसरली

    महाराष्ट्रातील दहावीच्या निकालात गेल्या 5 वर्षांत उत्तीर्णतेची टक्केवारी घसरली

    2023- 93.83

    2022- 96.94

    2021- 99.95

    2020- 95.30 (कोरोना महामारीच्या आधी)

  • 02 Jun 2023 01:20 PM (IST)

    150 हून अधिक विद्यार्थ्यांनी मिळवले 100% गुण, लातूरचे विद्यार्थी आघाडीवर

    एकूण 151 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले, पहा यादी..

    लातूर- 108

    औरंगाबाद- 22

    अमरावती- 7

    मुंबई- 6

    पुणे- 5

    कोकण- 3

  • 02 Jun 2023 01:15 PM (IST)

    कोकण विभागाने बाजी मारली

    या वर्षी, एकूण 15,29,096 विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातून दहावीच्या परीक्षेला बसले होते, त्यापैकी 14,34,893 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विभागनिहाय निकालाचा विचार करता, कोकण विभागाने बाजी मारली आहे.

  • 02 Jun 2023 01:14 PM (IST)

    SSC 10th Result 2023 : साडेसहा हजार शाळांचा निकाल शंभर टक्के

    एकूण 23013 शाळांपैकी 6844 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

    दहावीच्या निकालात मुलांपेक्षा मुलींची कामगिरी सरस ठरली आहे.

    मुलींचा निकाल 95.87 टक्के तर मुलांचा निकाल 92.05 टक्के लागला.

  • 02 Jun 2023 01:05 PM (IST)

    दहावीचा निकाल ऑनलाइन तपासण्यासाठी इथे क्लिक करा-

    खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही थेट तुमचा निकाल तपासू शकता-

    SSC 10th Result 2023

  • 02 Jun 2023 01:00 PM (IST)

    दहावीच्या निकालात दिव्यांग विद्यार्थ्यांनी मारली बाजी

    दहावीच्या निकालात दिव्यांगाच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९२. ४९ टक्के असल्याची माहिती समोर…

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली माहिती

  • 02 Jun 2023 12:47 PM (IST)

    SSC 10th Result 2023 : मुंबई, पुणे, कोकण कुठल्या विभागाचा किती टक्के निकाल जाणून घ्या

    Maharashtra Board SSC 10th Result : यंदा 10 वीच्या परीक्षेला राज्यातून 15 लाख 29 हजार 96 इतके विद्यार्थी बसले होते. त्यातून किती मुलं पास झाली जाणून घ्या सर्वकाही. वाचा सविस्तर….

  • 02 Jun 2023 11:30 AM (IST)

    दहावीचा विभाग निहाय निकाल

    कोकण – 98.11%

    पुणे – 95.64%

    मुंबई – 93.66%

    औरंगाबाद – 93.23%

    नाशिक – 92.22%

    कोल्हापूर – 96.73%

    अमरावती – 93.22%

    लातूर – 92.66%

    नागपूर – 92.05%

  • 02 Jun 2023 11:17 AM (IST)

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक माध्यमिक शिक्षण मंडळ पत्रकार परिषद

    महाराष्ट्र बोर्डाचा 10 वीचा  93.83 % इतका निकाल

    मुलींचा निकाल 95.87 टक्के, मुलांचा निकाल 92.05 टक्के

    दहावीच्या निकालात कोकण विभागाची बाजी

    नागपूर विभाग सर्वात शेवटी

    कोकण विभागाचा 98.11 टक्के निकाल

    मुलांच्या तुलनेत मुलींची निकालात बाजी

    पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रचलित पद्धतीने सवलतीचे गुण

    दिव्यांग श्रेणीत 92.49 टक्के निकाल

  • 02 Jun 2023 10:44 AM (IST)

    इयत्ता 10 वीची परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च 2023 या कालावधीत झाली

    इयत्ता 10 वीची परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च 2023 या कालावधीत झाली.

    महाराष्ट्र राज्य बोर्ड परीक्षेसाठी एकूण 15,77,256 उमेदवारांनी नोंदणी केली होती.

    त्यापैकी 3,54,493 एकट्या मुंबई विभागातील होते.

    संपूर्ण महाराष्ट्रात एसएससी परीक्षेसाठी एकूण 8,44,116 मुले आणि 7,33,067 मुलींचा समावेश आहे.

    एकूण ५,०३३ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा झाली.

  • 02 Jun 2023 10:30 AM (IST)

    आज इयत्ता 10 वीचा निकाल होईल

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च शिक्षण मंडळ आज इयत्ता 10 वीचा निकाल जाहीर करणार आहे. महाराष्ट्र बोर्ड त्यांच्या पुणे कार्यालयातून सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे.

  • 02 Jun 2023 09:57 AM (IST)

    इयत्ता दहावीचा निकाल असा चेक करा; फॉलो करा स्टेप्स

    इयत्ता दहावीचा निकाल पाहण्यासाठी शिक्षण विभागाच्या mahresult.nic.in या अधिकृत संकेस्थळाला भेट द्या.

    त्यानंतर संकेतस्थळाच्या होमपेजवर Maharashtra Examination 2023 – RESULT च्या लिंकवर क्लिक करा

    त्यानंतर SSC Examination February- 2023 RESULT लिंकवर क्लिक करा

    त्यानंतर पुढच्या पानावर Roll Number आणि आईचं नाव टाका

    निकाल लगेच स्क्रिनवर दिसेल

    मार्कशीट चेक केल्यानंतर प्रिंट घ्या

  • 02 Jun 2023 09:54 AM (IST)

    इयत्ता दहावीचा आज निकाल, विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली

    आज सकाळी 11 वाजता पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला जाईल

    त्यानंतर दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होणार आहे

    राज्यात 15,77,256 विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीची परीक्षा दिली होती

    ही परीक्षा राज्यभरातील 5033 परीक्षा केंद्रावर पार पडली होती

    यावर्षी 2 मार्चपासून ते 25 मार्चपर्यंत परीक्षा चालली होती.

Published On - Jun 02,2023 9:52 AM

Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.