School : ऑफलाईन शाळा सुरु झाल्यान मुंबई, कल्याणमध्ये ऑनलाईन शिक्षण बंद; BMC चा शाळांना कारवाईचा इशारा
मुंबईमध्ये (Mumbai) कोरोनाचा प्रसार कमी होताच पहिली ते सातवी च्या शाळा काही निर्बंधांमध्ये सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, शाळा सुरू होताच बहुतेक शाळांकडून ऑनलाईन शिक्षण (Online Education) बंद करण्यात आले आहे.
मुंबई: मुंबईमध्ये (Mumbai) कोरोनाचा प्रसार कमी होताच पहिली ते सातवी च्या शाळा काही निर्बंधांमध्ये सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, शाळा सुरू होताच बहुतेक शाळांकडून ऑनलाईन शिक्षण (Online Education) बंद करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याने ऑनलाईन शिक्षण देण्याबाबत शाळांना कडक शब्दात सूचना दिल्या जातील, अशी माहिती शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिली आहे. दुसरीकडे कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील शाळांकडून ऑनलाईन शिक्षण बंद करण्यात आल्याच्या तक्रारी पालकांकडून करण्यात येत आहेत.
ऑनलाईन शिक्षण बंद केल्यास कडक कारवाई
ज्या शाळा ऑनलाईन शिक्षण देणार नाहीत त्यांच्यावर राज्य सरकारच्या कायद्यानुसार कारवाई केली जाईल अशी माहिती पालिकेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. मुंबईमधील पहिली ते सातवीच्या शाळा 15 डिसेंबरपासून सुरू करण्यात आल्या आहेत. शाळा सुरू करताना मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
त्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण द्यावं
तसेच ज्या विद्यार्थ्यांचे पालक शाळेत पाठवण्यास तयार नसतील त्यांना ऑनलाईन शिक्षण द्यावे असे आदेश शिक्षण विभागाने सर्व शाळांना दिले आहेत. मात्र,15 डिसेंबरपासून शाळा सुरू होताच मुंबईमधील बहुतेक शाळांनी ऑनलाईन शिक्षण बंद केले आहे. यामुळे कोरोना आणि ओमायक्रॉन विषाणू प्रसाराच्या भीतीने जे विद्यार्थी शाळेत जाणार नाही त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.
मुलांना शाळेत पाठवले तर विषाणूच्या संसर्गाची भीती तर शाळेत नाही पाठवले तर शैक्षणिक नुकसान होणार अशी भीती पालकांमध्ये आहे. ज्या शाळा ऑनलाईन शिक्षण देत नाहीत, त्यांची तक्रार आल्यास त्यांच्यावर राज्य सरकारच्या नियमानुसार कारवाई केली जाईल, अशी माहिती पालिकेच्या शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिली आहे.
कल्याण डोंबिवलीतही ऑनलाईन शिक्षण बंद
कल्याण डोंबिवलीतक काही ठिकाणी शाळा सुरु झाल्या आहेत. अनेक शाळांनी पालकांकडून विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासंदर्भात हमीपत्र लिहून घेतलं आहे. तर, काही शाळांकडून ऑनलाईन शिक्षण बंद करण्यात आल्याची तक्रार काही पालकांनी केली आहे.
इतर बातम्या :
TET Exam : टीईटी परीक्षेत गैरप्रकाराचा संशय, पुणे पोलिसांकडून MSEC चे आयुक्त तुकाराम सुपेंना अटक
Mumbai School Reopen BMC warns schools to resume online education otherwise action taken