Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai School Reopen: मुंबईत मराठी माध्यमांच्या शाळांची घंटा आजच वाजणार, कॉन्व्हेंट, इंग्रजी शाळांना नवा मुहूर्त

मुंबई महापालिका (BMC) क्षेत्रात तब्बल दीड वर्षाहून अधिक काळानंतर पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू होत आहेत.

Mumbai School Reopen: मुंबईत मराठी माध्यमांच्या शाळांची घंटा आजच  वाजणार, कॉन्व्हेंट, इंग्रजी शाळांना नवा मुहूर्त
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Dec 15, 2021 | 6:37 AM

मुंबई: मुंबईतील शाळांचे (Mumbai School) मराठी माध्यमांचे पहिली ते सातवीचे वर्ग आजपासून सुरु होत आहेत. मुंबई महापालिका (BMC) क्षेत्रात तब्बल दीड वर्षाहून अधिक काळानंतर पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू होत आहेत. महापालिकेचे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी यासंदर्भातील आदेश मंगळवारी पुन्हा एकदा जारी केले आहेत. राज्यातील कोरोना (Corona) विषाणू संसर्ग आटोक्यात आल्यानंतर 1 डिसेंबरपासून ऑफलाईन शाळा सुरु (Maharashtra School Reopen) करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मुंबई महापालिकेच्या शाळा पूर्ण क्षमतेनं सुरु होणार

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून चालवण्यात येणाऱ्या शाळांची संख्या 3 हजार 420 आहे. या शाळांमधील विद्यार्थी संख्या साडे दहा लाख इतकी आहे. महापालिकेनं आजपासून पूर्ण क्षमतेनं शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिका शिक्षण विभागाकडून शाळा सुरु करण्यासंदर्भात जोरदार तयारी करण्यात आली आहे. या वेळी शाळा कोणत्याही स्थितीत सुरू केल्या जाणार असून यामध्ये तूर्तास कोणताही बदल होणार नाही, असे स्पष्टीकरण महापालिका शिक्षण विभागाकडून देण्यात आले.

पालकांमध्ये नाराजी

राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या ओमायक्रोन या व्हेरीएटमुळे पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात धास्ती निर्माण झाली आहे. मुंबईतील शाळा 15 डिसेंबरपासून सुरू होतील की नाही, अशी सांशकता ही पालकांमध्ये व्यक्त केली जात होती. मुंबई महापालिकेनं शाळा 15 डिसेंबरपासूनच सुरु करणार असल्याचं सांगितल्यानंतर शाळांनी पालकांना मेसेज पाठवले. ऐनवेळी शाळा सुरु होणार असल्याचे मेसेज मिळाल्यानं पालकांमध्ये नाराजी दिसून आली. आपल्या पाल्यांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांनी आपले संमतीपत्र देणे आवश्यक आहे.

इंग्रजी आणि कॉन्व्हेंट शाळा नाताळच्या सुट्टीनंतर

मुंबई महापालिकेनं ओमिक्रॉन आणि कोरोनाचा धोका लक्षात घेता 15 डिसेंबरपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतलाय. मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या आदेशानुसार पालिकेच्या शाळा आजपासून सुरु होत आहेत. मात्र, दुसरीकडे कॉन्व्हेंट आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा अद्यापही ऑनलाईन शिक्षणावर जोर आहे. इंग्रजी आणि कॉन्व्हेंट शाळा नाताळच्या सुट्टीनंतर बोलवण्याचा शाळांचा विचार आहे.

नेमके नियम काय?

  1. पालकांचं संमतीपत्र आवश्यक
  2. ऑनलाईन शिक्षण सुरु राहणार
  3. एका बेंचवर एक विद्यार्थी
  4. शाळा 3 ते 4 तास सुरु
  5. गृहपाठावर भर
  6. सांघिक खेळ खेळण्यास मनाई
  7. शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचं लसीकरण आवश्यक
  8. सॅनिटायझेश, हात धुण्याची सोय आवश्यक

इतर बातम्या:

VIDEO | ‘माझी वसुंधरा अभ्यासक्रम’ शालेय शिक्षण मंत्र्यांकडे सुपूर्द, विद्यार्थ्याला पर्यावरणाविषयी जबाबदार नागरिक बनविणार

Nashik School Reopen : नाशिकच्या प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट, प्रशासनाची जय्यत तयारी

Mumbai School Reopen Marathi Medium schools to reopen from today check here for guidelines

'राज ठाकरे यांना मातोश्रीचं निमंत्रण द्या', ठाकरेंच्या सेनेची बॅनरबाजी
'राज ठाकरे यांना मातोश्रीचं निमंत्रण द्या', ठाकरेंच्या सेनेची बॅनरबाजी.
शेलार व्यवहारशून्य, त्याची बौद्धिक दिवाळखोरी...; मनसे नेत्याची टीका
शेलार व्यवहारशून्य, त्याची बौद्धिक दिवाळखोरी...; मनसे नेत्याची टीका.
काका-पुतण्याची बंद दाराआड बैठक; काय झाली चर्चा?
काका-पुतण्याची बंद दाराआड बैठक; काय झाली चर्चा?.
'सडकछाप, त्यांच्या अकलेचे...', विजय वडेट्टीवार भाजप नेत्यावर भडकले
'सडकछाप, त्यांच्या अकलेचे...', विजय वडेट्टीवार भाजप नेत्यावर भडकले.
राज ठाकरेंच्या मनसैनिकांना महत्वाच्या सूचना
राज ठाकरेंच्या मनसैनिकांना महत्वाच्या सूचना.
...त्याशिवाय 26/11 शक्य नाही, भाजप नेत्याचा दावा अन् या पक्षांवर आरोप
...त्याशिवाय 26/11 शक्य नाही, भाजप नेत्याचा दावा अन् या पक्षांवर आरोप.
साहेब, तुमच्या लाडक्या.. तरूणीचं टोकाचं पाऊल आईनं लिहिलं शिंदेंना पत्र
साहेब, तुमच्या लाडक्या.. तरूणीचं टोकाचं पाऊल आईनं लिहिलं शिंदेंना पत्र.
अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण; अखेर 9 वर्षांनी आरोपीला जन्मठेप
अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण; अखेर 9 वर्षांनी आरोपीला जन्मठेप.
मुंबई रेल्वे स्थानकाकडे येणाऱ्या प्रवाशांचे महिनाअखेरपर्यंत हाल, कारण
मुंबई रेल्वे स्थानकाकडे येणाऱ्या प्रवाशांचे महिनाअखेरपर्यंत हाल, कारण.
'ते चु*** आहेत चु***', राऊतांची शिंदे गटावर खालच्या अंगाची टीका
'ते चु*** आहेत चु***', राऊतांची शिंदे गटावर खालच्या अंगाची टीका.