विद्यापीठाच्या २९९ परीक्षांच्या तारखा जाहीर, वाचा कधीपासून सुरु होणार कोणती परीक्षा

mumbai university Exam | मुंबई विद्यापीठाने २०२३-२४ च्या उन्हाळी सत्राच्या मानव्य विद्याशाखेच्या एकूण ६९ परीक्षा, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या ५७ परीक्षा, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या ७५ परीक्षा व आंतर विद्याशाखेच्या ९८ अशा एकूण २९९ परीक्षेच्या तारखा विद्यापीठाने जाहीर केल्या आहेत.

विद्यापीठाच्या २९९ परीक्षांच्या तारखा जाहीर, वाचा कधीपासून सुरु होणार कोणती परीक्षा
Image Credit source: प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Mar 04, 2024 | 10:32 AM

मुंबई | दि. 4 मार्च 2024 : मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्या उन्हाळी सत्राच्या २९९ परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या या परीक्षा मार्चपासून सुरु होत आहेत. या उन्हाळी सत्र परीक्षेला २ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी बसणार आहेत. विद्यापीठ दरवर्षी चार विद्याशाखेच्या ४५० पेक्षा जास्त परीक्षा घेत असते. विद्यापीठाने २०२३-२४ च्या उन्हाळी सत्राच्या मानव्य विद्याशाखेच्या एकूण ६९ परीक्षा, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या ५७ परीक्षा, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या ७५ परीक्षा व आंतर विद्याशाखेच्या ९८ अशा एकूण २९९ परीक्षेच्या तारखा विद्यापीठाने जाहीर केल्या आहेत. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या परीक्षेच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील.

महत्वाच्या परीक्षांच्या तारखा

  • बीकॉम सत्र ६ : २२ मार्च २०२४
  • बीए सत्र ६ : ३ एप्रिल २०२४
  •  बीएस्सी सत्र ६ : ३ एप्रिल २०२४
  •  बीएस्सी – कॉम्प्युटर सायन्स, आयटी व बायोटेक. सत्र ६ : १९ एप्रिल २०२४
  • बीए एमएमसी सत्र ६ : १६ एप्रिल २०२४
  •  बीकॉम फिनांशियल मार्केटस,
  • बीकॉम बँकिंग अँड इन्शुरन्स,
  • बीकॉम अकाऊंटिंग अँड फायनान्स,
  • बीकॉम इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट,
  • बीकॉम फिनांशियल मॅनेजमेंट,
  • बीकॉम ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सत्र व
  • बीएमएस सत्र ६ : १५ एप्रिल २०२४

विद्याशाखानिहाय परीक्षा

  • विद्याशाखानिहाय परीक्षा संख्या
  • मानव्य विद्याशाखा व विधी शाखा : ६९
  • वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा : ५७
  • विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा : ७५
  • आंतर विद्याशाखा : ९८

एमएच्या परीक्षेत घोळ

मुंबई विद्यापीठाच्या १ मार्च रोजी झालेल्या परीक्षेत घोळ झाला होता. एमएच्या प्रश्नपत्रिकेत चुकीचा प्रश्नसंच दिला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना दुसऱ्या प्रश्नपत्रिकेसाठी चार तास वाट पाहावी लागली. दुपारी २.३० वाजता प्रश्नपत्रिका मिळाल्यावर विद्यार्थ्यांनी ‘भारतची विदेश नीती’ या विषयाच्या पेपरमध्ये झालेला घोळ लक्षात आणून दिला. त्यानंतर दुपारी २.३० वाजताचा पेपर ४.४० वाजता सुरु झाला. त्यानंतर संध्याकाळी सात वाजेपर्यंत परीक्षा सुरु होती. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.