Mumbai University: मुंबई विद्यापीठ पहिली गुणवत्ता यादी जाहीर करणार, मेरिट लिस्ट कुठे पाहायची?
मुंबई विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या सर्व कॉलेज, मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी प्रक्रिया सुरु होती. विद्यापीठानं जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार पदवी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आज जाहीर होणार आहे.
मुंबई : मुंबई विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या सर्व कॉलेज, मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी प्रक्रिया सुरु होती. विद्यापीठानं जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार पदवी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आज जाहीर होणार आहे. मुंबई विद्यापीठात अनुदानित असो की विना अनुदानित, विद्यार्थ्यांना प्रवेश पूर्व नोंदणी बंधनकारक आहे. ही प्रवेश पूर्व नोंदणी प्रक्रिया 5 ऑगस्टपासून सुरु झाली असून ती 14 ऑगस्टपर्यंत सुरु होती. पदवी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता 25 ऑगस्ट तर तिसरी 30 ऑगस्टला जाहीर केली जाईल.
गुणवत्ता यादी कुठे पाहायची?
मुंबई विद्यापीठाकडून आज पदवी प्रवेशांची पहिली गुणवत्ता यादी विद्यापीठाच्या वेबसाईटवर जाहीर केली जाणार आहे. mu.ac.in या वेबसाईटवर विद्यार्थी त्यांनी निवडलेल्या महाविद्यालयाची गुणवत्ता यादी पाहू शकतात.
विद्यार्थ्यांना प्रवेश कसा मिळणार ?
मुंबई विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असल्यास विद्यार्थ्यांना नावनोंदणी mum.digitaluniversity.ac या वेबसाईटवर करावी लागते. विद्यार्थ्यांना सेल्फ अफेडेविट भरून कोणत्याही एका कॉलजमध्ये प्रवेश निश्चित करणं गरजेचं असतं. एकदा तो निश्चित झाला तर नंतर मुळ कागदपत्रं सादर करुन अंतिम प्रवेश दिला जातो.
प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया
ऑनलाईन अर्ज विक्री- 5 ते 14 ऑगस्ट दुपारी 1 वाजेपर्यंत
ऑनलाईन फॉर्म दाखल करण्याची तारीख
6 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट इन हाऊस प्रवेश तसच अल्पसंख्यांक कोट्यातील प्रवेशही याच कालावधीत केले जातील.
पहिली गुणवत्ता यादी
17 ऑगस्ट (स.11 वाजता)
ऑनलाईन कागदपत्र पडताळणी
18 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट, दुपारी 3 वा. पर्यंत
दुसरी गुणवत्ता यादी
25 ऑगस्ट, सायं. 7 वा.
ऑनलाईन कागदपत्र पडताळणी आणि फी भरणे
1 सप्टेंबर ते 4 सप्टेंबर
हे लक्षात ठेवा
>> विषयसमुहाप्रमाणेच विषय निवडणे बंधनकारक
>> प्रवेशपूर्ण ऑनलाईन नोंदणी ही मल्टी कॉलेजेस, मल्टी कोर्सेससाठी
>> नोंदणी अर्जाची प्रत काढून ठेवा, संबंधीत कॉलेजात प्रवेश करते वेळी कागदपत्रासह सादर करावी लागणार
>>विद्यार्थ्यांनी दहावी-बारावीच्या गुणपत्रिकेसह आवश्यक ती कागदपत्र सोबत ठेवावीत.
>> विषय अंतिम ठरवण्याचे अधिकार प्राचार्यांकडे आहेत
>> स्वायत्त महाविद्यालयातल्या प्रवेशाचे अधिकार हे त्या संस्थेनं ठरवलेल्या नियम आणि अटीनुसार असतील
>> प्रवेश घेते वेळेस विद्यार्थ्याकडे जर ऑनलाईन प्रवेश नोंदणी अर्जाची प्रत नसेल तर संबंधीत कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार नाही.
संबंधित बातम्या :
लोकल सुरू, पण बस स्टॉपवरील गर्दी कायम; वाचा कारण काय?
राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे, जातीय राजकारणावरुन संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
Mumbai University will released first merit list for UG courses at mu ac in