नांदेडच्या अंकिताची मोठी झेप, परिस्थितीवर मात करत मुंबईच्या KEM मध्ये MBBS ला प्रवेश

शिक्षण घेत असताना सर्व सुविधा उपलब्ध असताना देखील अनेक जण अनेक कारण देत परिस्थितीवर अपयशाचं खापर फोडत असतात. नांदेडच्या अकिंतानं ही समजूत खोटी ठरवलीय.

नांदेडच्या अंकिताची मोठी झेप, परिस्थितीवर मात करत मुंबईच्या KEM मध्ये MBBS ला प्रवेश
अंकिता बोडके
Follow us
| Updated on: Feb 12, 2022 | 8:17 AM

नांदेड : शिक्षण घेत असताना सर्व सुविधा उपलब्ध असताना देखील अनेक जण अनेक कारण देत परिस्थितीवर अपयशाचं खापर फोडत असतात. अवघी तीन फूट उंची असतानाही वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या नांदेडच्या अंकिता बोडके (Ankita Bodake) ही मुलगी सध्या चांगलीच चर्चेत आलीय. अंकिता ही नांदेड (Nanded) शहरातील नमस्कार चौक विस्तारित नाथनगर येथील रहिवासी आहे. नीट परीक्षेत तिने 292 गुन प्राप्त केले आहे. शारीरिक दिव्यंगत्व कोट्यातून तीने राज्यात सातवा क्रमांक पटकवला आहे. 2021 मध्ये तिनं मुंबईतील केईएममध्ये प्रवेश घेतला असून तिनं एमएमबीबीएसला (MBBS) प्रवेश घेतला आहे. दोन वर्षा पूर्वी अंकिता हिच्या वडिलांचे निधन झाले होते. तरी, देखील न खचून जाता वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने प्रयत्न सुरुच ठेवले.

मुंबईच्या केईएममध्ये प्रवेश

अनेक जन आपल्या उंची अभावी हताश राहत असतात. उंची पाहून लोक काय म्हणतील या विवंचनेत राहत असतात. मात्र ,अंकिताने अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करत वैद्यकीय शिक्षणाला प्रवेश घेण्याचा बहुमान मिळवला आहे. अंकिता हिला MBBS शिक्षनासाठी मुंबई येथील के एम हॉस्पिटल मध्ये प्रवेश मिळाला आहे.दोन वर्षा पूर्वी अंकिता हिच्या वडिलांचे निधन झाले होते. तरी देखील न खचून जाता वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने प्रयत्न सुरुच ठेवले.

अंकिताने चित्रकला, नृत्यकला यांमध्ये आपली कला दाखवित प्रथम पारितोषिक पटकावलं आहे. तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. एमबीबीएस नतंर कार्डियोलोजिस्ट होण्याचे तिचे स्वप्न आहे.ध्येय पूर्ण करण्यासाठी केवळ मेहनतीची गरजेचे असते हे मी करून दाखवेन, असं अंकिता बोडकेनी सांगितलय.

आई वडिलांच्या पाठिंब्यावर यश

2021 मध्ये केईएम हॉस्पिटल येथे शिक्षणासाठी प्रवेश घेतला आहे. केईएममध्ये ती एमबीबीएसचं शिक्षण घेत आहे. प्रियदर्शनी विद्यासंकुल येथे तिनं प्राथमिक शिक्षण घेतलं. वडिल आणि काकांकडून प्रेरणा घेत मी इथपर्यंत पोहोचली आहे. बोलणारे लोक अडचणी आल्यानंतर मदतीला येत नाहीत, त्यामुळं मी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. आई वडिलांच्या पाठिंब्यावर मी इथपर्यंत पोहोचले आहे, असं अकिंता बोडके म्हणाले. माझी मुलगी अंकिता मुंबईला केईएम हॉस्पिटल येथे शिकतेय याचा अभिमान वाटतो, असं अंजनाबाई बोडके यांनी म्हटलं,

इतर बातम्या :

ना साडी, ना लांब वेणी, अरुंधतीने कात टाकली, ‘आई कुठे काय करते’त नवा लूक

Rabbi Season: अवकाळी अन् अतिवृष्टीच्या संकटानंतर बहरली रब्बी पिके, खरिपातील नुकसान भरुन निघणार का?

Nanded Ankita Bodake get admission in KEM Mumbai for MBBS Course

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.