इंजिनिअरिंग आता मराठीसह 5 प्रादेशिक भाषांमध्ये, 8 राज्यातील 14 महाविद्यालयात कोर्सेस सुरु, नरेंद्र मोदींची माहिती
नरेंद्र मोदी यांनी नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत देशातील आठ राज्यातील 14 महाविद्यालयात 5 भारतीय भाषांमध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण देण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे.
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या वर्षपूर्तीनिमित्त एका कार्यक्रमाला संबोधित केलं. नरेंद्र मोदी सरकारनं गेल्या वर्षी 29 जुलै रोजी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर केलं होतं. नव्या शिक्षण धोरणाच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी नव्या शैक्षणिक धोरण लागू केल्यापासून काय घडलं याची माहिती दिली. नरेंद्र मोदी यांनी यावेळी नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत देशातील आठ राज्यातील 14 महाविद्यालयात 5 भारतीय भाषांमध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण देण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे.
14 अभियांत्रिकी महाविद्यालयात 5 भाषेत अभ्यासक्रम सुरु
8 राज्यातील 14 अभियांत्रिकी महाविद्यालय मातृभाषेत अभ्यासक्रम सुरु होत आहेत. 5 प्रादेशिक भाषांमध्ये अभियांत्रिकीचं शिक्षण सुरु होत आहे. यामध्ये हिंदी, तामिळ, तेलुगू, मराठी आणि बांगला भाषेचा समावेश आहे. तर देशातील 11 भाषांमध्ये अभ्यासक्रम भाषांतरीत करण्यात येत असल्याचं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. देशातील गरीब विद्यार्थ्यांना, मध्यम वर्गातील आणि दलित, आदिवासी वर्गातील विद्यार्थ्यांना फायदा होईल. या वर्गातील विद्यार्थ्यांना भाषेच्या अडचणीला सामोरं जावं लागत होतं. या विद्यार्थ्यांच्या सामर्थ्य आणि कौशल्यासोबत फायदा होईल, असंही ते म्हणाले.
मुझे खुशी है कि 8 राज्यों के 14 इंजीनियरिंग कॉलेज, 5 भारतीय भाषाओं- हिंदी-तमिल, तेलुगू, मराठी और बांग्ला में इंजीनियरिंग की पढ़ाई शुरू करने जा रहे हैं।
इंजीनिरिंग के कोर्स का 11 भारतीय भाषाओं में ट्रांसलेशन के लिए एक टूल भी develop किया जा चुका है: PM #TransformingEducation
— PMO India (@PMOIndia) July 29, 2021
नव्या शैक्षणिक धोरणामुळे शिक्षणात क्रांतिकारी बदल घडतील
प्रत्येक क्षेत्रात भारतीय युवक पुढाकार घेत आहेत. युवक डिजीटल इंडियाला गती देत आहेत. या युवा पिढीला त्यांच्या स्वप्नानुसार वातावरण मिळेल त्यावेळी त्यांची शक्ती किती वाढेल याचा विचार करा, नविन राष्ट्रीय शिक्षण धोरण युवकांना विश्वास देते की देश त्यांच्यासोबत आहे. आर्टिफिशयल इंटेलिजन्स भारतीय युवकांना डिजीटल बनवेल. नॅशनल डिजीटल टेक्नॉलॉजी फोरम या दिशेनं डिजीटल आणि टेक्निकल फोरम तयार करण्यासाठी नवं धोरण काम करेल. देशाची नवीन शिक्षण व्यवस्था विद्यार्थ्यांना सक्षम बनवेल, नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाला कोणत्याही दबावापासून मुक्त ठेवेल. धोरणातील मुक्तता, विद्यार्थी किती शिकतील हे विद्यापीठ आणि परीक्षा मंडळं ठरवणार नाहीत. नव्या बहुविध शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना फायदा होत आहे. नव्या धोरणामुळे शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडणार आहेत, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
इतर बातम्या:
Big News: मेडिकल अभ्यासक्रमात OBC आणि EWS आरक्षण लागू, मोदी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी: जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना घरबसल्या देता येणार परीक्षा
Narendra Modi announced 14 engineering colleges of 8 states started courses in five regional language