Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकच्या आदिवासी भागातील धामडकीवाडीची मुंबईत चर्चा, टीव्हीवरच्या शाळेनं शिक्षणाची गाडी सुसाट

महाराष्ट्र शासनानं शाळा बंद पण शिक्षण सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला.  सरकारनं ऑनलाईन शिक्षणाची घोषणा केली. मात्र, नेटवर्क आणि मोबाईल फोन अभावी दुर्गम भागात ऑनलाईन शिक्षणाला मर्यादा आल्या.

नाशिकच्या आदिवासी भागातील धामडकीवाडीची मुंबईत चर्चा, टीव्हीवरच्या शाळेनं शिक्षणाची गाडी सुसाट
धामडकीवाडी टीव्ही वरची शाळा पॅटर्न
Follow us
| Updated on: Sep 21, 2021 | 7:28 PM

शैलेश पुरोहित, टीव्ही 9 मराठी,इंगतपुरी नाशिक: गेल्या वर्षीपासून सुरु झालेल्या कोरोना विषाणू संसर्ग आणि लॉकडाऊनमुळं शाळा बंद आहेत. विद्यार्थी शाळेत गेलेले नाहीत. महाराष्ट्र शासनानं शाळा बंद पण शिक्षण सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला.  सरकारनं ऑनलाईन शिक्षणाची घोषणा केली. मात्र, नेटवर्क आणि मोबाईल फोन अभावी दुर्गम भागात ऑनलाईन शिक्षणाला मर्यादा आल्या. प्रयोगशील शिक्षकांनी यासंकटावर मार्ग काढत ज्ञानदानाचं काम सुरु ठेवलं. नाशिकच्या आदिवासी भागातील धामडकीवाडी गावातील टीव्ही वरची शाळा हा त्यापैकीच एक उपक्रम आहे. या उपक्रमाची मुंबईतील संस्थेनं दखल घेतलीय.

अतिदुर्गम डोंगराळ आदिवासी भागातील धामडकीवाडीतील टीव्हीवरची शाळा भरवली जात आहे. धामडकीवाडी पॅटर्न विद्यार्थी प्रिय ठरला आहे. रस्ता नसलेली वाडी कोणत्याही फोनला तासभरही नेटवर्क नाही, अशा अनेक समस्यांनी ग्रासलेली इगतपुरी तालुक्यातील धामडकीवाडी ही आदिवासी वाडी आहे. अतिदुर्गम आदिवासी वाडीतील शाळा बंद असतानाही येथील अवलिया शिक्षक प्रमोद परदेशी यांनी टाकाऊ तीन टीव्ही संचांचा उपयोग करीत घरोघरी शाळा भरवण्याचा धामडकीवाडी पॅटर्न विकसित केला. बघता बघता हा पॅटर्न विद्यार्थीप्रिय ठरला आहे.

धामडकीवाडी पॅटर्नची मुंबईतील संस्थेकडून दखल

संपूर्ण जगभर कोरोनाच्या महामारीने जग थांबलंय. यातच शिक्षणाचा आयचो घो…अशी म्हणण्याची वेळ आली आहे. मात्र, प्रमोद परदेशी यांनी अडचणी न मांडता या अडचणींवर स्वकौशल्याने मात करत संपूर्ण राज्याला दिशा देणारा अनुकरणीय असा धामडकीवाडी पॅटर्न विकसित केला. धामडकीवाडी पॅटर्न निश्चितच नव्या दिशेने जाणाऱ्या शिक्षणाला भक्कम दिशा देण्यास मोलाची भूमिका बजावणार आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत मुख्याध्यापक म्हणून त्यांचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला आहे.धामडकीवाडी येथील शैक्षणिक कार्याची दखल घेत मुंबई येथील पेहेचान फाऊंडेशनने तसेच वेबग्योर इंटरनॅशनल स्कूल, लखोटिया फाऊंडेशन मुंबई यांनी या शाळेसह ग्रामस्थांसाठी मदतीचा हात पुढे केला.

धामडकीवाडी पॅटर्न नेमका कसा?

धामडकीवाडी भागात मोबाईल नटवर्क नसल्याने येथील विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी एक स्वतंत्र पॅटर्न तयार झाला. एका टीव्हीपुढे सात विद्यार्थी याप्रमाणे तीन टीव्हीसमोर २१ विद्यार्थी घडे गिरवताहेत. लॉकडाऊनच्या काळात पुढची पावले ओळखून अभ्यासक्रमावर आधारित तयार केलेल्या विविध व्हिडीओचे प्रसारण प्रत्येक टीव्हीवर केले जाते. त्यामुळे शिक्षणापासून दूर असलेल्या ग्रामस्थांचीही आपल्या पाल्यांच्या निमित्ताने उजळणी होत आहे. शिक्षणाची चाकं नियमितपणे गतीमान राहिल्यानं नवा अध्याय प्रमोद परदेशी यांच्या निमित्तानं लिहिला गेला आहे.

धामडकीवाडी पॅटर्न लोकप्रिय

धामडकीवाडी पॅटर्न विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय झालाय. मात्र सतत होणारा विजेचा लपंडाव अडथळा करत असतो. गरीबीमुळे घरात टीव्ही नसल्याने अनेकांना तीन टीव्हीचा उपयोग नाईलाजाने करावा लागतो. सामाजिक क्षेत्रातील नागरिकांकडून कालबाह्य झालेले आणि कोनाड्यात पडलेले टीव्ही उपलब्ध झाल्यास निश्चितच अजूनही विकासापासून आणि शिक्षणापासून कोसो दूर असलेल्या गावांमध्ये धामडकीवाडी पॅटर्न नवा अध्याय लिहू शकणार आहे.

इतर बातम्या:

NEET परीक्षा रद्द करा, तामिळनाडू प्रमाणं मेडिकल प्रवेशाचा निर्णय घ्या; काँग्रेसची मागणी, उद्धव ठाकरेंना पत्र

MHT CET 2021 Admit Card : एमएचटी सीईटी परीक्षा PCB ग्रुपचं प्रवेशपत्र जाहीर, डाऊनलोड कसं करायचं?

Nashik Dhamadkiwadi TV School Education Pattern welcomed by students and recognise by organization in Mumbai

राऊतांना शिवसेनेच्या खासदारानं डिवचलं; ट्वीट करत म्हणाले, सांगा बरं...
राऊतांना शिवसेनेच्या खासदारानं डिवचलं; ट्वीट करत म्हणाले, सांगा बरं....
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीकडून राहुल अन् सोनिया गांधीविरोधात चार्जशीट
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीकडून राहुल अन् सोनिया गांधीविरोधात चार्जशीट.
'या' महिलांना 800चा हफ्ता येणार, लाडक्या बहिणीनो तुम्ही तर नाहीना यात?
'या' महिलांना 800चा हफ्ता येणार, लाडक्या बहिणीनो तुम्ही तर नाहीना यात?.
संभाजी भिडेंना चावलेला कुत्रा दत्तक घेणार, कोणी केली मोठी घोषणा?
संभाजी भिडेंना चावलेला कुत्रा दत्तक घेणार, कोणी केली मोठी घोषणा?.
लाडक्या बहिणींनो... आता 1500 नाही 500 रुपये, रोहिणी खडसे म्हणाल्या...
लाडक्या बहिणींनो... आता 1500 नाही 500 रुपये, रोहिणी खडसे म्हणाल्या....
अयोध्येचं राम मंदिर बॉम्बने उडवणार? थेट धमकीचा मेल, काय म्हटलंय त्यात?
अयोध्येचं राम मंदिर बॉम्बने उडवणार? थेट धमकीचा मेल, काय म्हटलंय त्यात?.
भिडेंना कुत्र्याचा चावा; वडेट्टीवार म्हणाले, त्याला दुर्बुद्धी सुचली
भिडेंना कुत्र्याचा चावा; वडेट्टीवार म्हणाले, त्याला दुर्बुद्धी सुचली.
ठाकरे गटाचा हंडा मोर्चा; पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
ठाकरे गटाचा हंडा मोर्चा; पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड.
बीडमध्ये हत्येचं सत्र थांबेना! भाजप लोकसभा विस्तारकाची निर्घृण हत्या
बीडमध्ये हत्येचं सत्र थांबेना! भाजप लोकसभा विस्तारकाची निर्घृण हत्या.
'आता सगळं ओक्के...', दानवेंवर काल खैरे भडकले आज गळाभेट घेणार?
'आता सगळं ओक्के...', दानवेंवर काल खैरे भडकले आज गळाभेट घेणार?.