NAS 2021 LIVE Updates: देशभरात नॅस सर्वेक्षण सुरु, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीची तपासणी
NAS 2021 LIVE Updates: देशभरातील शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीनं नॅशनल अॅचिव्हमेंट सर्वे घेण्यात येत आहे.
देशभरातील शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीनं नॅशनल अॅचिव्हमेंट सर्वे घेण्यात येत आहे. आज हा सर्वे होणार आहे. नॅस अंतर्गत देशभरातील तिसरी, पाचवी, आठवी आणि दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला जातो.
LIVE NEWS & UPDATES
-
छगन भुजबळ
-कोरोना आढावा बैठक आज झाली रुग्ण संख्या कमी होत आहे -ऑक्सिजन साठा पुरेसा आहे 600 मेट्रिक टन इतकी क्षमता आहे – 16 लाख लोकांनी जिह्यात अध्याप कोरोनाचा पहिला डोस देखील घेतला नाही -मालेगाव मध्ये सर्वाधिक कमी लसीकरण झालेला आहे -औरंगाबाद प्रमाणे नाशिक जिल्ह्यात देखील लसीकरण बाबत कडक पाऊल उचलणार – 50 टक्के पेक्षा कमी लसीकरण जिह्यात झाल्याने चिंता कायम -ग्रामीण भागात बस सेवेला पोलीस संरक्षण देणार
-
पालकमंत्री भुजबळ ऑन मालेगाव दंगल परिस्थिती
– कोणी काहीही बरळतील – कोरोनानंतर आता कुठे आनंदी वातावरण आहे – कृपया डोके गरम करून घेऊ नका, शांतता राखा – पोलिस त्यांचे काम करतील – आपल्या कृतीमुळे कुठल्याही संकटात वाढ होणार नाही याची काळजी सगळ्यांनी घ्या
-
-
औरंगाबाद
औरंगाबादेत शिवसेना आणि मनसे आमने सामने येण्याची शक्यता
शिवसेना उद्या काढणाऱ्या आक्रोश मोर्चाला मनसेचा विरोध
शिवसेना मोर्चा काढणाऱ्या मार्गावर मनसे लावणार विरोधाचे बॅनर
शिवसेना उद्या काढणार आहे महागाईच्या विरोधात आक्रोश मोर्चा
मोर्चाला शिवसेना नेते संजय राऊत राहणार आहेत उपस्थित
मोर्चाला विरोध करणार असल्याचं जिल्हाध्यक्ष सुहास दाशराथे यांनी केलं स्पष्ट
तर मनसेच्या अडून भाजप खेळ करत असल्याचा आमदार अंबादास दानवे यांचा आरोप
शिवसेना आणि मनसेच्या भूमिकेमुळे गदारोळ होण्याची शक्यता
-
यवतमाळ
त्रिपुरा घटनेचा निषेध मोर्चाला गालबोट
दोन गटात हाणामारी , यवतमाळ च्या पुसद येथील घटना
स्थानिक पत्रकारला सुद्धा मारहाण
दोन्ही गट पुसद पोलीस ठाण्यात दाखल, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ भुजबळ सुद्धा पुसद येथे रवाना
पुसद मध्ये तणावची परिस्थिती
-
मालेगावात मुस्लिम संघटनांच्या मोर्च्याला गालबोट
मालेगावात आंदोलकांकडून दगडफेक
दगडफेकीनंतर पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज
-
-
एस टी महामंडळ व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने बाईट
27 ऑक्टोबर पासून एस टी कर्मचारी संप
उच्च न्यायालय औद्योगिक न्यायालयात याचिका दाखल केली
न्यायालयाने नकार देऊन पण संप केला
खासगी वाहने आम्ही सुरू केली आहे
कर्मचाऱ्यांनी कामावर यावं कोणी अडवणूक करू नये
आज 36 बसेस आम्ही विविध देपोतून सोडल्या
17 देपोतून या बसेस सोडल्या त्यात 900 लोकांनी प्रवास घेतला
खासगी वाहतूक मध्ये लूट होऊ नये यासाठी आम्ही आदेश दिले आहे
मॅकेनिकल स्टॅफ कामावर यायला सुरुवात झाली आहे
मागणी उच्च न्यायालय समोर विचाराधीन आहे
समिती नेमली आहे त्या वेळेनुसार ते ठरेल
कर्मचारी आम्हाला सांगत आहे की डेपो सुरू करा
आम्ही त्यासाठी प्रयत्न करतोय
आमची विनंती आहे की सर्वांनी यावे
एस टी 36 बसेस आपण काढल्या आहेत
या सर्व पोलीस बंदोबस्तात आहे
कालपर्यंत 36 FIR दाखल केली आहे काल पर्यंत
तोडफोड, करण्यात आली आहे
स्वतः च्या मालकीच्या पण शिवशाही आहेत
दोन प्रकारच्या शिवशाही आहे
पण त्यांचे कॉन्ट्रॅक्ट आहे
सव्वाशे कोटी रुपयांचा लॉस झाला आहे
निलंबित कर्मचारी कामावर येवू शकते नाही
बडतर्फ एक ही नाही
ऑन सदाभाऊ आरोप
मशीन विकत घेतली तर टेक्निकल लोक नाही
झाडे लावायला मोठा खर्च नाही आलाय
वन विभागाने मोफत लोक बोलावली होती
गणवेश साठी पूर्वी कापड द्यायचे मग शिलाईभत्ता द्यायचो
आधीच्या कपड्यांमध्ये कर्मचाऱ्यांना प्रचंड त्रास होत होता , कापड साठी अभ्यास करून कंत्राट केलं 60 कोटीत झाला
10 -15 कोटी कदाचित कमी झाला असता पण आता त्यांना आपण बराच काही दिलं आहे
एस टी चा मॅकेनिकल स्टॅफ मोठा जॉईन झाला आहे
2 हजारपेक्षा जास्त कर्मचारी कामावर आले आहेत
महामंडळात 92 हजार 700 कर्मचारी आहे
महामंडळ ला भरतीची गरज असेल तर ज्यांचे ट्रेनिंग पूर्ण झालं आहे त्यांना घेण्याचा विचार करू
पण तस अचानक कोणता आता अजून पर्यंत निर्णय झाला नाहीय
-
मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरे शरद पवारांच्या भेटीसाठी रवाना
सिव्हर ओक येथील निवसास्थानी घेणार शरद पवारांची भेट
एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा करणार
राज ठाकरेंसोबत एसटी कर्मचाऱ्यांचं शिष्टमंडळही असणार
-
एसटी महामंडळाची पत्रकार परिषद
कामावर रुजू व्हा…
एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांना आवाहन
-
मुंबई
राज ठाकरे आज संध्याकाळी 5 वाजता शरद पवार यांची भेट घेण्याची शक्यता
एसटी कामगारांच्या प्रश्नावर चर्चा करणार
-
मुंबई
एसटी महामंडळाची पत्रकार परिषद सुरू
-
नवी दिल्ली
नवी दिल्लीत महत्वपूर्ण बैठक
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नवी दिल्लीत दाखल
महाराष्ट्रातल्या विधानपरिषदेच्या जागांबाबत होणार चर्चा
थोड्याच वेळात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि पटोले यांच्यात चर्चा
पुढच्या महिन्यात महाराष्ट्रात सात जागांसाठी विधानपरिषद निवडणूक
-
पद्मश्री राहिबाई पोपेरे यांनी दिले पंतप्रधान मोदींना भेटीचे निमंत्रण
पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर बिजमाता राहिबाई पोपेरे दिल्लीतून थेट शिर्डीत … पुरस्कारानंतर प्रथमत: साईदर्शनासाठी शिर्डीत… बिजमाता राहिबाई यांचे हस्ते वृक्षपुजन…. शिर्डीकरांनी केले साईंच्या जयघोषात स्वागत…. प्रधानमंत्री मोदींना दिले बियाणे बँक भेटीचे निमंत्रण.. राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री मोदींनी माझ्या कामाबद्दल केली विचारणा… साई दर्शनानंतर राहीबाई पोपरेंनी दिली माध्यमांना माहीती…
-
वर्धा
– पालकमंत्री सुनील केदार यांचं एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनवरील प्रतिक्रिया
– एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी चर्चेतून मार्ग काढावा
– हा विषय महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा आहे
– यावर चर्चेतून मार्ग निघू शकेल
– आजपर्यंत देशात बोलूनच प्रश्न सुटले आहेत
– हातातोंडाशी आणून, हल्लाहुलला करून राजकारण करून कधीच कोणाचे प्रश्न सुटले नाहीत
– या भूमीनेही देशातील प्रश्न बोलून सोडवले आहे
– त्यांनाही हाच सल्ला राहील
-
औरंगाबाद
महाविद्यालयातील प्राध्यापकांना लस बंधनकारक
लस घेण्यासाठी आधी नोटीस दिली जाईल
त्यानंतर लस नाही घेतली तर प्राध्यापकांचे वेतन बंद करणार
उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचा मोठा निर्णय
-
नागपूर
कंगना राणावत विरोधात सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार
आम आदमी पार्टी ने केली तक्रार
कंगना राणावत याना देण्यात आलेला पुरस्कार वापस घेण्याची केली मागणी
कंगनाची केलेल्या देशाविषयी च्या वादग्रस्त वक्तव्य वरून केली तक्रार
-
पुणे
कंगना राणावत हिच्या विरोधात आज सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये PASA कायदा, 1985 अंतर्गत तक्रार दाखल
-
पुणे महानगर नियोजन समितीच्या सर्व तीस जागांचा निकाल जाहीर..
भाजपा -16 राष्ट्रवादी काँग्रेस -12 शिवसेना -1 अपक्ष-1 —– मोठे महानगर क्षेत्र एकूण जाागा- 22 भाजप -14 राष्ट्रवादी काँग्रेस -1 शिवसेना-1
छोटे महानगर क्षेत्र( नगरपालिका) एकूण जागा-1 राष्ट्रवादी काँग्रेस -1
ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र एकूण जागा 7 राष्ट्रवादी काँग्रेस -4 भाजपा -2 अपक्ष -1
-
अमरावती
त्रिपुरामधील हिंसाचाराचे अमरावतीत संतप्त पडसाद
अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मुस्लिम समाजाचा मोर्चा
जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणारा मोर्चा पोलिसांनी अडवला
मुस्लिम समाजाची केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी
पोलिसांचा मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात
-
अनिल परब बाईट
– माझ्या आवाहनाला प्रतिसाद देत कामावर येण्याची तयारी कर्मचारी दाखवत आहेत. त्यांना संरक्षणाची हमी दिलीय. – विलिनीकरण्याच्या मागणीबाबत त्यांनी समितीसमोर जावं. – कामगारांनी कामावर जावे. राजकीय पक्ष पोळी भाजून बाहेर जातील पण नुकसान तुमचे होईल – हायकोर्टाने विचार करून १२ आठवड्यांचा कालावधी दिलाय. आम्ही नाही – खोत, पडळकर संप भडकवण्याचे काम करतायत. – एसटी आणखी खड्ड्यात जाईल, असे वागू नका – पगारवाढीसंदर्भातील बोलणी सुरू होतील, तेव्हा पगार वाढवण्यासंदर्भात बोलावे. – मी आझाद मैदानात जाईन. पण त्यांनी अडेलतट्टू भूमिका घेतली तर मग काय ? मी हायकोर्टाच्या निर्णयानुसार काम करेन – माझ्यावर टिका करा, पण कामगारांचे नुकसान करू नका. हे कामगारांच्या पाठिशी उभे राहणार नाहीत – नितेश राणे कोण? त्याला आम्ही मोजत नाही, किंमत देत नाही. मुख्यमंत्र्यांवर – मुख्य प्रश्नापासून लक्ष्य टाळण्यासाठी भ्रष्टाचाराचे आरोप केले जातायत. – भ्रष्टाचाराचे आरोप करताय, पण ते सिद्ध करा – आंदोलन वेगळ्या दिशेने नेले जातंय. त्यांनाही कळलंय की हे आंदोलन चुकीचे – कामावर कामगार आले नाहीत तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल. – जे कामगार येतील त्यांना संरक्षण देवू – सदाभाऊ खोत आंदोलन भरकटवू नका. त्या माझ्या भगिनी आहेत. त्यांनीही विचार करावा की त्यांचे यात नुकसान आहे – सदाभाऊ व पडळकर यांनी ऐन दिवाळीत लोकांना वेठीवर धरले. वेळ आल्यावर त्यांनाही बघू.
-
अनिल परब
हा विषय उच्च न्यायालयातूनच सोडवला जाईल
सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर हे संपकऱ्यांना भडकावण्याचं काम करत आहेत
त्यांची जबाबदारी घ्यायला ते तयार नाहीत
कामगारांनी सदसद्विवेकबुद्धीने विचार करावा
संपकऱ्यांनी एसटी पुन्हा खड्ड्यात जाईल असं काही करु नये
पवारांचा व्हिडीओ मी पाहिलेला नाही
विलिनीकरणाची मागणी दोन तीन चार दिवसांत मान्य होऊ शकत नाही
समितीचा अहवाल आल्याशिवाय त्यावर निर्णय होऊ शकत नाही
पगाराबाबत काही मागण्या आहेत त्यावर चर्चा होऊ शकते
हायकोर्टाच्या निर्णयानुसार कमिटीच विषय हाताळेल आणि त्यानुसार निर्णय घेतला जाईल
माझ्यावर काय आरोप करायचे ते करा, पण कामगारांचं नुकसान करु नका
आज जे काही सुरु आहे त्यातून कामगारांचं नुकसान होत आहे
त्यांनाही माहिती आहे की आपण चुकीची मागणी लावून धरली आहे.
नितेश राणे यांचे आरोप आम्ही मोजतच नाही.
कोण नितेश राणे? त्यांची मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्याची पात्रता आहे का?
त्यामुळे त्यांच्या आरोपांना आम्ही महत्व देत नाही
-
वर्षा गायकवाड यांच्याकडून नॅस साठी शुभेच्छा
Wishing all participating schools and students all the very best. Go for it!! #NAS2021 https://t.co/D5yp3oH7pK
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) November 12, 2021
-
22 भाषांच्या माध्यमांमध्ये चाचणी
नॅशनल अॅचिव्हमेंट सर्वेक्षण हे एकूण 22 माध्यमांमध्ये करण्यात येईल. आसामी, बंगाली, इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम, मनिपुरी, मराठी, मिझो, ओडिया, पंजाबी, तामीळ, तेलुगू, उर्दू, बोडो, गारो, खासी, कोंकणी, नेपाळी, भुतिया, लेपचा या भाषांच्या माध्यमामध्ये ही चाचणी घेतली जाईल.
-
कोरोना विषाणू संसर्गामुळं सर्वेक्षण लांबणीव
नॅशनल अॅचिव्हमेंट सर्वेक्षण दर तीन वर्षांनी करण्यात येतो. यापूर्वीचा सर्वे 2017 मध्ये करण्यात आला होता. 2020 मध्ये नियोजित वेळेप्रमाणं सर्वेक्षण होणं आवश्यक होतं. मात्र, कोरोना विषाणू संसर्गामुळं सर्वेक्षण लांबणीवर पडलं होतं. अखेर नॅशनल अॅचिव्हमेंट सर्वेक्षण आज होत आहे.
-
महाराष्ट्रातील 2 लाख 34 हजार 55 विद्यार्थ्यांची निवड
सर्वेक्षणासाठी राज्यातील इयत्ता तिसरी, पाचवी, आठवी आणि दहावीच्या एकूण 7330 शाळांमधील 2 लाख 34 हजार 55 विद्यार्थ्यांची निवड केंद्र शासनामार्फत करण्यात आली
-
महाराष्ट्र सरकारची नॅस साठी जय्यत तयारी
राज्य शासनामार्फत शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावी व शहरी भागातील इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळांचे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. तथापि राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण केंद्र शासनामार्फत संपूर्ण देशभरात एकाच वेळी होणार असल्याने ग्रामीण व शहरी भागात प्रस्तुत सर्वेक्षणासाठी निवडलेल्या सर्व व्यवस्थापन, माध्यमाच्या शाळांतील तिसरी, पाचवी, आठवी आणि दहावीचे वर्ग दिनांक 12 नोव्हेंबर 2021 रोजी सुरू राहतील.
-
38 लाख विद्यार्थी नॅसमध्ये सहभागी होणार
नॅस अंतर्गत देशभरातील तिसरी, पाचवी, आठवी आणि दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला जातो. यावर्षी हा सर्वे देशभरातील 36 राज्यातील 733 जिल्ह्यातील 1.23 लाख शाळांमध्ये होणार आहे. तर,यामध्ये एकूण 38 लाख विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
Published On - Nov 12,2021 10:24 AM