AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

JEE Main 2021 फेब्रुवारी सत्रातील परीक्षेची उत्तरतालिका जाहीर, ‘या’ दिवशी निकाल जाहीर होणार

नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं (National Testing Agency) जेईई मेन परीक्षेची उत्तर तालिका जाहीर केली आहे.

JEE Main 2021 फेब्रुवारी सत्रातील परीक्षेची उत्तरतालिका जाहीर, 'या' दिवशी निकाल जाहीर होणार
जाणून घ्या जेईई मेनचा निकाल कधी येणार, अशा प्रकारे तपासू शकाल
Follow us
| Updated on: Mar 03, 2021 | 11:44 AM

JEE Main 2021 Exam  Answer Key: अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा समजली जाणाऱ्या जेईई मेन बी.टेक. परीक्षेची उत्तरतालिका (JEE Main February Session Exam Answer Key) जाहीर झाली आहे. जेईई मेन (JEE Main 2021) फेब्रुवारी 2021 सत्रामध्ये B.Arch आणि B.Planing ची परीक्षा 23 ते 26 फेब्रुवारी दरम्यान झाली आहे. देशभरातील 331 शहरांमध्ये ही परीक्षा पार पडली. (National Testing Agency has released the answer key for JEE Main 2021 on its official website)

उत्तरतालिका कुठे पाहणार

नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं (National Testing Agency) जेईई मेन परीक्षेची उत्तरतालिका जाहीर केली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली ते jeemain.nta.nic.in या वेबसाईटला बेट देऊ शकतात. 7 मार्च 2021 ला या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत परीक्षेचे आयोजन केले गेले. एनटीएनं या परीक्षेसाठी 852 परीक्षा केंद्रांची निवड केली आहे. सप्टेंबर 2020 मध्ये 660 परीक्षा केंद्रांवर परीक्षा झाली होती. सध्या सुरु असलेल्या परीक्षेत देशभरातील 6 लाख 61 हजार 761 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते.

मातृभाषेत परीक्षा

नव्या शिक्षण धोरणानुसार जेईई मेन बी.टेक.परीक्षा 2021 इंग्रजी आणि हिंदी भाषेसह तेलुगू, तामिळ, पंजाबी, उर्दू, ओडिशा, मराठी, मल्याळम, कन्नड, बंगाली, आमामी आणि गुजराती भाषेमध्ये घेतली गेली आहे. विद्यार्थ्यांना प्रथमच त्यांच्या मातृभाषेत परीक्षा देण्याची संधी मिळाली होती. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट अशा पद्धतीनं घेतली गेली.

2 शिफ्टमध्ये परीक्षा

NTA च्या माहितीनुसार, परीक्षा केंद्रांना 2 शिफ्टमध्ये पूर्णपणे स्वच्छ केलं गेलं आहे. परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांसाठी मास्क आणि सॅनिटायझर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. परीक्षा सुरु असताना केंद्रावर फिजीकल डिस्टन्सिंगचे पालन केले गेले. ही परीक्षा 2 शिफ्टमध्ये ही परीक्षा पार पडली.

संबंधित बातम्या:

JEE Main 2021 : B.Tech आणि B. Arch जेईई मेन परीक्षेला सुरुवात, 6 लाख विद्यार्थी देणार परीक्षा

UPSC Civil Service 2020 उमेदवारांना आणखी एक संधी नाहीच, सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली!

(National Testing Agency has released the answer key for JEE Main 2021 on its official website)

'93 हजार पाक सैनिकांचे आत्मसमर्पण...', धवननंतर आफ्रिदीला कुणी सुनावलं?
'93 हजार पाक सैनिकांचे आत्मसमर्पण...', धवननंतर आफ्रिदीला कुणी सुनावलं?.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं रिक्रिएशन; NIA चं पथक बैसरन खोऱ्यात दाखल
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं रिक्रिएशन; NIA चं पथक बैसरन खोऱ्यात दाखल.
एनआयएचे डिजी सदानंद दातेंच्या महत्वाच्या बैठका सुरू
एनआयएचे डिजी सदानंद दातेंच्या महत्वाच्या बैठका सुरू.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या बड्या मंत्र्यानं म्हटलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या बड्या मंत्र्यानं म्हटलं.
दहशतवाद्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत - मनोज जरांगे
दहशतवाद्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत - मनोज जरांगे.
पहलगाममध्ये पर्यटकांना सुखरूप ठेवणारा 'तो' देवदूत टिव्ही ९ मराठीवर
पहलगाममध्ये पर्यटकांना सुखरूप ठेवणारा 'तो' देवदूत टिव्ही ९ मराठीवर.
पहलगामच्या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हाशिम मुसा, NIAचा रिपोर्ट
पहलगामच्या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हाशिम मुसा, NIAचा रिपोर्ट.
पाकवर सर्जिकल स्ट्राईक करण्यास USचा ग्रीन सिग्नल? अ‍ॅक्शन घ्यावी, पण..
पाकवर सर्जिकल स्ट्राईक करण्यास USचा ग्रीन सिग्नल? अ‍ॅक्शन घ्यावी, पण...
भारत - पाकिस्तान अटारी सीमेवरील दरवाजे पुन्हा उघडले
भारत - पाकिस्तान अटारी सीमेवरील दरवाजे पुन्हा उघडले.
LPG Gas : मे महिन्याच्या सुरुवातीलाच Good News... गॅस सिलिंडर स्वस्त
LPG Gas : मे महिन्याच्या सुरुवातीलाच Good News... गॅस सिलिंडर स्वस्त.