Navodaya Vidyalaya: नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा दुसऱ्यांदा लांबणीवर, पुन्हा परीक्षा कधी?
सहावीच्या वर्गासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2021 ची नवीन तारीख जाहीर केली जाईल. Navodaya Vidyalaya JNVST Postpone
Navodaya Vidyalaya (JNVST) Class 6 Exam नवी दिल्ली : नवोदय विद्यालय समितीनं इयत्ता सहावीच्या वर्गासाठी घेतली जाणारी प्रवेश परीक्षा लांबणीवर टाकली आहे. NVST प्रवेश परीक्षा मिझोरम, मेघालय आणि नागालँड वगळता इतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 16 मे रोजी होणार होती. तर या तीन राज्यांमध्ये 19 जून 2021 रोजी परीक्षेचे आयोजन करण्यात येणार होते. मात्र, वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. नवोदय विद्यालय समितीतकडून इयत्ता सहावीच्या वर्गासाठी अखिल भारतीय पातळीवर प्रवेश परीक्षेचे आयोजन केले जाते. (Navodaya Vidyalaya JNVST Class 6 Exam Second time Postponed Check Details Here )
परीक्षेपूर्वी 15 दिवस तारीख जाहीर करणार
जवाहर नवोदय विद्यालयामध्ये सहावीच्या वर्गासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2021 ची नवीन तारीख जाहीर केली जाईल. परीक्षेची नवीन तारीख जाहीर करताना विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी 15 दिवसांची मुदत मिळेल, असा वेळ ठेवून तारीख जाहीर होईल. कोरोना विषाणू संसर्ग आणि प्रशासकीय कारणांमुळं परीक्षा लांबणीवर टाकल्याची माहिती, जवाहर नवोदय विद्यालयाशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
परीक्षेचे स्वरुप
जेएनवी इयत्ता 6 वी प्रवेश परीक्षा इंग्रजी, हिंदी संबंधित राज्यातील प्रादेशिक भाषेत आयोजित केली जाते. प्रवेश परीक्षेचा वेळ दोन तासांचा असतो. यामध्ये तीन विभाग असतात आणि 80 वस्तूनिष्ट प्रश्न विचारले जातात. ही परीक्षा एकूण 100 गुणांची असते. मानसिक क्षमता चाचणी, अंकगणित परीक्षण आणि भाषा कौशल्य या विषयावर प्रश्न विचारले जातात.
प्रवेश परीक्षेनंतर पुढे काय?
JNVST इयत्ता 6 वी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना नवोदय विद्यालय समितीकडून कागदपत्रांची पडताळणी करुन घ्यावी लागते. कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतरचं निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित मानला जाईल. जवाहर नवोदय विद्यालयाची सहावीच्या वर्गाची प्रवेश परीक्षा दुसऱ्यांदा स्थगित केली गेली आहे. यापूर्वी परीक्षा 10 एप्रिलला होणार होती. त्यानंतर 16 मे ही तारीख निश्चित करण्यात आली होती. आता पुन्हा नव्यानं तारीख जाहीर केली जाणार आहे.
संबंधित बातम्या:
Fact Check : पुढच्या वर्षापासून सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार कापणार? पाहा खरं आहे की खोटं
(Navodaya Vidyalaya JNVST Class 6 Exam Second time Postponed Check Details Here )