NEET Answer Key 2021 : नीट यूजी परीक्षेची उत्तरतालिका लवकरच जाहीर होणार, विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा

राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट यूजी 2021 परीक्षा 12 सप्टेंबरला आयोजित केली गेली होती. नीट यूजी परीक्षेचं आयोजन देशभरातील आणि परदेशातील 202 शहरातील केंद्रावर करण्यात आलं होतं.

NEET Answer Key 2021 : नीट यूजी परीक्षेची उत्तरतालिका लवकरच जाहीर होणार, विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा
Student
Follow us
| Updated on: Sep 23, 2021 | 12:03 PM

नवी दिल्ली: राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट यूजी 2021 परीक्षा 12 सप्टेंबरला आयोजित केली गेली होती. नीट यूजी परीक्षेचं आयोजन देशभरातील आणि परदेशातील 202 शहरातील केंद्रावर करण्यात आलं होतं. परीक्षेसाठी16 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. नीट यूजी परीक्षेची उत्तरतालिका या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी नीटच्या वेबसाईटला भेट द्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

16 लाख विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा

नीट यूजी परीक्षेसाठी 16 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. एनटीएकडून अंतिम उत्तरतालिका जाहीर झाल्यानंतर निकाल जाहीर केला जाईल. देशभरातील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट यूजी परीक्षा आयोजित करण्यात येते. 55 हजार जागांसाठी जवळपास 16 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केल्यानं या परीक्षेतील स्पर्धा तीव्र असते. यापूर्वीच्या परीक्षांचा अंदाज घेतल्यास असं दिसून येतं की परीक्षा झाल्यानंतर 12-14 दिवसानंतर उत्तर तालिका जाहीर केली जाते.

नीट यूजी परीक्षा प्रादेशिक भाषांमध्ये

गेल्या वर्षी कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करीत 13 सप्टेंबर रोजी नीट परीक्षा घेण्यात आली. परीक्षेला एकूण 13.66 लाख उमेदवार परीक्षेला बसले होते, त्यापैकी 7,71,500 विद्यार्थी पात्र ठरले होते. यावर्षी ही परीक्षा इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मराठी, ओडिया, तामिळ, तेलगू आणि उर्दू या 11 भाषांमध्ये घेण्यात आली आहे.

नीट परीक्षा रद्द करा, महाराष्ट्र काँग्रेसची मागणी

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषद घेतली. नाना पटोलेंनी यावेळी विविध मुद्यावर भूमिका मांडली. नीट परीक्षेमध्ये उघड झालेल्या गैरप्रकारांवर त्यांनी बोट ठेवलं. नीट परीक्षेला देशभरातून जवळपास 16 लाख विद्यार्थी परीक्षेला बसतात. यावर्षी नागपूर असेल जयपूर अशा ठिकाणी हा पेपर लीक झाला. या घटनेमुळं अनेक विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आल्याचं चित्र पाहायला मिळतंय. यामुळं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून तामिळनाडूनमध्ये राज्य सरकारनं नीट बंद करून बारावीच्या गुणांच्या आधारावर प्रवेश देण्याचा निर्णय घेतला, तसा निर्णय महाराष्ट्रात व्हावा यासाठी भूमिका घ्यावी, अशी काँग्रेसची भूमिका आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून यासदंर्भात मागणी केली असल्याचं नाना पटोले यांनी सांगितलं आहे.

राज्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय

अनेक ठिकाणी NEET गैरप्रकार झाल्याने विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले. ही परीक्षा NCERT च्या बेसवर असल्याने राज्य शिक्षण मंडळाचे विद्यार्थी मागे पडतात. म्हणूनच महाराष्ट्राने देखील तामिळनाडूप्रमाणे बारावीच्या बेसवर मेडीकलला प्रवेश देण्याची भूमिका घ्यावी, अशी काँग्रेसच पक्षाची भूमिका असल्याचं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले आहेत.

इतर बातम्या:

NEET परीक्षा रद्द करा, तामिळनाडू प्रमाणं मेडिकल प्रवेशाचा निर्णय घ्या; काँग्रेसची मागणी, उद्धव ठाकरेंना पत्र

NEET PG Admit Card : नीट पीजी परीक्षेचं प्रवेशपत्र जाहीर, डाऊनलोड कसं करायचं?

Neet Answer Key 2021 NTA likely to release official answer key during this week at neet.nta.nic. in

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.