NEET UG 2021 | नीट यूजी परीक्षेची तारीख जाहीर, 1 ऑगस्ट रोजी होईल परीक्षा

एमबीबीएस / बीडीएस कोर्समध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी प्रवेश पोर्टल ntaneet.nic.in वर नोंदणी करावी लागेल. (NEET exam 2021 date announced, Exam will be on 1st August)

NEET UG 2021 | नीट यूजी परीक्षेची तारीख जाहीर, 1 ऑगस्ट रोजी होईल परीक्षा
नीट पोस्ट ग्रेजुएशन परीक्षेची तारीख ठरली
Follow us
| Updated on: Mar 12, 2021 | 10:56 PM

नवी दिल्ली : राष्ट्रीय पात्रता किंवा प्रवेश चाचणी किंवा एनईईटी(NEET) 2021 परीक्षा 1 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने आपल्या अधिकृत वेबसाईट nta.ac.in वर एमबीबीएस प्रवेश परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. परीक्षेसाठी अर्ज लवकरच सुरू होईल. एमबीबीएस / बीडीएस कोर्समध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी प्रवेश पोर्टल ntaneet.nic.in वर नोंदणी करावी लागेल. (NEET exam 2021 date announced, Exam will be on 1st August)

उमेदवारांचे वय 17 ते 25 वर्षे हवे

NEET 2021 हे पेन आणि पेपर पद्धतीने आणि वर्षामध्ये फक्त एकदा आयोजित केले जाईल. पदवीधर वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी उमेदवारांचे वय 17 ते 25 वर्षे असणे आवश्यक आहे आणि बारावी किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डमधून मुख्य विषय म्हणून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजीमध्ये समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे.

बारावी परीक्षेस बसणारे विद्यार्थीही पात्र

हे लक्षात ठेवा की, यावर्षी बारावीच्या बोर्ड परीक्षेस बसणारे विद्यार्थीदेखील या प्रवेश परीक्षेस पात्र ठरणार आहेत. उमेदवारांनी अर्जासोबत स्कॅन केलेल्या कागदपत्रांची यादी, जसे की दहावी व बारावीची प्रमाणपत्रे, गुणपत्रक, आधार कार्डची छायाप्रत, पासपोर्ट क्रमांक, रेशनकार्ड क्रमांक, बँक खात्याचा तपशील, पासपोर्ट आकाराचा स्कॅन केलेला फोटो, स्वाक्षरी आणि डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा द्यावी लागेल.

नीट यूजी परीक्षेसाठी नोंदणी कशी करावी

नीट यूजी परीक्षेसाठी नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळावर जा. यानंतर उमेदवारांनी प्रथम होम पेजवर जाणे आवश्यक आहे. यानंतर नवीन नोंदणी टॅबवर क्लिक करा. यानंतर अधिसूचनेमधील सूचना काळजीपूर्वक वाचा आणि पुढे जा. यानंतर सर्व आवश्यक माहिती भरा आणि सबमिट करा. यानंतर आयडीची रजिस्टर्ज बनवा आणि पुन्हा लॉग इन विभागात जा. मग आपल्या क्रेडेन्शियल्समध्ये की आणि लॉग इन करा. अॅप्लिकेशन फॉर्म डिस्प्ले स्क्रीनवर दिसेल. यानंतर सर्व आवश्यक माहिती भरा आणि सर्व सहाय्यक दस्तऐवज अपलोड करा. या दस्तऐवजांचे प्रिंटआउट घ्या.

11 प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा

या वर्षीपासून नीट युजी परीक्षा 11 प्रादेशिक भाषांमध्ये आयोजित केली जाणार आहे. यात इंग्रजा, दिंदी, आसामी, गुजराती, बंगाली, मराठी, ओडिया, कन्नड, तामिळ, तेलगू आणि उर्दू आदि भाषांचा समावेश असेल. (NEET exam 2021 date announced, Exam will be on 1st August)

संबंधित बातम्या

एसएससी सीएचएसएल परीक्षा 12 एप्रिलपासून, 30 दिवसांच्या क्रॅश कोर्ससह होईल तयारी पक्की

UGC NET 2021 : युजीसी नेट परीक्षा अर्जाची करेक्शन विंडो खुली, या तारखेपर्यंत करु शकता दुरुस्ती

Non Stop LIVE Update
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.