Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NEET MDS 2021: महाराष्ट्रातील दंतवैद्यक महाविद्यालयांमधील प्रवेशांसाठी नोंदणी सुरु, संपूर्ण प्रक्रिया एका क्लिकवर

महाराष्ट्राच्या राज्य सामायिक प्रवेश चाचणी कक्षानं NEET MDS 2021 द्वारे राज्य महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे.

NEET MDS 2021: महाराष्ट्रातील दंतवैद्यक महाविद्यालयांमधील प्रवेशांसाठी नोंदणी सुरु, संपूर्ण प्रक्रिया एका क्लिकवर
फोटो : प्रतिकात्मक
Follow us
| Updated on: Aug 26, 2021 | 11:07 AM

मंबई: महाराष्ट्राच्या राज्य सामायिक प्रवेश चाचणी कक्षानं NEET MDS 2021 द्वारे राज्य महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी राज्यातील राज्य सरकार/महामंडळ/अनुदानित/विनाअनुदानित खाजगी/अल्पसंख्याक दंतवैद्यक संस्थांमध्ये आणि पदव्युत्तर दंत अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरु होत आहे. पात्र उमेदवार MHT-CET च्या अधिकृत वेबसाइट mahacet.org द्वारे ऑनलाईन अर्ज करू शकतात.

29 ऑगस्टपर्यंत नोंदणीची संधी

उमेदवार NEET MDS 2021 परीक्षेला बसले आहेत आणि महाराष्ट्र राज्य सरकार/ कॉर्पोरेशन/ अनुदानित/ विनाअनुदानित खासगी आणि अल्पसंख्यांक महाविद्यालयांमध्ये उपलब्ध दंतवैद्यक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा असेल ते विद्यार्थी नोंदणी करु शकतात. 29 ऑगस्ट 2021 पर्यंत महासीईटीची नोंदणी करु शकतात. सर्व नोंदणीकृत किंवा पात्र उमेदवारांना पदव्युत्तर दंत अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 26 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट 2021 दरम्यान सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

संपूर्ण वेळापत्रक

ऑनलाईन नोंदणीची तारीख : 26 ऑगस्ट 2021 ऑनलाईन नोंदणीची शेवटची तारीख : 29 ऑगस्ट 2021 आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची वेळ :26 ते 30 ऑगस्ट 2021 रिक्त जागांची माहिती जाहीर करणं : 27 ऑगस्ट 2021 पात्र उमेदवारांचे ऑनलाइन पसंतीक्रम फॉर्म भरण्याची प्रक्रिया : 27 ते 31 ऑगस्ट 2021 नोंदणीकृत उमेदवारांची तात्पुरती गुणवत्ता यादी प्रदर्शित :2 सप्टेंबर 2021 NEET MDS ची पहिली निवड यादी प्रदर्शित : 4 सप्टेंबर 2021 पहिल्या कॅप फेरीसाठी वाटप केलेल्या महाविद्यालयात सामील होण्याची अंतिम तारीख : 9 सप्टेंबर 2021

उमेदवारांनी सादर केलेली माहिती NEET MDS 2021 साठी महाराष्ट्र राज्य तात्पुरती गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी वापरली जाईल. प्रवेशापूर्वी प्रत्येक फेरी दरम्यान प्रवेशासाठी अर्ज केल्यानंतर कागदपत्र पडताळणी प्रक्रिया कॉलेज स्तरावर आयोजित केली जाईल.

NEET UG साठी परीक्षा केंद्रांची यादी जाहीर

NTA ने NEET UG 2021 साठी परीक्षा केंद्रे असलेल्या शहरांची यादी जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांनी मागितलेल्या पसंतीच्या आधारे NTA परीक्षा केंद्राची शहरे वाटप केली जातात. उमेदवार NEET च्या अधिकृत वेबसाइटवर त्यांचे परीक्षा केंद्र शहर तपासू शकतात. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर एनटीएने हा निर्णय घेतला आहे.

इतर बातम्या:

FYJC (11th) Admission Merit List 2021 : अकरावी प्रवेशाची पहिली यादी काही तासांवर, विद्यार्थ्यांमध्ये धडधड

महाविद्यालयांना लैंगिक छळ विरोधी माहिती वेबसाईटवर प्रसिद्ध करणं अनिवार्य, यशोमती ठाकूर यांची माहिती

NEET MDS 2021 Registration for Maharashtra colleges admission begins today at mahacet org in

फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट.
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ.
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी.
आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर
आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर.
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवणार? श्रीमंत कोकाटेंनी म्हटलं...
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवणार? श्रीमंत कोकाटेंनी म्हटलं....
हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला कसा? उद्धव ठाकरेंचा प्रश्न
हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला कसा? उद्धव ठाकरेंचा प्रश्न.