NEET PG 2022 : ‘देखो वो आगया, ॲडमिट कार्ड आगया!’, कसं आणि कुठून डाउनलोड करणार ? क्लिक करा
ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी विनंती इंडियन मेडिकल असोसिएशनने सुद्धा सरकारला पत्र लिहीत केली होती. परंतु आता या सगळ्यावरच सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाची भूमिका घेतली आहे. NEET ची परीक्षा वेळेवरच होणार आहे. 21 मे ला ही परीक्षा घेण्यात येणार होती त्यानुसार याच तारखेला ही परीक्षा होणार आहे.
नवी दिल्ली : नीट पीजी 2022 (NEET PG 2022) परीक्षेचं प्रवेशपत्र (Admit Card) जारी करण्यात आलंय. राज्यासह देशभरात नीट पीजी परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि या परीक्षेला बसणाऱ्यांनी ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी केली होती. दरम्यान पदव्युत्तर परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलीये. ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी विनंती इंडियन मेडिकल असोसिएशनने सुद्धा सरकारला पत्र लिहीत केली होती. परंतु आता या सगळ्यावरच सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाची भूमिका घेतली आहे. NEET ची परीक्षा वेळेवरच होणार आहे. 21 मे ला ही परीक्षा घेण्यात येणार होती त्यानुसार याच तारखेला ही परीक्षा होणार आहे. दरम्यान आता या परीक्षेचं प्रवेशपत्र एनबीई (NBE) कडून जारी करण्यात आलंय.
ॲडमिट कार्ड कसं डाउनलोड करायचं ?
- प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी nbe.edu.in भेट द्या.
- त्यानंतर विचारण्यात आलेली माहिती भरा.
- त्यानंतर पेजवर ॲडमिट कार्ड दिसेल.
- ॲडमिट कार्डची माहिती तपासा, डाउनलोड करा आणि प्रिंट आऊट घ्या.
या गोष्टींची काळजी घ्या
- उमेदवारांना आपल्या परीक्षा केंद्राची माहिती असावी
- कोणत्याही परिस्थितीत परीक्षेच्या आवारात उशिरा प्रवेश दिला जाणार नाही.
- ॲडमिट कार्ड डाउनलोड केल्यानंतर उमेदवारांनी ॲडमिट कार्डमध्ये दिलेली माहिती योग्य असल्याची खात्री करून घ्यावी.
- कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती असेल तर ती वेळीच दुरुस्त करून घ्या नाहीतर परीक्षेला बसण्यात अडचणी येतील.
2 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी केली नोंदणी – सर्वोच्च न्यायालय
आणखी परीक्षा पुढे ढकलण्यात आली तर याचा परिणाम आरोग्य यंत्रणेवर होईल, मुळातच परीक्षेला उशीर झाला तर पुढच्या सगळ्या प्रोसेसवर परिणाम होऊन उपलब्ध डॉक्टरांची संख्या कमी होईल आणि रुग्णांच्या देखभालीवर त्याचा गंभीर परिणाम होईल असं न्यायालयानं म्हटलं. न्या. डी वाय चंद्रचूड आणि न्या.सूर्या कांत यांच्या खंडपीठाकडून हे निर्देश देण्यात आले. नीट पीजी 2022-23 परीक्षेसाठी 2 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याचं न्यायालयाने यावेळी सांगितलं.