NEET PG Counselling: सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली, एनईईटी पीजी समुपदेशनाबाबत दिला महत्त्वाचा निर्णय

29 ऑगस्ट 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयाने या समुपदेशनाला स्थगिती देण्याची आणि एनईईटी पीजीमधील घोटाळ्याच्या आरोपांना स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली.

NEET PG Counselling: सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली, एनईईटी पीजी समुपदेशनाबाबत दिला महत्त्वाचा निर्णय
NEET PG CounsellingImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 29, 2022 | 1:59 PM

सर्वोच्च न्यायालयाने एनईईटी पीजी समुपदेशन 2022 (NEET PG Cpunselling 2022) चा मार्ग मोकळा केला आहे. आता उशीर होणार नाही. न्यायालयाच्या निर्णयानंतर नीट पीजी 2022 चे समुपदेशन नियोजित वेळेत (NEET Counselling dates) सुरू होईल. सोमवार, 29 ऑगस्ट 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयाने या समुपदेशनाला स्थगिती देण्याची आणि एनईईटी पीजीमधील घोटाळ्याच्या आरोपांना स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली. ही याचिका फेटाळत सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) म्हटलं की, आम्ही विद्यार्थ्यांना धोक्यात आणू शकत नाही. नीट पीजीचे समुपदेशन वेळेवर होऊ द्या.

नीट पीजीवर याचिका का दाखल केली?

एनईईटी पीजीबाबत न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर ही याचिका आणण्यात आली. एनईईटी पीजी निकालात गडबड असल्याची शंका व्यक्त करून याचिकाकर्त्याने एनबीईकडून स्पष्टीकरण मागितले होते. कारण – एनईईटी पीजी परीक्षा आयोजित करणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण मंडळाने यंदा नीट पीजी उत्तर की आणि प्रश्नपत्रिका जाहीर न करण्याचा निर्णय घेतला. या परीक्षेत गंभीर घोटाळा झाल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केला.

नीट पीजी समुपदेशन वेळेवर होऊ द्या

नीट पीजी समुपदेशन 1 सप्टेंबर 2022 पासून सुरू होणार आहे. त्याचा संदर्भ देत याचिकाकर्त्याच्या वकिलांनी या तारखेपूर्वी सुनावणीसाठी अपील केले होते. आज 29 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले की, ‘आम्ही यात हस्तक्षेप करणार नाही. नीट पीजी समुपदेशन वेळेवर होऊ द्या. आणखी उशीर करू नका. आम्ही विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आणू शकत नाही.”

एनईईटी पीजी नोंदणी mcc.nic.in

एनईईटी पीजी समुपदेशन 2022 फेरी 1 ची नोंदणी प्रक्रिया 1 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. मेडिकल कौन्सिलिंग कमिटी (एमसीसी) हे समुपदेशन करणार आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्रवेशासाठी नीट पीजी समुपदेशन 2022 ची नोंदणी करावी लागणार आहे. mcc.nic.in भेट देऊन ऑनलाइन नोंदणी करू शकता. नोंदणीची शेवटची तारीख 4 सप्टेंबर 2022 (रात्री 8 वाजेपर्यंत) आहे. समुपदेशनाची प्रक्रिया 18 ऑक्टोबर 2022 रोजी पूर्णपणे संपणार आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.