NEET UG 2023 फायनल Answer Key जारी, अशी करा डाउनलोड
नीट यूजी 2023 मध्ये 499 शहरांतील 4,097 परीक्षा केंद्रांवर एकूण 20,87,449 उमेदवारांनी परीक्षा दिली होती. प्रबंजन जे आणि बोरा वरुण चक्रवर्ती यांनी नीट यूजी मध्ये देशभरात प्रथम क्रमांक पटकावला आहे. अधिक संबंधित तपशीलांसाठी उमेदवार एनटीए नीटच्या अधिकृत साइटवर जाऊ शकतात.
मुंबई: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) नीट यूजी 2023 साठी अंतिम आंसर- की जाहीर केली आहे. राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेस बसलेले उमेदवार neet.nta.nic.in अधिकृत वेबसाइटद्वारे ते डाउनलोड करू शकतात. 13 जून रोजी रात्री 9 वाजून 20 मिनिटांनी निकाल जाहीर करण्यात आला. आता अंतिम उत्तरपत्रिकाही जाहीर करण्यात आली आहे.
नीट यूजी 2023 मध्ये 499 शहरांतील 4,097 परीक्षा केंद्रांवर एकूण 20,87,449 उमेदवारांनी परीक्षा दिली होती. प्रबंजन जे आणि बोरा वरुण चक्रवर्ती यांनी नीट यूजी मध्ये देशभरात प्रथम क्रमांक पटकावला आहे. अधिक संबंधित तपशीलांसाठी उमेदवार एनटीए नीटच्या अधिकृत साइटवर जाऊ शकतात.
आंसर- की कशी डाऊनलोड करावी
- neet.nta.nic.in अधिकृत संकेतस्थळावर जा.
- नीट यूजी 2023 अंतिम आंसर- की च्या लिंकवर क्लिक करा.
- तुमच्या स्क्रीनवर एक पीडीएफ दिसेल.
- आता चेक केल्यानंतर प्रिंट आऊट घ्या.
NEET UG अंतिम आंसर- की 2023 डायरेक्ट लिंक
नीट यूजी 2023 मध्ये 20 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 8,81,967 पुरुष उमेदवार परीक्षेला बसले होते आणि 4,90,374 उत्तीर्ण झाले आहेत. तर एकूण 11 लाख 56 हजार 618 महिला उमेदवार परीक्षेला बसल्या होत्या, त्यापैकी एकूण 6 लाख 55 हजार 599 यशस्वी झाल्या आहेत.
मणिपूरमध्ये ही परीक्षा 6 जून रोजी घेण्यात आली होती आणि तात्पुरती आंसर- की 12 जून रोजी जाहीर करण्यात आली होती. त्याचवेळी 7 मे रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेची तात्पुरती आंसर- की 6 जून रोजी प्रसिद्ध करण्यात आली. यावर आक्षेप नोंदविण्यासाठी परीक्षेत सहभागी उमेदवारांना मुदत देण्यात आली होती. हरकतींचे निराकरण झाल्यानंतर निकाल आणि अंतिम आंसर- की जाहीर करण्यात आलीये.