NEET Result 2021: नीट यूजी परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला

NEET Result 2021: सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळं नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून घेण्यात आलेल्या पदवीस्तरावरील राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षेच्या निकालाची उत्सुकता विद्यार्थ्यांना लागून राहिलेली आहे.

NEET Result 2021: नीट यूजी परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला
NEET Exam 2021
Follow us
| Updated on: Oct 29, 2021 | 12:13 PM

NEET UG Result 2021 नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टानं मुंबई हायकोर्टाचा निर्णय बदलत नीट यूजी परीक्षेचा निकाल (NEET UG Result 2021) जाहीर करण्यावरील स्थगिती उठवली आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळं नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून घेण्यात आलेल्या पदवीस्तरावरील राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षेच्या निकालाची उत्सुकता विद्यार्थ्यांना लागून राहिलेली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी आज किंवा उद्या निकाल जाहीर करू शकते, अशी सूत्रांची माहिती आहे. विद्यार्थी अधिकृत वेबसाईट neet.nta.nic.in ला भेट देऊन निकाल पाहू शकता.

NEET 2021 निकाल कसा पाहायचा

स्टेप 1 : अधिकृत वेबसाईट neet.nta.nic.in ला भेट द्या. स्टेप 2 : होमपेजवरील निकालाच्या लिंकवर क्लिक करा. स्टेप 3 : तुमचा रोल नंबर, पासवर्ड आणि जन्मतारीख नोंदवा. स्टेप 4 : स्कोअरकार्ड स्क्रीनवर दिसेल, ते डाऊनलोड करा. स्टेप 5 : तसेच निकालाची प्रिंट आऊट आपल्याकडे ठेवा.

निकालात त्रुटी असल्यास कुठं संपर्क साधायचा?

एनटीएकडून जाहीर करण्यात आलेल्या निकालासंदर्भात विद्यार्थी असमाधानी असल्यास किंवा निकालात काही त्रुटी आढळल्यास, उमेदवार NTA शी ईमेल id- nta@neet.ac.in वर संपर्क साधू शकतात.

16 लाख विद्यार्थ्यांकडून निकालाची प्रतीक्षा

नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून 12 सप्टेंबर रोजी देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर नीट यूजी परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं. नीट यूजी परीक्षेसाठी तब्बल 16 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. नीट यूजी परीक्षेचं आयोजन देशभरातील आणि परदेशातील 202 शहरातील केंद्रावर करण्यात आलं होतं. परीक्षेसाठी16 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.  नीट परीक्षेच्या निकालाची 16 लाख विद्यार्थ्यांना प्रतीक्षा आहे.

नीट यूजी परीक्षा प्रादेशिक भाषांमध्ये

गेल्या वर्षी कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करीत 13 सप्टेंबर रोजी नीट परीक्षा घेण्यात आली. परीक्षेला एकूण 13.66 लाख उमेदवार परीक्षेला बसले होते, त्यापैकी 7,71,500 विद्यार्थी पात्र ठरले होते. यावर्षी ही परीक्षा इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मराठी, ओडिया, तामिळ, तेलगू आणि उर्दू या 11 भाषांमध्ये घेण्यात आली आहे.

इतर बातम्या:

NEET Answer Key 2021 : नीट यूजी परीक्षेची उत्तरतालिका लवकरच जाहीर होणार, विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा

NEET UG 2021 : नीट परीक्षा यूजी परीक्षेच्या प्रवेशपत्रावर केंद्राचा चुकीचा उल्लेख, विद्यार्थ्यांना मनस्ताप

Neet UG Result 2021 will be declare soon live updates check how to download scorecard

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.