College Students : कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ऑफलाईन परीक्षेसाठी 15 मिनिटांचा अतिरीक्त वेळ मिळणार
गेले दीड ते दोन वर्ष कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे परीक्षा या ऑफलाईन झाल्याच नाहीत. त्यामुळे ऑफलाईन परीक्षांचं टेन्शनही विद्यार्थ्यांना असणार, हे स्वाभाविकच आहेत. ऑनलाईन परीक्षा घरातूनच दिल्या जात होत्या.
मुंबई : कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी (College Students) दिलासादायक बातमी (News)आहे. कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आता ऑफलाईन परीक्षेसाठी (Offline Examination) पंधरा मिनिटांचा अतिरीक्त वेळ प्रतितास मिळणार आहे. त्यामुळे ऑफलाईन परीक्षा देण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी अतिरीक्त वेळ मिळे. फक्त उन्हाळ परीक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचंही यावेळी स्पष्ट करण्यात आलं आहे. कुलगुरुंच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. गेले दीड ते दोन वर्ष कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे परीक्षा या ऑफलाईन झाल्याच नाहीत. त्यामुळे ऑफलाईन परीक्षांचं टेन्शनही विद्यार्थ्यांना असणार, हे स्वाभाविकच आहेत. ऑनलाईन परीक्षा घरातूनच दिल्या जात होत्या. त्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी परीक्षा ऑनलाईनच घेतल्या जाव्यात अशी मागणी केली जात होती. दरम्यान, आता विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत त्यांना परीक्षेसाठी 15 मिनिटांसाठी अतिरीक्त वेळ देण्यात येणार आहे.
लिखाणाचा सराव करायला विसरु नका..
ऑनलाईन परीक्षांमुळे अनेक विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव हा थांबला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांकडूनही ऑनलाईनच परीक्षा घेण्याची मागणी जोर धरत होती. अशातच आता लिखाणासाठी अतिरीक्त वेळ देण्यात आल्यानं विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
बुधवारी कुलगुरुंसोबत बैठक पार पडली. या बैठकीत परीक्षेसाठी वाढीव वेळ देण्यात यावा, या अनुशंगानं महत्त्वपूर्ण चर्चा झाली. कोरोनामुळे ऑनलाईन परीक्षेची सवय विद्यार्थ्यांना झाली. या सवयीमुळे विद्यार्थ्यांची लिखाणाची सवय सुटली असण्याचीही शक्यता अनेकांची वर्तवली. त्यामुळे ऑफलाईन परीक्षा देतेवेळी मुलांना अतिरीक्त वेळ दिला जावा, अशा मुद्दा बैठकीत चर्चेस आला होता.
परिपत्रक जारी
विद्यार्थ्यांना वाढीव वेळ देण्याबाबत आता परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. मुंबई विद्यापीठानं घेतलेल्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देताना अतिरीक्त वेळ देण्यात येईल. ही निर्णय शैक्षणिक वर्ष 2022 मधल्या ऑफलाईन परीक्षेसाठीच मर्यादित असेल, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
पुन्हा पेन हाती घ्यावंच लागणार
वाढीव वेळ परीक्षेवेळी देण्यात येणार असल्यानं विद्यार्थ्यांना आता पुन्हा लिखाणाचा सराव करावा लागणार आहे. वेळेत परीक्षा पूर्ण करण्यासाठी ऑफलाईन परीक्षांची सवय विसरुन पुन्हा एकदा बाकावर बसून परीक्षा देण्याची सवय विद्यार्थ्यांना अंगी बाणावी लागणार आहे. मात्र ऑनलाईन मधून पुन्हा ऑफलाईन परीक्षा देण्याची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळ अपुरी पडू नये, यासाठी मुंबई विद्यापीठानं दिलासादायक निर्णय घेतला आहे.