NCERT : NCERT पुस्तकातील कथेवरून वाद ! NCPCR कडून तक्रार दाखल
ही कथा प्रसिद्ध करण्यात आली आणि यावर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने (NCPCR) आक्षेप घेतला असून यासंदर्भात एनसीईआरटीकडून उत्तर मागवण्यात आलं आहे.
नवी दिल्ली : एनसीईआरटीच्या (NCERT) पुस्तकात हर्ष मंदर यांनी लिहिलेल्या कथेवरून वाद निर्माण झालाय. ही कथा प्रसिद्ध करण्यात आली आणि यावर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने (NCPCR) आक्षेप घेतला असून यासंदर्भात एनसीईआरटीकडून उत्तर मागवण्यात आलं आहे. एनसीईआरटीच्या नववीच्या पुस्तकात हर्ष मंदर (Harsh Mander) यांनी एक धडा लिहीला आहे ज्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. एका आठवड्यात या प्रकरणावर उत्तर द्यावं लागणार असल्याचं एनसीईआरटीकडून सांगण्यात आलंय.
NCPCR च्या वतीने अध्यक्ष प्रियांक कानुनगो यांनी हा आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात बोलताना प्रियांक कानुनगो म्हणाले कि, आयोगाला ‘Moments’ या इंगजी पुस्तकात प्रकाशित झालेल्या ‘ Weathering the storm in Ersama’ या कथेविरोधात तक्रार आली होती ज्याचे लेखक हर्ष मंदर आहेत.
National Commission for Protection of Child Rights sought an explanation from NCERT on inclusion of a story by activist Harsh Mandar, who is being investigated by ED
Commission has sought an explanation from NCERT within a week, asked it to take appropriate action pic.twitter.com/HdKMo1r0CM
— ANI (@ANI) April 5, 2022
का आहे आक्षेप ?
देशात बालगृह चालवताना मनी लॉंडरिंगचा आरोप असणाऱ्या व्यक्तीने लिहिलेली कथा कशी छापली जाऊ शकते, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. हर्ष मंदर यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाची (ईडी) चौकशी सुरु आहे.
‘त्या’ दोन बालगृहांशी हर्ष मंदर यांचा संबंध
NCPCRने गेल्याच वर्षी जुलैमध्ये दिल्ली उच्च न्यायालयाकडे दोन बालगृहांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. या बालगृहांवर अनियमिततेचा आरोप करण्यात आला होता या दोन्ही बालगृहांशी हर्ष मंदर यांचं नाव जोडलेलं होतं. याशिवाय आयोगाने A Home On The Street आणि Paying For His Tea या दोन कथेंवर देखील आक्षेप घेतला आहे. बालसंगोपण आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने या कथेत दुर्लक्ष करण्यात आल्याचं आयोगानं म्हटलंय.
इतर बातम्या :