NIOS Public Exam 2021 : एनआयओसच्या दहावी बारावी परीक्षांसाठी नोंदणी सुरु, अर्ज करण्यासाठी वाचा सविस्तर
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (NIOS)नं ऑक्टोबर ते नोव्हेंबर 2021 दरम्यान माध्यमिक आणि वरिष्ठ माध्यमिक अभ्यासक्रमांसाठी परीक्षा घेण्याची घोषणा केली.
नवी दिल्ली: नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (NIOS)नं ऑक्टोबर ते नोव्हेंबर 2021 दरम्यान माध्यमिक आणि वरिष्ठ माध्यमिक अभ्यासक्रमांसाठी परीक्षा घेण्याची घोषणा केली. विद्यार्थ्यांना ऑक्टोबर-नोव्हेंबर 2021 दरम्यान घेण्यात येणाऱ्या वरिष्ठ माध्यमिक अभ्यासक्रमांसाठी परीक्षेसाठी नोंदणी करावी लागेल. त्यासंदर्भाील नोंदणी आजपासून सुरू झाली आहे. विद्यार्थी NIOS च्या अधिकृत वेबसाइट nios.ac.in वर नोंदणी करु शकतात.
एनआयओएसकडून नोंदणी शुल्क व परीक्षा शुल्क भरण्याचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे. सर्व विद्यार्थी विलंब शुल्काशिवाय 16 ऑगस्टपर्यं अर्ज करु शकतात. तर, 26 ऑगस्टपर्यंत 100 रुपये (प्रत्येक विषय) विलंब शुल्कासह आणि 6 सप्टेंबर पर्यंत 1500 रुपये अतिविलंब शुल्कासह नोंदणी करू शकतात.
महत्त्वाच्या तारखा
नोंदणीला सुरुवात – 27 जुलै 2021 नोंदणी शेवटची तारीख – 16 ऑगस्ट 2021 विलंब शुल्कासह फीसह नोंदणी सुरू – 17 ऑगस्ट 2021 विलंब शुल्कासह फीसह नोंदणी समाप्त – 26 ऑगस्ट 2021 अति विलंब शुल्कासह नोंदणी : 27 ऑगस्ट ते 06 सप्टेंबर 2021 विलंब शुल्क फी – 100 रुपये अतिविलंब शुल्क फी – 1500 रुपये
एनआयओसकडून दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगने दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर केला आहे. हा निकाल 23 जुलै रोजी जाहीर करण्यात आला. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर एनआयओएसनं हा निकाल जाहीर केला आहे. एनआयओएसचे विद्यार्थी nios. ac.in या वेबसाईटवर त्यांचा निकाल पाहू शकतात.
एनआयओएसनं ट्विट करुन निकालासंदर्भातील माहिती दिली आहे. एनआयओएसनं दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर केला असून विद्यार्थी https://results.nios.ac.in या वेबसाईटवर निकाल पाहू शकतात आणि डाऊनलोड करुन प्रिंट आऊट घेऊ शकतात.
दहावीचा निकाल 90.64 टक्के
एकूण 1 लाख 18 हजार869 विद्यार्थ्यांनी एनआयओएस इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती, तर 1,69,748 विद्यार्थ्यांनी 12 वी इयत्तेसाठी नोंदणी केली होती. यावर्षी एनआयओएसचा दहावीचा निकाल 90.64 टक्के आणि 12 वीचा निकाल 79.21 टक्के लागला आहे. नोंदणीकृत विद्यार्थ्यांपैकी 10 वीचे 1 लाख 7 हजार 745 विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर 12 वीचे 1 लाख 34 हजार 466 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
इतर बातम्या:
ICSE, ISC Result 2021: आयसीएसई बोर्डाचे दहावी बारावीचे निकाल आज जाहीर होणार, निकाल कुठे पाहायचा?